<<ज्योतिष - भाकीताचा पडताळा>>

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
10 Aug 2011 - 7:19 am

मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसत

माझे भाकित

"दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल."

पेपर म धली बातमी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms

या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच...

टिप - ही जाहिरात नव्हे

ज्योतिष

प्रतिक्रिया

सहज's picture

10 Aug 2011 - 7:40 am | सहज

एक दुवा इथेही

महाराष्ट्र पोलीस नोंदीनुसार क्रमवार दिनांकानुसार गुन्हे/हिंसक घटना यादी मिळेल का?

नितिन थत्ते's picture

10 Aug 2011 - 7:56 am | नितिन थत्ते

पौर्णिमा ९ ऑगस्टला होती की १३ ऑगस्टला आहे?

बाकी सहज रावांनी दिलेली यादी स्वाध्याय म्हणून (आव्हान म्हणून नव्हे) युयुत्सुंनी वापरावी.

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 8:10 am | युयुत्सु

प्रत्येक ग्रह योगाचा प्रभावकाल असतो. मूळ ले खात त्याविषयी लिहीले आहे.

मूळ ले खात त्याविषयी लिहीले आहे.

मूळ ले नावाचा खायचा पदार्थ असतो हे नविनच कळलं.
खात खात वाचणारी लोकं आहेत हे माहिती होतं. खात खात लिहिणारीही माणसं असतात हे नव्हतं माहिती बुवा :)

धनाजीराव,

कमाल आहे तुम्हाला ले चिप्स माहीत नसावेत? अगदी मागच्या पिढीतले दिसता.

मूळ ले म्हणजे ओरिजिनल फ्लेवर हो.

बाकी हे झाले अतिअवांतर.

मूळ लेखविषयाविषयी:

आंदोलकांवर गोळीबार ही बातमी हायलाईट केली हे ठीक. लंडनमधेही दंगली चालू आहेत. कोकणात पावसाचा हाहाकार तर पूर्व महाराष्ट्रात दुष्काळ.. अमेरिकेत आर्थिक संकट, शेअरबाजार कोसळला वगैरे असं वंगाळ वंगाळ चालू आहे. त्यामुळे तो पौर्णिमा इफेक्ट आहे अशी सॉलिड खात्री होऊ शकते..

पण...आता असं बघू.. या सर्व गोष्टी कायमच कुठे ना कुठे चालू असतातच की. आणि या गोष्टींची मुळं कधीपासून अस्तित्वात आहेत कोण जाणे? काल पुण्यात चारजणांचा बळी गेला म्हणून बातमी आली. काश्मिरात, पाकिस्तानात रोजच याहून घातक कारवाया आणि घटनांत अनेक बळी जातात. तिथल्या स्थानिक पेपरांत त्याच्या बातम्या येत असतील किंवा नसतीलही.

पण हे आजच नव्याने घडले आणि रेग्युलरली घडत नाही असे वाटत नाही.

शिवाय, पेपर्स साधारणपणे "हादसा" अशा स्वरुपाच्या बातम्याच देत असतात. विधायक कामे, चांगल्या घटना यांना आतली पाने दाखवली जातात. हेडलाईन "सनसनीखेज"च असते.

मागे टारझनने अशाच प्रकारच्या लेखावर एक झकास प्रतिक्रिया दिली होती. त्यात तो असे काहीसे म्हणाला की मटा किंवा लोकसत्ता वाचलात.. त्या ऐवजी पोलीस टाईम्स वाचत असाल तर रोजचाच दिवस माईंदळ अशुभ वाटेल..

युयुत्सु's picture

10 Aug 2011 - 9:58 am | युयुत्सु

पण...आता असं बघू.. या सर्व गोष्टी कायमच कुठे ना कुठे चालू असतातच की.

त्यांचे ग्रह योग वेगळे असू शकतात. मी फक्त अमावस्य आणि पौर्णिमे बद्दल बोलत आहे.

नितिन थत्ते's picture

10 Aug 2011 - 10:25 am | नितिन थत्ते

पण काल कुठे पौर्णिमा/अमावास्या होती? (मावळ तालुक्यात युयुत्सु पंचांगानुसार काल पौर्णिमा असल्यास खुलासा करावा).

युयुत्सु यांनी मागेच म्हटल्याप्रमाणे ७ दिवसांचा टॉलरन्स अधिक ७ दिवसांपर्यंतची (क्षम्य) एरर हिशोबात धरा आणि मग बघा.

उदय's picture

13 Aug 2011 - 4:41 am | उदय

पौर्णिमेपासून +/- ७ दिवस आणि अमावस्येपासून +/- ७ दिवस धरले की युयुत्सु ९५ ते १००% बरोबर. आव्हान न घेताच सिध्द झाले. हा.का.ना.का. :)

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 10:29 am | आत्मशून्य

यूयूत्सूराव हे अशी पोळी शेकणं ताबडतोप थांबवा... आणी "टिप - ही जाहिरात नव्हे" अशा थापा इतरांना मारा, जे कोण मेले त्यांची जन्म तारीख तूम्ही दीलेल्या गूणवत्ता यादीत होती की न्हवती हे देखील तपासायचा शहाणपणा दाखवल्याचा पूरावा न देता उचलली जिभ लावली टाळ्याला असं करू नका.....

अहो आत्मशून्य.. तुम्ही जरावेळ थांबा. दमानं घ्या.

आता प्रयोग करुन पाहण्याची जुळणी होत आहे ना. मग आता मधेच वेगळे वळण देऊ नका. तुम्ही काहीतरी म्हणाल आणि युयुत्सुसाहेब वैयक्तिक घेऊन नकोच प्रयोग असे म्हणतील.

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 10:59 am | आत्मशून्य

ठीक आहे, मी माझे शब्द मागे घेत आहे. यूयूत्सूरावांनी(व इतरांनी) माझा या धाग्यवरील प्रतीसाद संपूर्ण दूर्लक्शीत करावा. संपादकांनी तो उडवला तरी हरकत नाही.