३१ जुलैच्या शुभ अमावस्येने अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले आता पुढे काय आहे ते बघायला हवे.
सहसा मी पौर्णिमेविषयी लिहीत नाही अशी बर्याचजणाची तक्रार आहे, पण या खेपेस लिहायचे ठरवले आहे. कारण आगामी पौर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे ते बघता लोकाना सावध न केल्यास तो एक प्रकारचा ज्योतिषाशी अप्रामाणिकपणा ठरण्याची शक्यता आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल. या पौर्णिमेला गोचर मंगळ, गोचर हर्षल, आणि गोचर प्लुटो हे एकमेकांशी त्रासदायक योगांमध्ये येत असून ते पौर्णिमेच्या रवी-चंद्राशी पण तापदायक योग करतात. पौर्णिमेचा प्रभावकाल चालू झाला असून पौर्णिमेनंतर आठ दिवस धोकादायक आहेत.
या पौर्णिमेच्या तडाख्यात सापडलेल्या जन्मतारखांचे गणित मी जसे तयार होईल तसे या ठिकाणी देत राहीन. आज कोणत्याही सनात जन्मलेल्या ज्या जन्मतारखाना ही पौर्णिमा विशेष त्रासदायक ठरेल त्या तारखा पुढे देत आहे.
अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
प्रतिक्रिया
7 Aug 2011 - 1:46 pm | वेताळ
आमची जन्मतारिख त्यात येत नाही.
7 Aug 2011 - 3:13 pm | युयुत्सु
अजून सर्व गणित पूर्ण झालेले नाही.
7 Aug 2011 - 2:13 pm | गणपा
पण काठावर पास झालो आहे. बघुया काय होतय ते.
7 Aug 2011 - 2:16 pm | आशुडि
बर.
7 Aug 2011 - 4:17 pm | धन्या
युयुत्सुराव, अमेरिकेतही या गोष्टी मानतात का? म्हणजे फुल मुन नाईट/ नो मुन नाईट चे बरे वाईट परीणाम मानवी जीवनावर होतात असे अमेरिकन मानतात का? जिज्ञासेचं शमन करण्यासाठी या विषयावर लेखन असलेले काही दुवे देऊ शकाल का? (आमच्या अमेरिकेच्या वास्तव्यात आम्ही अमेरिकनांबरोबर विविध विषयांवर विचारमंथन केले आहे. गणेशजन्माची कथा सांगून झाल्यानंतर आलेल्या "डीस्पाईट ऑफ बिईंग गॉड, हाउ लॉर्ड शिवा कॅन किल हिज न्युबॉर्न किड?" या निरागस प्रश्नाला आम्ही "लॉर्ड शिवा इज गॉड ऑफ डीस्ट्रक्शन. ही कॅन डू एनिथिंग." असे समर्पक उत्तर दिलेले आम्हास चांगले आठवते. हा ग्रह तार्यांचा मानवी जीवनावर होणारा परीणाम हा विषय मात्र तेव्हा चर्चेतून सुटला.)
तसेच तुमच्या या वाक्याचा संदर्भ आम्ही नुकत्याच झालेल्या परदेशी घर घेण्याच्या चर्चेच्या संदर्भात लावत आहोत. त्या चर्चेचा सुर एकंदरीत असा होता की, अमेरिकेत काही भारतीय तिथल्या बाजाराच्या परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करुन, बँकांकडून कर्ज काढून नंतर ते बुडवतात. त्यामुळे बँका आणि पर्यायाने अमेरिकन अर्थव्यवस्था डळमळीत होते (आठवा: लेहमन ब्रदर्स. लेहमन ब्रदर्स सारख्या मोठया वित्तसंस्था डुबल्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असे आम्हास म्हणायचे आहे. कॄपया भारतीयांनी लेहमन ब्रदर्स डुबवली असा अर्थ काढू नये.). परंतू भारतीय जनमानसावर अमावस्या आणि पोर्णिमा या दिवशीच्या (किंवा रात्रीच्या) शुभ- अशुभ फलांचा खुपच पगडा आहे. मग तो भारतीय अशिक्षित असो, सुशिक्षित असो, निवासी असो किंवा अनिवासी असो. (आमच्या एका ह्युस्टन स्थित सहकार्याने नुकतीच कुठलीतरी नावाजलेली कार घेतली. नासाचं केंद्र असलेल्या त्या ह्युस्टन शहरात या वरीष्ठ संगणक अभियंता असलेल्या पठ्ठ्याने ब्राम्हण शोधून काढून कारमध्ये बसायच्या आधी कारची विधीवत पुजा केली. आमच्या लिखाणात ह्युस्टनचे उल्लेख आल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर आम्ही दिलगीर आहोत.) असे असल्यामुळे या अमावस्येच्या वाईट फलांचा विचार करुन भारतीयांनी अशी "विशेष" गृहखरेदी न केल्यामुळे अमेरिका आर्थिक पेचातून तरली असे म्हणायचे का?
