अडकले शब्द अर्थांच्या साखळीत
जीवन त्यांचे झाले तसे अर्थहीन
नसून वजन तयांसी - वेढले अनर्थांनी
जडले असे वादास - झाले पराधीन
कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र
जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन
कुणी सडवले - न-वापरता - वाटे तयांसी हे धन
अभाव भावनेचे - दोष कुणाचा - शब्द मात्र स्वातंत्र्यहीन!
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 8:39 pm | प्रकाश१११
निनाव - छान जमलीय कविता -
कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र
जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन
20 Aug 2011 - 1:57 am | अभिजीत राजवाडे
छान विचार!!!
20 Aug 2011 - 2:59 am | शुचि
शेवटची तीन्ही कडवी आवडली.
पहीले कडवे कळाले नाही. कवितेच्या कनेक्टींग द डॉट्स मध्ये मी कोणता तरी डॉट चुकते आहे असे वाटते.
20 Aug 2011 - 11:53 am | मदनबाण
वा... :)