आई बाबा

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
28 Jul 2011 - 8:05 pm

"बाबा .. शाळेत पैसे द्यायचे आहेत .. जाणार आहे दोन दिवस सहल!!"
"अरे वा... देतो नक्की पर्वा .. खूप कर रे धमाल.. "
"आणि मला promise केली होती ना बाहुली आणि भातुकली"
"म्हणजे काय!! घेणारच आहे गं छ्कुली .."

"झकास पास झाला की घेणार आहे दादाला Hero Honda CD
आधी पासूनच ठरवलं ... होत आहे mature एक जुनी FD ..
आणि पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवशी घेऊया तुमच्या आईला साखळी सोन्याची"
"छे!! आता नको काही, काय करायचे ते हिला, झाली की आपली मुलगी लग्नाची"

असे आपले आई बाबा सतत करत मुलांचाच विचार
आपल्या पिलांसाठीच झटणं - ह्यालाच म्हणतात का संसार?
मुलांना वाढवणं, त्यांच पालन, त्यांचे हट्ट, त्यांच शिक्षण
जबाबदार्या पार पाडत नकळत सरले असतील गोड वाईट क्षण

बाबा फार केलत तुम्ही, दमला असाल... घ्या जरा आता विश्रान्ती...
तुमच्यासाठी काहीतरी करायची आम्हाला देखील द्या एक संधी
हे ना ॠण, ना कर्ज, ना करता येईल कधी परतफेड
हेच आई बाबा सात जन्मी लाभो असे ऐकणारा असतो का कुठे वेगळा वड

कविता

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

29 Jul 2011 - 2:14 pm | स्वैर परी

शेवटची ओळ विशेष आवडली!
बाकि कविता पण छानच!

नन्दादीप's picture

29 Jul 2011 - 3:02 pm | नन्दादीप

शेवटची ओळ विशेष आवडली!

RUPALI POYEKAR's picture

29 Jul 2011 - 2:42 pm | RUPALI POYEKAR

सहमत

शुचि's picture

29 Jul 2011 - 11:59 pm | शुचि

सुंदर!!

नि३सोलपुरकर's picture

30 Jul 2011 - 5:17 pm | नि३सोलपुरकर

हे ना ॠण, ना कर्ज, ना करता येईल कधी परतफेड
हेच आई बाबा सात जन्मी लाभो असे ऐकणारा असतो का कुठे वेगळा वड.

सुंदर!! ....खुप सुंदर

न कळत डोळ्याच्या कडा पाणावल्या......

पियुशा's picture

31 Jul 2011 - 4:00 pm | पियुशा

मला पण शेवट्ची ओळ फार फार आवड्ली :)

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:16 am | इंटरनेटस्नेही

शेवटची ओळ विशेष आवडली!