हे अगदी उत्तम केलेत तुम्ही. ज्या समाजात आपण वाढतो, लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. त्या समाजाची हाक आपण ऐकायलाच हवी. आणि तसंही आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेही कसलाही भेदभाव करु नये.
माउली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात,
गायीची तृषा हरू | का व्याघ्रा विष होऊनी मारू | ऐसे नेणेची का करू | तोय जैसे ||
पाणी जसे ही गाय आहे हिची तहान भागवतो, हा वाघ आहे याला विष होउन मारतो असा भेदभाव करत नाही. तसेच ज्योतिषानेही अमावस्या आणि पोर्णिमा असा या तिथींमध्ये भेदभाव करु नये. दोन्ही तिथींना समान न्याय दयावा. आपण त्या दिशेने पावले उचलली आहेत हे कौतुकास्पद आहे.
उत्तम. हल्ली अशी निस्पृहता कुठे दिसते? नैतिकतेची - अनैतिकतेची चाड कुणालाच राहीली नाही. आपल्या तत्वांशी, पेशाशी किंवा व्यवसायाशी प्रामाणिक राहण्याचे दिवस इतिहासजमा झालेत. असे असताना आपण ज्योतिषाशी प्रामाणिक राहून पोर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे त्याबाबत लोकांना सावध करत आहात त्याबद्दल आपले आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत. आमची आपणांस एक नम्र विनंती आहे की हे महान कार्य आपण केवळ अमावस्या आणि पोर्णिमा या दोन तिथींपुरते मर्यादीत न ठेवता ते चतुर्थी, एकादशी, शिवरात्र अशा इतरही तिथींसाठी सुरु करावे.
तुम्हाला थोर समाजसेवक अण्णा हजारेंचं संभाव्य उपोषण आणि ते झालं तर त्यानंतर होणार्या घटना याकडे तर अंगूलीनिर्देश करायचा नाही ना? तसे असेल तर आपण मानलं तुम्हाला. किती अचुक आणि नेमकं भविष्य वर्तवलं आहे आपण.
इथे मला एक शंका आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणून अभियांत्रिकीची विदयाशाखा आहे हे आपणास बहुधा ठाऊक असेलच. तर यामध्ये न्युरल नेटवर्क म्हणून प्रकार असतो. काहीशी आपल्या मेंदूमधील मज्जारज्जूंची प्रतिकृती. यात होतं काय तर, हे न्युरल नेटवर्क आधी विशिष्ट माहिती देऊन प्रशिक्षित केलं जातं. नंतर त्याला आपल्याला ज्या माहितीवर निष्कर्ष काढायचा आहे ती माहिती पुरवली जाते. न्युरल नेटवर्क आवर्तनांमध्ये आपले काम सुरु करते. आधीच्या आवर्तनात काही चुक झाली तर ती पुढच्या आवर्तनात सुधारली जाते. हे सगळं असंच आहे असं नाही. परंतू थोडेफार असेच आहे. (बघा आम्हालाही तुमच्या क्षेत्रातील खिसाभरु ज्योतिषांप्रमाणे गोलमाल बोलता येते की नाही :) )
तर आता माझा प्रश्न असा आहे की, तुम्ही पोर्णिमा/अमावस्या यांच्या प्रभावाचे गणित प्रभावकालातील प्रत्येक दिवशी मांडता का? (ग्रहणाच्या संदर्भात या प्रभावकालाला वेधकाळ म्हणतात. इथे काय म्हणायचे? ) समजा, आजचे गणित चुकले तर ती चुक उद्याचे गणित मांडताना सुधारली जाते का?
