समस्त मिपाकरहो,
आमचे मित्र सूड यांनी नुकताच काढलेला शतकी धागा वाचनमात्र झाला आहे. त्यामुळे कट्ट्याचे नक्की काय होणार हे कुणालाच कळले नाही. ते सांगण्यासाठी हा धागा काढत आहे. बेत आधी ठरलेलाच आहे. तपशील खालीलप्रमाणे
स्थळ :- स्वाद (शाकाहारी थाळी) , ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. (स्टेशन पासून जवळ आहे आणि प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारा, प्रकारचे )
दिनांक :- शनिवार ३० जुलै रोजी संध्याकाळी ६:३०
कार्यक्रम :- अमर्यादित थाळीचा आणि अमर्यादित गप्पाटप्पांचा आस्वाद.
कुणाला काही शंका असेल तर प्रतिसादातून विचारा अथवा मला, स्पाला किंवा सुधांशू देवरुखकर उर्फ सूड याला व्यनि करा.
सध्या ज्ञात असलेली कट्टेकरांची यादी . सदर यादी ही शतकी धागा आणि व्यनि यातून तयार केली आहे. कुणाची नावे कमीजास्ती करायची असतील तर तसे कळवा. ही यादी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल
- गगनविहारी
- रामदास काका
- स्पा
- सूड
- किसन शिंदे
- विमे
- लीमाऊजेट
- विलासराव
- इंटरनेटस्नेही
- मिसळलेला काव्यप्रेमी
- विजुभाऊ
- निखील देशपांडे आणि मस्त कलंदर (यांना १ धरायचे की २ ? :-) )
- अमोल खरे
- वसईचे किल्लेदार
- प्राची
कुंपणावरचे कट्टेकरी (म्हणजे ज्यांचे अजून नक्की ठरले नाही ते)
- स्वानंद
- सर्वसाक्षी
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला विनम्र (काय दिवस आलेत ;-) )
विश्वनाथ मेहेंदळे
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 12:48 pm | मितभाषी
शुभेच्छा!!!!!!!!!! :)
28 Jul 2011 - 12:51 pm | इंटरनेटस्नेही
कुठल्याही परिस्थीतीत, नक्की येणार कट्ट्याला.
28 Jul 2011 - 12:54 pm | सुनील
शुभेच्छा!
28 Jul 2011 - 1:05 pm | पंगा
(नॉट बीइंग अ ग्रूप पर्सन) कट्टा-संकल्पनेत व्यक्तिशः रस नाही (आणि तसाही कट्ट्याच्या कक्षेत नाही पण असतो तरी वरील कारणामुळे आलो नसतो), पण कट्टा (एकदाचा) ठरला हे वाचून अतीव आनंद झाला. अभिनंदन आणि कट्ट्यास शुभेच्छा. मजा करा!
जो जैसे वांच्छील तो तैसे कट्टे भरवो.
28 Jul 2011 - 1:07 pm | सर्वसाक्षी
५.३० ला भेटणार म्हणजे जेवण निदान ७.३० ला तरी मागवावेच लागेल. ७.३० अमर्याद थाळीला फार लवकर होतात असे वाटते. (एक शंका : स्वाद थाळीवाले आपल्याला तासनतास बसू देतील का? शनिवार म्हणजे गिर्हाईक जोरदार म्हणुन विचारतो)
(कुंपणावरचा गावकरी) साक्षी
28 Jul 2011 - 1:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आधी ५:३० ठरलेले. नंतर ६:३० ला ठरले. ते बदलायचे चुकून राहून गेले. आत्ता चूक सुधारली आहे.
तुमचा वेळ लवकर असण्याचा मुद्दा बरोबर आहे. गवि स्वाद वाल्यांशी बोलले आहेत. बघू. नाही तरी थोडा वेळ बाहेर गप्पा मारू.
गटारी असल्याने स्वाद ला गर्दी कमी असू देत असे विशफुल थिंकिंग सध्या करतो आहे.
