अण्णा हजारे

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
16 Aug 2011 - 9:44 pm

तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत.
एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत.

वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे
तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत

दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे
ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत

(मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)

कविता

प्रतिक्रिया

पंगा's picture

16 Aug 2011 - 9:49 pm | पंगा

मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी

त्यापेक्षा, अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या मिपावरील सर्व सभासदांनी आजपासून उपोषण सुरू केले तर?

(उपोषणकर्त्यांना मानसिक आधार म्हणून मिपाचा पाकृविभागही बंद ठेवता येईल.)

अभिजीत राजवाडे's picture

16 Aug 2011 - 10:18 pm | अभिजीत राजवाडे

ज्याला "क्ष" गोष्ट अशक्य वाटते, त्याने ती गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करण्यार्‍याच्या मार्गात अडथळा आणु\बनु नये.
काळ शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. थोडा धीर धरा हि विनंती.

विकास's picture

16 Aug 2011 - 10:51 pm | विकास

कविता आवडली...

ती काव्यमयच रहावी म्हणून मी माझ्याकडून नवीन ओळी घालायचे टाळत आहे. ;)