आपल्या सुचनेनुसार आपल्या अनुदिनीवर जाऊन वाचले. तिथे विशेष काही वाचावयास मिळाले नाही. हा लेख जसाच्या तसा तिथे आहे. अधिक एकाखालोखाल एक अशा आठ ओळींत तारखांचे आठ गट तेथे आहेत. ते तारखांचे गट आपणांस येथेही देता आले असते असे आम्हास वाटते. आपण वाचकांना आपल्या अनुदिनीकडे नेण्यासाठी "अधिक वाचण्यासाठी इथे भेट दया" असे लिहू नये असे आमचे प्रांजळ मत आहे. याला काही लोक हीन पणन तंत्र अर्थात चीप मार्केटींग टेक्निक असे दुषण देण्याचा संभव नाकारता येत नाही. आमच्या सुचनेचा सकारात्मक विचार करावा हि विनंती.
क. लो. अ.
आपलाच,
धनाजीराव वाकडे
7 Aug 2011 - 4:24 pm | प्रचेतस
धनाजीराव, अगदी समर्पक, मुद्देसूद प्रतिसाद.
प्रतिसाद अतिशय आवडला हे या ठिकाणी नमूद करत आहे. :)
7 Aug 2011 - 5:24 pm | युयुत्सु
श्री धनाजीराव वाकडे यांस,
हो. मानतात. आधुनिक ज्योतिष मला शिकवणारी माझी गुरु मेरी डाऊनिंग अमेरिकनच होती. तसेच मी ज्योतिषात वापर्त असलेलं तंत्र दोन जर्मन ज्योतिर्विदानी विकसित केलेलं आहे.
ज्योतिषात न्युरल नेट्वर्कचा उपयोग भाकितात अचूकता आणण्यासाठी केला काही जणानी केला आहे. त्याचे दूवे आपल्याला नक्की पाठविन.
नाही. पण काही वेळा त्याचा विचार करावा लागतो. इथे सविस्तर लिहीणे शक्य नाही.
लेख किचकट गणितामुळे हळुहळु तयार होत आहे. आता आपण बघितलात तर त्यात आणखी माहिती आपल्याला बघायला मिळेल.
आपल्या शंका मनापासून आवडल्या. त्यांचे निरसन झाले असेल असे वाटते.
7 Aug 2011 - 7:20 pm | धन्या
अरे वा. छान. तुमच्या गुरुचे या संदर्भातील काही लेखन जालावर आहे का? तसेच ज्योतिष हा प्रकार सर्वसामान्य नागरीकांमध्ये प्रचलीत आहे का? आपल्याकडे ज्योतिषावर ढिगाने ब्लॉग असतात. त्यांच्याकडेहे असतात का? तुम्ही या क्षेत्रातले जाणकार असल्यामुळे मी मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जालावरचे दुवे देऊ शकाल काय?
ज्योतिष पाहण्यासाठी तुम्ही कोणती पद्धती वापरता? माझ्या माहितीप्रमाणे भारतीय ज्योतिषी वैदिक पद्धती आणि कृष्णमूर्ती पद्धती यापैकी एक वापरतात.
हा खरं तर धक्काच आहे. मी माझ्या प्रतिसादात मी न्युरले नेटवर्कचे केवळ उदाहरण दिले होते. इथे तर तुम्ही न्युरल नेटवर्कचाच वापर होतो असे म्हणताय. हा वापर कसा केला जातो हे वाचायला उत्सुक आहे. दुव्यांच्या प्रति़क्षेत. याच धाग्यात दिलेत तर उत्तम.
शाळेच्या परिक्षांमध्ये काही प्रश्नांसाठी एक सुचना असते, "खालिल प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा." तुम्हीही थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करु :)
असहमत. मुळात आमचं हे मत आम्ही तुमच्या आवसं-पुनवंला येणार्या लेखांच्या निरिक्षणांती बनवलेलं आहे. आताही तुमच्या अनुदिनीवर जाउन पाहिले. तिथे फक्त तारखांच्या गटांमध्ये वाढ झाली आहे. बाकी बदल काहीच नाही. हे तुम्ही इथे मिपाच्या लेखाला अदययावत करुनही करु शकला असता. अहो या मिपाने एकेकाळी डॉनरावांचे मेगाबायटी प्रतिसाद पचवले आहेत. तुमच्या आमच्या किलोबायटी लेख आणि प्रतिक्रियांची काय कथा :)
धन्यवाद.
