देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे...

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
22 Aug 2011 - 2:07 pm

देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे...

रोज सकाळी आईच्या गजराने उठायचं आहे...
नाक मुरडत दूध पिऊन time table भरायचं आहे...
सायकल वरून मैत्रीणींबरोबर रस्ता अडवत शाळेला जायचं आहे...
रांगेत उभं राहून प्रार्थनेनंतर वर्गात शिराय्चं आहे...
पहिल्याच तासाच्या टीचरांना attendance द्यायचा आहे...
घरी न केलेला home work free period मध्ये संपवायचा आहे...
art craft च्या lecture मध्ये रंगी बेरंगी कागद, टिकल्यांशी खेळायचं आहे...
डब्यात आणलेली नावडती भाजी recess मध्ये दुसरीशी share करायची आहे...
संध्याकाळी घरी पोचताच दप्तर ठेऊन बाहेर खेळायला जायचं आहे...
दिवे लागणीच्या वेळी परत येऊन 'शुभंकरोती' म्हणायचं आहे...
आई समोर बसून पाठ केलेले पाढे आणि कविता म्हणून दाखवायचे आहे...
अवघड वाटणारं गणित बाबां कडून समजून घ्यायचं आहे...
लवकर ग्रुहपाठ उरकून 'गोष्टी' साठी आजीच्या मागे लागायचे आहे...
रविवारी उठून Jungle book, Duck Tales, पोटली बाबा की बघायचं आहे...
वाढदिवसाची तयारी एक महिना आधीपासून करायची आहे...
बाबांचा हात धरून गणपती देखावे पहायचं आहे...
दिवाळीच्या सुट्टी मध्ये किल्ल करायचा आहे...
शाळेतल्या एक दिवसाच्या सहलिला जायचं आहे...
annual social मध्ये नाचात भाग घ्यायचा आहे...
वार्षिक परिक्षेनंतर खूप ice cream खायचं आहे...
colony मध्ल्या मित्र मैत्रीणीं बरोबर अंगत पंगत करायची आहे...
लहान सहान कारणा वरून सगळ्यांवर रुसायचं आहे...

मला परत एकदा लहान व्हायचं आहे...

~~ प्रिया

कविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

22 Aug 2011 - 2:27 pm | श्रावण मोडक

म्हणजे तुम्ही मोठ्या झाल्या आहात होय? छ्या... मला वाटलं... ;)
ह. घ्याच.

योगप्रभू's picture

22 Aug 2011 - 3:37 pm | योगप्रभू

शिल्पा,
आपल्या प्रत्येकाच्याच मनात हा सुखद नॉस्ताल्जिया लपलेला असतो. त्यामुळेच मोठे होऊनही आपले जीवन वैराण होत नसावे.

तुझ्या हळव्या स्मृतिरंजनाशी सहमत आहे.

श्रावण मोडक's picture

22 Aug 2011 - 4:03 pm | श्रावण मोडक

शिल्पा,

क्काय? या प्रिया ब आहेत. शिल्पा ब नाहीत. अर्थात, 'ती मीच', 'मी तीच' असे असेल तर माझी माघार.

आत्मशून्य's picture

23 Aug 2011 - 3:42 am | आत्मशून्य

हॅहॅहॅ... असो त्यांनी कदाचीत मनातील भावनांना वाट करून दीली असावी. समजून घ्या (त्यांच्या वाक्याचा आशय).

योगप्रभू's picture

22 Aug 2011 - 5:09 pm | योगप्रभू

मी चुकून शिल्पा लिहिले. मला प्रिया ब. अभिप्रेत होते. :)

शुचि's picture

22 Aug 2011 - 6:44 pm | शुचि

छान ग प्रिया.

कवितानागेश's picture

22 Aug 2011 - 10:20 pm | कवितानागेश

रात्रशाळेत जावे लागेल!
;)

तुम्हाला प्रॉढशाळेत म्हणायचं आहे का ?

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 9:17 am | पल्लवी

घ्या ! इथे बालवाडीच्या गप्पा चाल्ल्यात अन तुम्ही म्हणताय प्रौढशाळा !