ते दिवस आता कुठे

अरूण म्हात्रे's picture
अरूण म्हात्रे in जे न देखे रवी...
3 Aug 2011 - 1:41 am

ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची

दूर ती गेली तरी ही सावली भेटायची...

त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी

हात देताना तिला माझीच फांदी व्हायची

पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे

चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची

वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती

ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची

कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे

नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची

गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे

सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची

फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी

पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

कविता

प्रतिक्रिया

गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे

सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची

सुरेख!!

फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी

पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

ह्या ओळी कोणाच्या तरी सहीमध्ये आधी वाचल्या होत्या. फिदा झाले होते (आहे) त्या ओळींवर.

खूप दिवसांपासून (पुपे च्या सहीत वाचल्यापासून) ही कविता कुठे मिळेल का बघत होतो. पुर्ण कविता वाचल्यावर खूपच आवडली.

त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची

आणि

गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची

फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

हे अफलातून आहे. तुमच्या अजून कविता वाचायला आवडतील.

अर्धवट's picture

3 Aug 2011 - 10:14 am | अर्धवट

+१

असेच म्हणतो

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 1:36 pm | मेघवेडा

तंतोतंत.

"फाटके होते खिसे.." अफलातूनच. "कैक वाटा.." सुद्धा आवडला.

अजून वाचायला आवडेल.

नगरीनिरंजन's picture

3 Aug 2011 - 10:50 am | नगरीनिरंजन

मस्त कविता!

"फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी

पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची"

हे तर खासच.

मनराव's picture

3 Aug 2011 - 10:57 am | मनराव

मस्त........!!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2011 - 11:05 am | अत्रुप्त आत्मा

क्या बात है...!

और पीलाईये जाम एसे,एक से दील भरता नही
प्यास भी अधुरी है,और प्यासा भी अधूरा...रह जाता है....!

प्रत्येक कडवे खास!
अतिशय सुंदर रचना.. खूप खूप आवडली..
येऊ देत अजून!! :)

राघव

पाषाणभेद's picture

3 Aug 2011 - 1:48 pm | पाषाणभेद

खुपच सुंदर

किसन शिंदे's picture

3 Aug 2011 - 2:06 pm | किसन शिंदे

मस्तच कविता!!!

आपली माझी आवडती कविता येथे वाचायला दिल्यामुळे खुप छान वाटले.
गेल्याच वेळेस ही कविअत द्या असे बोलणार होतोच..

पुन्हा पुन्हा वाचावी असी मस्त कविता ...

जागु's picture

3 Aug 2011 - 2:22 pm | जागु

कविता आवडली. खुप छान.

पल्लवी's picture

4 Aug 2011 - 3:12 pm | पल्लवी

मस्तं शब्द !
मस्तं कल्पना !
मस्स्स्स्तं नादमय कविता ! :)

शैलेन्द्र's picture

4 Aug 2011 - 7:33 pm | शैलेन्द्र

खुपच छान कविता.. अगदी आतुन आल्यासारखी.. पावसातुन, मातीतुन उमलल्यासारखी .. फारच छान..

अभिजीत राजवाडे's picture

6 Aug 2011 - 2:16 am | अभिजीत राजवाडे

नमस्ते,

तुम्हाला आठवत नसेल पण नक्की साल आठवत नाही बहुतेक २००२ असावे, पुणे फेस्टीवलमधे मराठी कवी संमेलनात आपण भेटलो होतो. तिथे तुम्ही हि कविता गायली होती.

मी हि कविता लिहुन काढली होती आणि त्यावर आपण स्वाक्षरीही दिली होती. माझ्या जवळ ती अजुनही आहे.

बर्‍याच दिवसांनी सर्व आठवणी ताज्या झाल्या. कविता मिसळपाववर टाकल्याबद्द्ल खुप खुप आभार.

मला तुमची अजुन एक कविता आवडते "तुला पाहिले मी फुले वेचताना...".

गणा मास्तर's picture

7 Aug 2011 - 9:27 pm | गणा मास्तर

फार फार वर्षांपुर्वी मी दूरदर्शनवर एका मुलाखतीत ही कविता ऐकलेली.
पुर्ण कविता वाचुन आनंद झाला.
वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती
ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची

ह्या ओळी खरडवहीत जाउन बसल्या आहेत.

असंका's picture

1 Jul 2015 - 9:15 pm | असंका

सुरेख!

धन्यवाद!