अंशतः होय/नाही. तुम्ही तुम्हाला सोयीच्या मुद्दयांची तुम्हाला सोयिस्कर अशी उत्तरे दिली आहेत. :)
7 Aug 2011 - 5:25 pm | युयुत्सु
श्री धनाजीराव वाकडे यांस,
हो. मानतात. आधुनिक ज्योतिष मला शिकवणारी माझी गुरु मेरी डाऊनिंग अमेरिकनच होती. तसेच मी ज्योतिषात वापर्त असलेलं तंत्र दोन जर्मन ज्योतिर्विदानी विकसित केलेलं आहे.
ज्योतिषात न्युरल नेट्वर्कचा उपयोग भाकितात अचूकता आणण्यासाठी केला काही जणानी केला आहे. त्याचे दूवे आपल्याला नक्की पाठविन.
नाही. पण काही वेळा त्याचा विचार करावा लागतो. इथे सविस्तर लिहीणे शक्य नाही.
लेख किचकट गणितामुळे हळुहळु तयार होत आहे. आता आपण बघितलात तर त्यात आणखी माहिती आपल्याला बघायला मिळेल.
आपल्या शंका मनापासून आवडल्या. त्यांचे निरसन झाले असेल असे वाटते.
7 Aug 2011 - 8:54 pm | रमताराम
ज्योतिषात न्युरल नेट्वर्कचा उपयोग भाकितात अचूकता आणण्यासाठी केला काही जणानी केला आहे.
आमच्या मते न्यूरल नेटवर्क अचूक उत्तर देत नाही. (तसा कोणताच अल्गो अचूक असत नाही) किंबहुना तो अल्गो हा अन्य गणिती, संख्याशास्त्रीय अल्गोंपेक्षा कमी अचूकता देणारा आहे असा आमचा समज आहे. हा संगणकाधारित अल्गो आहे नि त्याची उपयुक्तता आमच्यासारख्या गणितींच्या दृष्टीने पुरेशी नाहीच (कारण बरेचदा ती फारशी विश्वासार्ह पद्धतीने मोजता येत नाहीच). हां आता धंदापाण्याच निर्णय घेणारे े ( सो कॉल्ड बीआय वाले) चालवून घेतात झालं. आणि हो सामान्यपणे संगणकाधारित अल्गो हे तुमच्या सहीत म्हटल्याप्रमाणे असतात, त्यांचे ट्रेनिंग चुकीचे वा सोयीने करून हव्या त्या दिशेने निष्कर्ष वळवणे शक्य असते.
कुठल्यातरी गणिती वा संगणकीय पद्धतीने ज्योतिष निष्कर्षात अचूकता येते की नाही हे तेव्हाच मान्य करता येण्याजोगे आहे जेव्हा असा अभ्यास औषधनिर्माणक्षेत्रात जितक्या काटेकोरपणे नि जितक्या पारदर्शी पद्धतीने हा अभ्यास केला जातो तितक्या काटेकोरपणे केला असेल तर. नाही तर 'कुठलातरी डेटा घ्यावा, तो कुठल्यातरी अल्गोमधून चाळून काढावा, हवा तो निष्कर्ष काढावा (नाही मिळाला तर अल्गो बदलावा नाहीतर डेटा, हाकानाका)' हे आहेच. :)
7 Aug 2011 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
+१०००००००००००००००
युयुत्सुराव तुंम्ही जे जे होणार आहे असं वर्तवताय त्या सगळ्या गोष्टी मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत...त्या कायम घडत असतात.आणी त्यांच्याच ''तडाख्यात'' तुमच्या तिथ्या/ग्रहयोग वगैरे ज्योतिषशास्त्रीय भानगडी सापडत असतात...ग्रहयोग आणी तत्सम ज्योतिष शास्त्रीय भानगडींचा मानवी जीवनातील घटनांशी काडीमात्र संमंध नाही...
7 Aug 2011 - 7:31 pm | धन्या
युयुत्सुरावांच्या कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. या सहीत फेरफार करुन म्हणायचं झालं तर कोणत्यातरी बर्या-वाईट गोष्टी निवडाव्यात, त्यांची तिव्रता कमी जास्त दर्शवावी, कुठल्यातरी तारखांच्या गटाच्या बाबतीत या गोष्टी होतील असे लिहावे, कुणाच्यातरी बाबतीत नक्की होईल.