28 Jul 2011 - 1:21 pm | गवि
तसेही कोणतेच हॉटेल जेवण होण्याआधी / झाल्यावर तासनतास बसू देणार नाही. ते गृहीत धरून जेवण झाल्यावर वेळ आणि मूड पाहून तिथून पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावर एका बागेत ऑलरेडी वर्तुळाकृती ओपन एअर कट्ट्याची (ओपन थिएटर टीप) सोय आहे. तिथे ऑलरेडी अत्रे कट्टा भरतोही. त्यामुळे पाऊस नसल्यास तिथे जाऊन गप्पा मारत बसता येईल.
28 Jul 2011 - 1:25 pm | पंगा
यामागील नेमके गृहीतक कळले नाही.
'पिणेकरी हे सहसा शुद्ध शाकाहारी नसतात' किंवा 'शुद्ध शाकाहारी हे सहसा पिणेकरी नसतात' यांपैकी नेमके काय गृहीत धरले आहे? (दोन्ही गृहीतकांत विशेष तथ्य नसावे असे वाटले म्हणून विचारले. विघ्नसंतोष नव्हे, गैरसमज नसावा.)
28 Jul 2011 - 1:49 pm | नितिन थत्ते
शुशा लोकसुद्धा पिणेकरी असतीलच त्यामुळे स्वाद मध्ये न येता ते त्याची सोय असलेल्या ठिकाणी जातील असे गृहीतक असावे.
28 Jul 2011 - 1:43 pm | बबलु
कट्ट्याला अनेक शुभेच्छा. मजा करा लेको.
मेहेंदळे साहेब, सगळ्या कंपुंच्या तुलनेत तुमचा गृप सर्वात छान मिपा-कट्टे अॅरेंज करतो असे ऐकून आहे.
28 Jul 2011 - 2:54 pm | स्वानन्द
>>मेहेंदळे साहेब, सगळ्या कंपुंच्या तुलनेत तुमचा गृप सर्वात छान मिपा-कट्टे अॅरेंज करतो असे ऐकून आहे.
गटतट उभे करून त्यांत फूट पाडण्याचे प्रचंड पोटेंशिअल असलेले वाक्य :P
हलकेफुलके घेणे :)
28 Jul 2011 - 6:24 pm | वपाडाव
किंबहुना असेही म्हणता येइल की या धाग्याला शतकी वाटचाल कराया लावणारा किरकोळ, फुटकळ प्रयत्न !!!!
पण मिपाकर जाणकार झाल्येत... ते असल्या भूलथापांना बळी पडणारे नव्हेत...
28 Jul 2011 - 10:04 pm | आत्मशून्य
29 Jul 2011 - 10:19 am | बबलु
>>>> किंबहुना असेही म्हणता येइल की या धाग्याला शतकी वाटचाल कराया लावणारा किरकोळ, फुटकळ प्रयत्न !! पण मिपाकर जाणकार झाल्येत... ते असल्या भूलथापांना बळी पडणारे नव्हेत.
बॉर बॉबॉ !!!! :)
29 Jul 2011 - 10:17 am | बबलु
>>> हलकेफुलके घेणे.
हे हे हे... नो प्रॉब्लेमो. :)
29 Jul 2011 - 11:03 am | विश्वनाथ मेहेंदळे
कसचं कसचं !!! पण बबलू राव, आम्ही तर ऐकले होते की बे विभागातील कंपू सर्वात मस्त कट्टे करतो. वृत्तांत टाकत नाही ती वेगळी गोष्ट आहे. आता सिद्धहस्त वृत्तान्तकार पूर्व किनाऱ्याला गेले म्हणून काय वृत्तांतच लिहू नये ??
29 Jul 2011 - 11:35 pm | शिल्पा ब
<<<, आम्ही तर ऐकले होते की बे विभागातील कंपू सर्वात मस्त कट्टे करतो.
यस, द्याट इज राईट.
आम्ही मस्त कट्टे करतोच आणि काहीतरी खुसपट कारणाने रद्द बिद्द करत नाहीत. एखाद्याच्या घरी जमुन किंवा पार्कात जास्त वेळ एंजॉय करता येते. तुम्ही आपले हाटेलं शोधा.
30 Jul 2011 - 2:02 am | आत्मशून्य
का ? तिकडे हाटेले नाहीते कै ? का स्त्रियांना हाटेलेत जाण्यास बंदी है पल्याड ?
