खूप पायवाट चालून आलो
खूप चढण चढून झाली
मागे वळून बघतो तेव्हा
आम्ही खूप सुखी होतो
असे खरेच वाटून जाते
असे मनात अलगद येते
कठीण होते सगळे जगणे
तरी खूप सुख होते
एक खांबी तंबू होता
तरी मनगटात जोर होता
तसा शप्पत घोर नव्हता
पाठीवरती हात होता
भक्कम असा आधार होता
हे शप्पत खरे होते .....!! !
काय केले बायकोसाठी ..?
कधीतरी गजरा आणला
तेवढ्याने ती तृप्त होती
माझ्या फाटक्या संसारात
शप्पत ती सुखी होती .....
एखादी साडी दिवाळीला
तेवढी ती पुरवीत असे
शब्दांचे कौतुक
तेवढे तिला पुरे असे
आता बघतो सगळी कडे
परदेशात आलो आहे
नि आजची पोरे बघतो आहे
घर आहे , गाडी आहे
छोटा असा संसार आहे
दोघेही शिकलेली
भक्कम अशी हुशार आहेत
परदेशात स्थिर आहेत
डोळ्यासमोर ध्येय आहे
मनामध्ये स्वप्न आहे
कसे कुणास ठाऊक
उगाच माझ्या मनात येते :
कोठल्यातरी दडपणाखाली
दबलेली.... थकलेली ..!!
एकटेच संसाराचा गाडा ढकलीत आहेत ...
पाठीवर हात ठेवून
धीर द्यायला कोण आहे ..?
ह्या परदेशात पोरे अगदी एकटी ..!
अगदी एकटी आहेत ......!!
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 9:56 am | मराठी_माणूस
पाठीवर हात ठेवून
धीर द्यायला कोण आहे ..?
ह्या परदेशात पोरे अगदी एकटी ..!
अगदी एकटी आहेत ......!!
विचार करुनच निवडलेले पर्याय असतात
19 Aug 2011 - 11:35 am | उदय के'सागर
माफ करा प्रकाश साहेब! पण परदेशात रहाणं हि ज्याचि त्याचि एच्छिक निवड असते...फार सहाजिकच ति मजबुरि असु शकते (जर तुम्हि पाकिस्तान, बांगलादेश वा अफगाणिस्तान अश्या सारख्या देशात रहात असाल तर, ति मजबुरि समजु शकतो.).
जर तुम्हाला महिति आहे कि तुम्हाला पर्याय आहेत, ज्याने तुम्हाला खरं सुख मिळु शकतं तर आपण तो पर्याय का निवडु नये?
मजबुरि वर वा दु:खा वर कविता आहेत अणि त्या मनाला भिड्तात देखिल, पण मला तरि हे दु:ख वा मजबुरि वाट्तं नाहि. म्हणुनच, एक कविता म्हणुन ह्यचि रचना जरि चांगली असलि तरि त्याचा मुळ गाभा मात्रं बिल्कुल भावलेला नाहि. (माझं व्ययक्तिक मत).
(कविता अवड्ली नसतांनाहि हि एवढि मोठि प्रतिक्रिया ह्यासाठि कारण खुप अपेक्षेने मि हा धागा उघडला होता)
19 Aug 2011 - 4:02 pm | गणेशा
प्रतिसादातील मताबद्दल आदर आहेच.
पण मला वाटते .. आपली मुले परदेशात आहेत.. आणि कधी तरी हा बाप तिकडे गेल्यावर त्याची मनाची स्थीती अशी असेल तर.
त्याच्याकडे पर्याय एकच आहे.. आणि ति कुठली जागा नाहि तर स्वताचे पोर आहे..
तरीही त्यांच्या हुशारीपलिकडची.. स्वप्नांच्या धुक्यातील गडबड दिसणारा बाप आणि आपल्या संसाराच्या फाटक्या झोळीचे आणि त्यातुन गळालेल्या आठवणींचे ओझे रिक्त होउन समोर शांत विचार करणारा हा बाप आवडला.
19 Aug 2011 - 12:00 pm | गवि
नेहमीचेच परदेशरुदन दिसले इथे. पुलेशु..
19 Aug 2011 - 1:48 pm | निनाव
प्रकाश दा, कविता मस्तच आहे. तुमचे मत निर्भिड मांडले आहे त्या बद्दल तुमचे कौतुक आहेच.
शेवटच्या कडव्यात ही कविता काही मुद्द्यांना वाव देउन जाते.. ते स्वाभाविक आहे. कारण कविता लिहिण्यापुर्वी कवि ही कविता वाचकांना आवडेल कि नाही, असे उद्देश्य ठेवून लिहित नाही.. आणिक तसे करणे कवितेचा आणिक वाचकांचा विश्वासघात करणे होईल.
कविता, भाषा, गाभा, व्याकरण -- चुक कि बरोबर हे स्वतंत्र मत आहे. आणिक आपण कविचा आणिक प्रत्येकाच्या विचारांचा तेवढाच आदर ठेवायला हवा.
उदय साहेब,
तुम्ही सुद्धा प्रामाणिक पणे आपले मत मांडले हे सुद्धा खूप प्रशंसनीय आहे. समोर च्या व्यक्ति चे मत आदर पुर्वक ठेऊन त्या बद्दल प्रामाणिक मत मांडणे हे खूपच कौतुकास्पद.
- आ. निनाव.
19 Aug 2011 - 2:53 pm | चाल क बि.एन
.......
बापाच ह्रद्य आक्रदन ...
नेहमिचच .
तुम्हाला वाटत .......
ह्या परदेशात पोरे अगदी एकटी ..!
अगदी एकटी आहेत ......!!
19 Aug 2011 - 4:06 pm | सहज
खरे तर काथ्याकुटाचा विषय!
पण विचार करुन पहा की खरचं मुले एकटी आहेत की बहुतांशी संभाव्य समस्या ज्याकरता आधार लागू शकतो त्या तंत्रज्ञान तसेच त्या त्या समाजातील व्यवस्थेने सोडवल्या आहेत?
19 Aug 2011 - 11:14 pm | चित्रा
पाठीवर हात तंत्रज्ञानाने कसा ठेवतात सांगाल का? :)
गणेशा यांच्या प्रतिसादातील "आपल्या संसाराच्या फाटक्या झोळीचे आणि त्यातुन गळालेल्या आठवणींचे ओझे रिक्त होउन समोर शांत विचार करणारा हा बाप" हे निरीक्षण चांगले आहे.
20 Aug 2011 - 12:48 am | रेवती
मला तरी कविता आवडली बुवा!