कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला. विजांचं तांडव बघताना दोन दोन मिनिटांच्या विडियो क्लिप्स रेकोर्ड केल्या आणि त्यातून विजांचे मस्त शॉटस मिळाले.
प्रतिक्रिया
15 Aug 2011 - 6:57 am | शिल्पा ब
छान आहेत.
16 Aug 2011 - 5:24 pm | जाई.
+१
15 Aug 2011 - 9:26 am | स्पंदना
पाहिल्यावर 'कड कडाड कड्ड " असा साउंड इफेक्ट आपोआप आला साहेब!
15 Aug 2011 - 9:33 am | चिंतामणी
श्रावणात असे दृश्य सहसा दिसत नाही.
छान फोटो आहेत.
15 Aug 2011 - 11:58 am | प्रचेतस
झकास फोटू.
बाकी विडियो क्लिप्स वरून तुम्ही शॉट घेतले आहेत पण जर स्टिल कॅमेर्यातून फोटो काढायचे असतील तर सेटींगबद्दल काही माहिती देउ शकाल का?
अवांतरः शीर्षक वाचून अंमळ गैरसमज झाला होता व या सिनेमाबद्दल काही आहे असे वाटले होते. :)

15 Aug 2011 - 5:43 pm | मराठे
वरिल सर्व फोटो/विडियो माझ्या फोनवरून काढले आहेत.. (आयत्या वेळी हाती लागेल अशा ठिकाणी क्यामेरा असेल तर शपथ) ;) त्यामुळे साध्या विडियो क्लिप काढल्या.. मग विडियो एडिटींग सॉफ्टवेअर मधून त्यातल्या फ्रेम्स फोटो म्हणून सेव्ह केल्या (लिनक्स वापरतो मी घरी, त्यावर अशी सॉफ्टवेअरं भरपूर आहेत.. मी पहिलं जे सापडलं तेच वापरलं.. नाव आठवत नाहीये. पाहिजे असल्यास घरी गेल्यावर बघून सांगतो.)
15 Aug 2011 - 6:09 pm | शैलेन्द्र
शटर स्पीड हाय.. अपार्चर स्मॉल, आय एस ओ लो.. पण थोडे स्वतःच करुन पहायला लागेल..
15 Aug 2011 - 9:23 pm | धनंजय
"शटर स्पीड लो" अशी सुरुवात करावी असे वाटते. कॅमेरा हलू नये म्हणून तिपाईवर रोवावा.
15 Aug 2011 - 10:49 pm | अन्या दातार
मी केलेल्या प्रयत्नांवरुन सांगतो १/५० वगैरे शटर स्पीड पुरतो. आयएसओ कमी ठेवा (१००) एक्स्पोजर (एफ स्टॉप) १०-११ पर्यंत ठेवा. तिपाई वापरायची गरज पडेल असे वाटत नाही. काही दिवसांतच फोटो इथे देईन :)
अजुन एक दुसरा ओप्शन आहे ज्यात तिपाई गरजेची आहे. पण सध्या ते आठवत नाही :(
17 Aug 2011 - 10:04 am | मनराव
+१
16 Aug 2011 - 7:19 am | मर्द मराठा
अगदी तंतोतंत कोणालाच सांगता येणार नाही.. सर्व त्या त्या वेळच्या भौगोलीक वातावरणावरती अवलंबून आहे (प्रकाश, ढग वगैरे).. तरी ही खाली दिलेली कृती मदत करू शकेल..
तुमचा डीएसएलआर असेल तर ...
आय एस ओ १००० च्या वर ठेवा... सुरुवातीला शटर प्रायोरीटी हा शूटिंग मोड करा.. कंटीन्युअस फ्रेमवर फिरवा (म्हणजे एकापेक्षा जास्त छायाचित्रे सलग घेतली जातील).. आणि शटर स्पीड १/१००० सेकंद ठेवा.. काही छायाचित्रे घेऊन पहा.. जे ठीक आले असतील त्यांचे फ आकडे पाहा.. शूटींग मोड 'मॅन्युअल' करा.. शटर स्पीड वरचाच कायम ठेवुन... वर नोंद केलेला फ आकडा सेट करा... अजून काही चित्रे घ्या... नंतर फ आकडा (F Stop) तुमच्या लेन्सचा कमीत कमी असेल तीतपर्यंत न्या..
तुमचा कॅमेरा जास्त आय एस ओ ला नॉईस दाखवत नसेल तर तो वाढवून (२००० ते ३००० पर्यंत) शटर स्पीड थोडा कमी केलात तरी चालेल... आणि हो हे सगळे तिपाई असेल तर मस्त जमते.. नाही तर कशावर तरी कॅमेरा ठेवायचा... पण बरीच सर्कस करावी लागते..
साध्या पॉइंट आणि शूट कॅमेर्याने काढताना...
'क्रिडा' हा शूटींग मोड ठेवा... ह्या मोड मधे कॅमेरा जास्त शटर स्पीडला एका पेक्षा जास्त फ्रेम्स घेतो.. त्यामुळे क्लिक केल्यावरही हात बराच स्थिर ठेवावा लागतो... हे कॅमेरे तितके चपळ नसल्याने... जिथे विजांचा चकचकाट होतोय.. तिथे कॅमेर्याची लेन्स करून क्लिक चे बटण अर्धे दाबून धरून ठेवावा... जेणे करून कॅमेरा फोकस होतो आणि एक्स्पोसर मीटर केले जाते... वी़ज पून्हा चमकली की पूर्ण कळ दाबा ..
16 Aug 2011 - 8:48 am | प्रचेतस
धन्यवाद.
वास्तविक पॉइंट आणि शूट कॅमेर्याने स्पोर्टस मोड वापरून बराच प्रयत्न केला होता, पण फोटो बरेच हलले होते.
आता परत प्रयत्न करण्यासाठी येथे (पक्षी पुण्यात) विजा चमकण्यासाठी मे महिन्यापर्यंत वळवाच्या पावसाची वाट पाहावी लागणार. :(
16 Aug 2011 - 9:28 pm | अत्रुप्त आत्मा
वीजे इतक्याच चपळाइने काढलेले फोटो...छान,छान...मस्त मस्त...: