एजबेस्टन कसोटीत भारताचा पराभव आता औपचारिकता राहिली आहे. प्रवीण कुमार ने प्रेक्षणीय खेळी केली तेवढीच भारताची जमेची बाजू. (मी आशावादी आहे पण म्हणून काय इशांत आणि श्रीशांत द्विशतके करतील? ).
मागच्या आठवड्यात मी ऑन लाईन तिकीट काढले तेव्हाच शेजारच्या डेस्क वरचा इंग्रज मला हसत होता. हाच मागे वल्ड कप च्या वेळी '' कसला वल्ड कप? ओहो ! क्रिकेटचा होय? '' म्हणाला होता, कारण इंग्लंड चे आव्हान तेव्हा संपले होते. त्याला वाटले मी बराच आशावादी आहे की भारतीय संघ किमान हरणार तरी नाही. मलाही ते पटत होते, पण मुख्य कारण होते लक्ष्मण, सचिन आणि द्रविड कदाचित इथे शेवटची मालिका खेळतायत. प्रत्यक्ष स्टेडीयम मध्ये जाऊन खेळ पहाण्याचा आनंद वेगळाच असतो. (पण कसले काय).
मागे एकदा जर्मनी मध्ये स्तुतत्गार्त आणि बायर्न मुनिक मधला फुटबॉल सामना पाहायचा योग आला होता आणि तो अविस्मरणीय अनुभव होता! म्युनिक कडे राष्ट्रीय संघातले बरेच खेळाडू होते. साहजिकच स्तुत्गार्त हरले आणि स्थानिक लोक त्यांच्या प्रशिक्षक आणि खेळाडूना शिव्या घालत होते.. '' एकेक मिलियन युरो घेतात आणि ...''
आता काळ बदलला, इथे लोक आय पी एल ला दोष देतात आणि '' सेकंदाला हजार पौंड घेऊन यांना आय पी एल खेळायला पाहिजे पण देशासाठी खेळायला नको '' असे म्हणतात. मला हा हजार पौंड चा हिशेब काही कळला नाही, असो.
लहानपणी बेदी आणि गावस्कर यांच्या संघाचे पाहिलेले अनेक पराभव विसरता येत नाहीत. पंचवीस वर्षे क्रिकेट पाहूनही प्रेक्षक म्हणून मला पराभव सहज पचत नाही. खेळाडूना असे होते का? तिकिट वाया गेले, ठीक आहे, कसोटीतला नंबर १ घालवल्याचे पण वाईट वाटले नाही. ज्या प्रकारे गेम सोडून दिला ते नक्कीच निषेधार्ह होते.
खेडूत
प्रतिक्रिया
13 Aug 2011 - 7:18 pm | चिंतामणी
:(
स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला असे होणे अधीक वाईट आहे.
13 Aug 2011 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रवीणकुमार आणि धोणीची फलंदाजी पाहिल्यावर आत्ता जरा बरं वाटलं होतं. खरं तर आपण आपली क्रिकेटमधील लाज टीकवण्यासाठी दंगलीचे कारण पुढे करुन शेपूट घालून मायदेशी परतावे असे मला वाटत आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर आणि भरपूर पैशासहित कौतुक झाल्याने खेळाडूंच्या हातापायाच्या हालचाली ’सखे मंद झाल्या तारका’ प्रमाणे झाल्या आहेत. मला तर सध्या एकाही भारतीय खेळाडूचं तोंड पाहावं वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
(संतप्त भारतीय क्रिकेटप्रेमी)
13 Aug 2011 - 8:10 pm | इरसाल
डॉ. शी सहमत.
साल्यांना IPL खेळायला सांगा.
पूर्वी पैश्यासाठी नितीमत्ता गहाण टाकत आता तर ...............
"सखे बंद झाल्या तारखा (IPL च्या )"
14 Aug 2011 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इरसालसेठ, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज म्हणून मिरवणार्या फलंदाजांनी गेल्या तीन कसोटीत जे शेपूट घातलं तो एक खेळाचा भाग म्हणून समजून घेता येईल. खेळ म्हटल्यावर हार-जीत चालायचीच हेही जड अंतःकरणाने आपण मान्य करु पण आज पेप्रात वाचलं डेली मेल ने म्हणे आपल्या टीमला 'मरतुकडे कुत्रे' म्हटले आहे. आरं तिकडं कोणी मिपाकर राहात असेल तर डेली मेलच्या संपादकाकडे (पत्र व्यवहार करा रे) जरा पाहा रे....! :)
-दिलीप बिरुटे
15 Aug 2011 - 11:39 am | इरसाल
डॉ. साहेब.
ती बातमी मी पण पहिली टीवी वर.
आता आपले खेळाडू डिफेन्स वर उतरलेत. पळवाटा शोध्तायेत
बाकी पत्रव्यवहार करून काही होणार नाही.जिथे एवढ्या मोठ्या टीम ला भिक नाही घालत तिथे पत्राची काय वासलात लावतील ?
14 Aug 2011 - 11:14 pm | मी-सौरभ
अपली टीम सध्या बॅड पॅच मधून जात आहे...त्यांना शुभेच्छा !!
चॅम्पियन्स लीग मधे हेच परत जोमाने खेळू लागतील बघ!!!
15 Aug 2011 - 1:06 pm | गणपा
खेळतीलही कदाचीत जिंकतीलही...
पण महाराजा जो हौद गयी वो बुंदसे नही आयेगी. ;)