7 Aug 2011 - 5:52 pm | विनायक प्रभू
जे आयला,
हे तक्रार करणारे कोण महान लोक हो?
असो.
धनाजी राव,
तुमच्या इथे भेट द्या ह्या सुचनेवर सुचक मौन का बरे असावे युयु त्सु रावांचे?
7 Aug 2011 - 7:25 pm | धन्या
गुरुजी, अशी लोकांची गोची करणारे प्रश्न निदान चार चौघात तरी विचारु नयेत ;)
तुर्तास तुमच्या प्रश्नाचे उत्तर जयंतरावांच्या सहीत मिळतंय का पाहा:
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
7 Aug 2011 - 5:29 pm | भारतीय
१३ ऑगस्ट ला रक्षाबंधन असून हा अत्यंत आनंददायी दिवस आहे.. कोण कुठले ग्रह तारे जिथे फिरायचे तिथे फिरु देत, तोपर्यंत मी बहीणीसाठी छानशी भेटवस्तू घेण्यासाठी फिरणार आहे..
7 Aug 2011 - 7:36 pm | धन्या
ह्याला म्हणतात स्पिरिट :)
तुम्ही स्वतःही काही करणार आहात की फक्त प्रतिक्षाच करणार आहात :P
7 Aug 2011 - 7:10 pm | ज्योत्स्ना
१३ ऑगस्ट ला रक्षाबंधन असून हा अत्यंत आनंददायी दिवस आहे.. कोण कुठले ग्रह तारे जिथे फिरायचे तिथे फिरु देत, आपण आनंद करणारच आहोत :)
7 Aug 2011 - 7:43 pm | पप्पु अंकल
विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती चारही दिशांना झाली असली, तरी आजची तरुण पिढी आमच्या पिढीपेक्षा अधिक अंधश्रद्धाळू बनली आहे. जीवनातील वाढलेली गुंतागुंत, एकाच वेळी अनेक निर्णय घेण्याची निकड आणि ही आव्हाने स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम नसल्यामुळे त्यांना कोणातरी फलज्योतिष किंवा बाबाची मदत घ्यावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘लोकसत्ता’ परिवाराशी संवाद साधताना केले.
तरुण पिढी अशाप्रकारे जास्त अंधश्रद्ध बनत असतानाच आता विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत बोलणारे राजकारणीसुद्धा भेटत नाहीत, अशी खंत नारळीकर यांनी बोलून दाखविली. अर्थात यावर एका रात्रीत उपाय सापडणार नाही, तर त्यासाठी मुलांमध्ये विज्ञानविषयक अधिकाधिक जागरुकता वाढवावी लागेल, असे ते म्हणाले. अतिशय शांत व सौम्य स्वभावाच्या नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी आपल्या सौम्य भूमिकेचे ठाम समर्थन केले. ‘याबाबत आक्रमक भूमिका घेतली तर लोक अंधश्रद्धा अधिक कवटाळून धरतात,’ असे त्यांनी सांगितले.
-लोकसत्ता 07 August 2011
7 Aug 2011 - 8:28 pm | रमताराम
...अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले...
आं. काय सॉलिड कॉन्फिडन्स आहे ब्वॉ तुमचा. आमचा असा समज आहे की असा निश्चित दावा अजून एखादा अमेरिकन इकनॉमिस्टदेखील करायला धजावणार नाही. बिचारे अजून दहा वर्षे काटकसरीने काढतील तेव्हा जरा बरे दिवस येतील त्यांना, म्हणे.
बाकी भविष्य, फल वगैरे आपला प्रांत नव्हे त्यामुळे त्याबाबत आपली अळिमिळी गुपचिळी.
7 Aug 2011 - 8:47 pm | शैलेन्द्र
ची भना त्या चंद्राच्या.. बाल्याला पकरुन पोकल बांबुचे फटके मारतो जे मी जाम.. पयल्या धारेची लावन खंबाल्पार्याच्या दर्ग्यावर बसलान, की पोर्णीमा न अमावस्या एकच दिसते जे..
7 Aug 2011 - 10:26 pm | धन्या
हा खंबाल्पार्याच्या दर्गा कुटं हाय रं? नं मनापन तिकरं यायाचा हाय बोल...
