समान संधी मध्ये आजच्या
मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलो, अन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा
ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतो, पण
विनाकारण ' लाईनमन' होऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचे, पण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा
नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरला, पण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा
तरी एकदा बघा सभेत
मी मलाच बिच्चारा म्हंटलो
तर पहातो काय
स्त्रीयांचा हंडा मोर्चा
अंगावर धावून आला
कारण काय म्हणे तर
अबले पणावर त्यांच्या
आम्ही घाला घातला
आता कसले काय
घरातला हंडा ही
सावधानतेने घेतो
नळाखाली हळूच लावून
लोकमत ची सखी
अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा
-------- शब्दमेघ
नोट : कविता पुनःप्रकाशित.
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 4:15 pm | गणपा
------- शब्दमेघ गणुत्सु
कस वाटतेय ;)
19 Aug 2011 - 4:21 pm | गणेशा
कवितेचे पण विडंबन (बळेच ओढुन ताणुन केलेले) न आवडणारा मी .. उगा नावाचे विडंबन कश्यापायी भाउ.
आणि गणुत्सु असे कसे होयीन .. कारण माझ्या कित्येक कविता ह्या स्त्रीच्या आहेत.. आणि पुरुषाची ही एकुलती एक
19 Aug 2011 - 4:33 pm | गणपा
मी या कविते बद्दलच म्हटलं रे.
तुला का मी ओळखत नाही. :)
19 Aug 2011 - 4:36 pm | किसन शिंदे
'लाईनमन' या शब्दाचा दुसरा अर्थ असाही निघतो हे आज पहिल्यांदाच कळतंय..
बाकी कविता मस्तच..!
19 Aug 2011 - 4:44 pm | स्पा
मस्त
19 Aug 2011 - 5:34 pm | आत्मशून्य
.
19 Aug 2011 - 7:38 pm | प्रचेतस
एक नंबर कविता रे.
आवडली.
अवांतरः
हल्ली गृहशोभिका वाचत नाहीस काय? ;)
19 Aug 2011 - 8:47 pm | इंटरनेटस्नेही
आणि 'चारचौघी'?
-
एडिटर इन चीफ, 'चारचौघं'. ;)
19 Aug 2011 - 7:41 pm | प्राजु
उगी उगी!!! ;)
19 Aug 2011 - 8:44 pm | जातीवंत भटका
:) ह्म्म्म्म
19 Aug 2011 - 8:50 pm | इंटरनेटस्नेही
चांगली कविता.. गणेशा रॉक्स!
19 Aug 2011 - 9:05 pm | धमाल मुलगा
आता तू गेलास!
येतोय तुझ्यावर हंडामोर्चा. :D
19 Aug 2011 - 10:59 pm | अन्या दातार
वैनींना अजुन दाखवलेली दिसत नाहिए ही कविता! ;)
19 Aug 2011 - 11:07 pm | ५० फक्त
कुणाला काय दाखवायचं ते कळतं त्याला, एक तर वैनी अन दाखवा काय कविता, वैनीनं विचारलं या कवितेचा जन्म कुठं झाला तर काय बोलणार बिचारा पुरुष.
31 Aug 2011 - 9:19 pm | जयनीत
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ....
मस्त......