रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो,
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा.
मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी,
बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली.
"तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे.
रानफुल सुखावलं ..
रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती,
माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.
रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात ..
असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार.
जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल,
पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ?
-
आनंदयात्री
प्रतिक्रिया
20 Aug 2011 - 12:59 am | शुचि
त-र-ल!!! सुरेख.
>> रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो,
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा. >>
क्या बात है!
>> "तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे. >>
मस्त!!
20 Aug 2011 - 1:07 am | रेवती
लेखनही नाजुक वाटतय इतकं आवडलं.
आनंदयात्रींना व्हॅक्युमक्लीनर देवून ही कविता पूर्ण केल्याबद्दल सौ. यात्रींचे अभिनंदन!
20 Aug 2011 - 1:14 am | यकु
मस्त !!
आवडली.
20 Aug 2011 - 11:45 am | जाई.
कविता आवडली. शेवटच्या ओळी अप्रतिम आहेत.
20 Aug 2011 - 3:57 pm | पैसा
या कवितेचं कौतुक करायला माझ्याकडे इतके नाजूक, कवितेला शोभेलसे शब्द नाहीत.
20 Aug 2011 - 5:03 pm | सहज
सुकलेले रानफुल म्हणाले होते डायरी चालेल,
पण आंद्याला कुठे ठेवायचा?.. जनरितीनुसार?
उत्तर : अर्थातच त्याची जागा ताटाखाली. हॅ हॅ हॅ पुरुष कुठला!!
20 Aug 2011 - 5:38 pm | गणपा
ही कविता मिपावरच्या (नव)कवींच्या अभ्याक्रमात ( जी ऑप्शनला टाकता येणार नाही अशी) टाकली जावी काय?
आवांतर : हा मनुक्ष मोजकच लिखाण करतो पण जे लिहितो ते 'कोलीती'वालं.
20 Aug 2011 - 8:48 pm | प्रशांत
फारच छान..!
नेहमिच तुमच्या लिखनाच्या प्रतिक्षेत...
20 Aug 2011 - 8:46 pm | गणेशा
कविता छान ..
आनखिन येवुद्या
21 Aug 2011 - 5:11 am | चतुरंग
बरेच दिवसानी लिहलंस.
(रानभूल्)रंगा
21 Aug 2011 - 5:20 am | चित्रा
कविता आवडली.
21 Aug 2011 - 10:52 pm | सूड
स्पीचलेस !!
21 Aug 2011 - 11:13 pm | कुंदन
मस्तच बर का.
आवडली कविता.
22 Aug 2011 - 9:31 am | ऋषिकेश
अरे वा बरेच दिवसांनी लिहिलंस मात्र लिहिलंस ते (नेहमीप्रमाणे) चोक्कस!
मस्त!
22 Aug 2011 - 9:50 am | गवि
अफलातून.. ग्रेट...
22 Aug 2011 - 11:21 am | निनाव
अप्रतीम. भन्नाट. जबरा. खरंच _/\_.
व्वाह. पुन्हा पुन्हा वाचाविसी वाटते आहे ही कविता. छान.
22 Aug 2011 - 11:23 am | निनाद
गझलेच्या जवळ जाणारे काव्य आवडले.
त्यातही शेवट जास्त आवडला.
22 Aug 2011 - 11:26 am | स्पा
सुंदर ...................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
22 Aug 2011 - 1:20 pm | पल्लवी
काव्य आवडले.
22 Aug 2011 - 1:32 pm | क्रान्ति
नेहमीप्रमाणेच उत्कट, उत्कृष्ट!
22 Aug 2011 - 5:50 pm | विजुभाऊ
आंद्या ...........डायरेक्ट कविता ???
तेही लग्नानंतर इतक्या लवकर ;)
22 Aug 2011 - 6:05 pm | धमाल मुलगा
आमच्या आंद्यामधला 'आनंदयात्री' बर्याच दिवसांनी जागा झालेला दिसतोय.
उत्तम! त्याला आता झोपू देऊ नका साहेब.... :)
22 Aug 2011 - 7:00 pm | प्रभो
टिपीकल आंद्याटाईप कविता.. छान..
23 Aug 2011 - 3:48 am | धनंजय
नाजूक अनुभव आहे.
(रानफुलाचा पिंगट रंग डोळ्यांसमोर लवकर उभा राहात नाही.)
मस्त कल्पना.
("बेगडी" या स्पष्टीकरणात्मक शब्दाचा मोह टाळायला हवा होता, असे राहूनराहून वाटते.)
23 Aug 2011 - 5:12 am | नंदन
क्लास! काल कविता वाचली होती, पण काय प्रतिक्रिया लिहावी ते सुचलं नाही. निराळ्या अर्थाने, 'जाईन विचारीत रानफुला'ची आठवण झाली.
23 Aug 2011 - 8:40 am | श्रीराजे
मस्त मस्त..