7 Aug 2011 - 10:47 pm | शैलेन्द्र
ठाकुर्ली स्तेसन्मागुन कल्यान्करे चालाव.. हिर्व्या रंगाचा दर्गा दिसतो जे खारीच्या काठानं.. जाम भारी जागा बोल..
8 Aug 2011 - 9:43 am | स्पा
तेजाला शैलेंदर बाला....
तू राहतस कुट्ट र
आम्ही बी जायचो न .. दर्ग्यान , नि मंग समोरच्या खारीत चीम्बोर्या पक्राय्चो .
8 Aug 2011 - 7:19 pm | शैलेन्द्र
मीनी सारस्वत कालनीन रावतो, डोंबिवलीन.. प्यार्टीन जावतो ना खारीला , न दर्ग्याला.. चिंबोर्या.. जाम भारी बोल... तेजाला, बिल्डींगा व्हायच्या पयले मटन पार्टी करायचो बाल्या लोक सगले... क भारी दीवस होते.. आता पण जातो हिवाल्यान, बदक येताव रशीयातुन.. फोटु काढाव जातो त्यांन्च्याभना..
8 Aug 2011 - 9:37 am | युयुत्सु
श्री धनाजीराव वाकडे यांस,
आपण व्यक्त केलेली जिज्ञासा शमविण्यासाठी केवळ वानगीदाखल दोन दूवे देत आहे. मॅरी डाउनिंग आता हयात नाहीत. त्यांचे बरेचसे लेख ब्लॉग संस्कृती अस्तित्वात येईपर्यंत लिहिले गेलेले असल्याने ते फक्त National Council for Geocosmic Research या संस्थेच्या जर्नल मध्ये आपल्याला सापडतील.
१ http://www.traders-software.com/download/Alphee%20Lavoie%20-%20Neural%20...(Article)/Alphee%20Lavoie%20-%20Neural%20Networks%20in%20Financial%20Astrology.pdf
२.http://www.star4cast.com/index2f.asp?page=forum_article.asp?id=1
३. मी वापरत असलेल्या तंत्राची माहिती करून घेण्यासाठी इथे भेट द्या - http://www.cosmoastrology.com/introduction-to-cosmobiology
बाकी आपण माझ्यावर केलेला हीन पणन तंत्राचा आरोप मला मान्य नाही. मिसळपाव वर सर्व माहिती उपलब्ध केल्यास, ज्योतिषाचा आंधळेपणाने तिरस्कार करणारे सर्व्हर वरील जागा वाया जाते अशी बोंब मारायला कमी करणार नाहीत. लोक उलटसुलट कसेही बोलतात. त्यामुळे मी जे केले आहे ते योग्यच आहे असे मला वाटते.
मी प्रसिद्ध केलेल्या तारखांचे वैशिष्ट्य आपल्या लक्षात आले नाही याची मला गंमत वाटली. आज पर्यंत केवळ राशींपुरते भविष्य वर्तविण्याची पद्धत प्रचारात आहे. यामुळे ज्योतिषाचे हसे झाले आहे. बाधित जन्मतारखा शोधून काढल्याने मी एक प्रकारे value addition केले आहे असे मला वाटते.
असो, लेख अजून संपायचा असल्याने जास्त सविस्तर लिहू शकत नाही
8 Aug 2011 - 11:11 am | धन्या
दुव्यांसाठी धन्यवाद... वाचेन निवांत...
एबर्टीन पद्धतीबद्दल याआधी वाचलं आहे :)
या तंत्राला कॉस्मॉबायॉलॉजी का नाव दिलंय हे कळत नाही.
Cosmobiology is the correlation between the cosmos, and the individual, in terms of psychological and sociological makeup, and the timing of specific events in our lives. ही तिथली कॉस्मॉबायॉलॉजी ची व्याख्या आहे. परंतू माझ्या माहितीप्रमाणे जीवशास्त्रात psychological and sociological makeup, and the timing of specific events in our lives यातल्या कुठल्याच गोष्टींचा अभ्यास होत नाही. जाणकार यावर प्रकाश टाकू शकतील...
बातमें दम नही हैं युयुत्सुबाबू... तीस पस्तीस ओळी लिहताच ना... त्यात दहा पंधरा ओळी और सही...
आणि तशीही मिपावर तुमच्या लेखांना बोंब मारतातच.. ;)
ह. घे. :)