(चाल: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले-)
रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले
मनीं हे ' फस्त करू ' म्हटले .. |धृ|
जाय उभी ही गाडी करुनी
पुढ्यात, भैया पाहे वळुनी -
हॉटेलवाले शांत बिचारे गल्ल्यावर सुकले .. |१|
पाणी भयंकर सुटता तोंडी
खमंग बनते शेव पापडी
रिक्षामधले प्रणयपाखरू खुषीत का हसले .. |२|
तुमची ' माया ' - माझी किमया
कृतार्थ झालो , म्हणतो भैया ,
भेळकचोरीसाठी गिऱ्हाईक खोळंबुन बसले .. |३|
प्रतिक्रिया
21 Aug 2011 - 4:37 pm | कच्ची कैरी
रगडा पॅटीसचे नाव एकुन तोंडाला पाणी सुटले.
22 Aug 2011 - 11:17 am | निनाव
'माउथ वाटरिंग' कविता :). मना पासून आवडली.
22 Aug 2011 - 2:30 pm | पाषाणभेद
पाणीपुरी नसे ती असे शिवांबूपुरी
खाऊ नकाच उगीच ती येई ओकारी
गल्लीच्छपणातले किटाणू शरीरी शिरले ||४||
22 Aug 2011 - 2:50 pm | जाई.
मस्त