हे आहे पूर्वाश्रमीचे गोराई डंपिंग ग्राउंड. फोटो गोराई खाडीतल्या बोटीमधून घेतला आहे.
ही कचर्याची टेकडी जवळ जवळ ८ मजली इमारती इतकी उंच आहे आणि १७ एकर जागेवर पसरली आहे. आता अत्याधुनीक तंत्रज्ञान वापरून हिच्यावर हिरवळ निर्माण करण्यात आली आहे. कचर्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करून, वर माती टाकून तिथे इको गार्डन बनवण्यात येत आहे. येत्या काही वर्षातच ह्या जागेचा पूर्ण कायापालट झाला असेल. कचर्यातून निर्माण होणार्या मिथेन गॅसचा उपयोग वीज निर्मीती साठी करण्यात येणार आहे. हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
लवकरच आजूबाजूच्या इमारतींचे भाव (अजूनच) गगनाला भिडतील. सी-फेसींग अशी जाहिरात असणार्या नव्या इमारतीही उभा राहतील.
ह्या फोटोचे चपखल वर्णन करणारी म्हण म्हणजे 'दुरून डोंगर साजरे' :)
मुंबईतील एकूण ८० हेक्टर जागेवर डंपिंग ग्राउंड्स पसरली आहेत. त्या सगळ्यांचीच वाटचाल ह्या दिशेने होणार आहे.
प्रतिक्रिया
10 Aug 2011 - 6:09 pm | अशोक पतिल
नक्कि नाहि,पण कदाचीत पवइ तलाव असावा.
10 Aug 2011 - 6:12 pm | नन्दादीप
गोराई... डम्पिंग ग्राऊंड...
10 Aug 2011 - 6:31 pm | वपाडाव
असेच म्हंतो....
10 Aug 2011 - 8:52 pm | प्रभो
मी पण हेच म्हणतो.
10 Aug 2011 - 6:21 pm | आचारी
एखाद्या नदि तीरावर असावी
10 Aug 2011 - 7:11 pm | गणपा
मुंबीत नदी? आणि ती ही इतकी स्वच्छ?
अॅड्या इसविसन किती मद्ये काढलायस रे हा फोटू? ;)
बहुतेक आमच्या बोरिवली जवळचा असवा. :)
10 Aug 2011 - 8:46 pm | आचारी
गणपा !!
फोटो मधे मागे उन्च इमारती दिसत आहेत !! म्हणजे हि नक्कीच मुम्बई असणार !!
10 Aug 2011 - 8:58 pm | गणपा
माझ्या माहितीत मुंबईत ज्या ४ नद्या आहेत त्या या....
मीठी नदी.
दहिसरची नदी.
पोईसरची नदी.
ओशिवारा येथील नदी.
वर अॅडीने दिलेली स्वच्छ नदी मी तरी आजवर पाहिली नाही.
11 Aug 2011 - 7:14 am | नितिन थत्ते
मला वाटतं ही खारघरची (नवी मुंबई) टेकडी आहे.
11 Aug 2011 - 3:19 pm | जाई.
पवई तलाव
11 Aug 2011 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार
हनुमान टेकडी.
11 Aug 2011 - 5:48 pm | गणेशा
घारपुरी बेट आहे का हे ?
अवांतर : कदाचीत नसेन पण पुढच्या महिन्यात ट्रिप फिक्स झाल्या कारणाने म्हंटले चुकुन दगड लागला तर तेव्हडेच फ्री जाता येइल
11 Aug 2011 - 5:54 pm | गणपा
निकाल कधी?
11 Aug 2011 - 7:45 pm | आदिजोशी
हे आहे पूर्वाश्रमीचे गोराई डंपिंग ग्राउंड. फोटो गोराई खाडीतल्या बोटीमधून घेतला आहे.
ही कचर्याची टेकडी जवळ जवळ ८ मजली इमारती इतकी उंच आहे आणि १७ एकर जागेवर पसरली आहे. आता अत्याधुनीक तंत्रज्ञान वापरून हिच्यावर हिरवळ निर्माण करण्यात आली आहे. कचर्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विघटन करून, वर माती टाकून तिथे इको गार्डन बनवण्यात येत आहे. येत्या काही वर्षातच ह्या जागेचा पूर्ण कायापालट झाला असेल. कचर्यातून निर्माण होणार्या मिथेन गॅसचा उपयोग वीज निर्मीती साठी करण्यात येणार आहे. हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
लवकरच आजूबाजूच्या इमारतींचे भाव (अजूनच) गगनाला भिडतील. सी-फेसींग अशी जाहिरात असणार्या नव्या इमारतीही उभा राहतील.
ह्या फोटोचे चपखल वर्णन करणारी म्हण म्हणजे 'दुरून डोंगर साजरे' :)
मुंबईतील एकूण ८० हेक्टर जागेवर डंपिंग ग्राउंड्स पसरली आहेत. त्या सगळ्यांचीच वाटचाल ह्या दिशेने होणार आहे.
11 Aug 2011 - 7:47 pm | आदिजोशी
नन्दादीप, वडापाव आणि प्रभो ह्यांना कबूल केल्याप्रमाणे बगिचा जनतेसाठी खुला होताच ह्या ठिकाणाची सहल घडवण्यात येईल.