31 Jul 2011 - 11:39 am | शिल्पा ब
जास्त वेळ एंजॉय करता येते
31 Jul 2011 - 6:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे
भारी चिंता हो तुम्हाला, आमच्या एंजॉयमेंट ची. पण कसे आहे ना, आम्ही मुंबईतील माणसे खुराड्यात राहतो, तुमच्या हिरव्या देशातल्या सारखी मोठमोठाली घरे नसतात आमची. त्यामुळे आम्हाला मन मारून (स्वतःचेच) हॉटेलात करावा लागतो हो कट्टा.
शिवाय कुणाच्या घरी केला तरी फार उशिरा पर्यंत नाही ना करता येत. कट्टा संपवताना एक नजर रेल्वे च्या वेळापत्रकावर ठेवावी लागते. काय आहे ना, की मुंबईत आम्ही रेल्वेने प्रवास करतो. एक तर माझ्या सारख्या गरीब माणसाला कार परवडत नाही. शिवाय सरकारने पेट्रोल चे दर खूपच वाढवले हो. मग उशिरा थांबलो तर घरी कसे जाणार हो?
असो, तुम्ही कधी येताय भारतात? आपण तुमच्या घरी करू की कट्टा. पब्लिक जंगी उपस्थिती लावेल हो. लास्ट ट्रेन चुकली तर तुम्ही काहीतरी व्यवस्था करणार असे गृहीत धरून, घड्याळाकडे न बघता थांबू. काय बोलता ??
31 Jul 2011 - 11:35 pm | मी-सौरभ
आमी बी येऊ कट्ट्याला...
प्रवास खर्च मिळणार असेल तर बे एरियाला बी जायाची तयारी हाये आपली
4 Aug 2011 - 9:18 pm | आनंदयात्री
अरे हो .. विसरलोच होतो, काकू अमेरिकेत आहेत नाही कां .. विसरलोच होतो .. हं चालायचेच !!
(पळ्ळा..)
31 Jul 2011 - 12:59 pm | माझीही शॅम्पेन
अहो मावशी घरात करणार असाल तर त्याला ओटा म्हणायचा की ? कारण कट्टा रूढ़-अर्थाने घरच्या बाहेर असतो :)
28 Jul 2011 - 1:50 pm | धमाल मुलगा
शाब्बास रं वाघरा! :)
झकास मजा करा. त्या 'स्वाद'लाही जरा झणझणीत मिसळपावाची तर्री काय असते ते कळू द्या. :)
आणि हो, नंतर कट्टावर्णन, फोटू बिटू टाकायच्या वेळी चालढकल करु नका रे!
28 Jul 2011 - 4:31 pm | नावातकायआहे
+१ झकास मजा करा.
28 Jul 2011 - 4:47 pm | गवि
माहिती: स्वादमधेच अत्यंत झणझणीत तर्रीदार मिसळ मिळते. कोणाला ऐनवेळी हवीशी वाटली तर तीही मागवता येईल. किंवा सुरुवातीला ती चापून मग थाळी असंही करता येईल..
28 Jul 2011 - 5:26 pm | धमाल मुलगा
मग तर सोन्याहुन पिवळं!
मिपाच्या कट्ट्याला मिसळपाव ह्यासारखा गोड..अर्रर्र..चुकलो, झणझणीत योग नाही. :)
पण मला सांगा, त्या मिसळपावच्या तर्रीला मिसळपाव.कॉमच्या तर्रीची सर आहे का? तर मी तेच स्वादवाल्यांना कळूद्या म्हनतोय. :)
28 Jul 2011 - 2:44 pm | वसईचे किल्लेदार
मी सूद्धा येईन म्हणतो ... आपली परवानगी असल्यास ...
28 Jul 2011 - 2:48 pm | गवि
परवानगी? काय बोलता किल्लेदार... अहो निमंत्रण आहे हे निमंत्रण..
28 Jul 2011 - 2:55 pm | वसईचे किल्लेदार
प्रथमच येतोय (आता येतोच) म्हणून ...
28 Jul 2011 - 2:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अहो किल्लेदार भाउ, सदर धागा हा केवळ FYI नसून गवि म्हणाले तसे निमंत्रण आहे. कुठलाही मिपाकर याला येऊ शकतो, त्याला परवानगी देणारे वा न देणारे आम्ही कोण?
मागील कट्ट्याच्या वेळेला तर वपाडाव पार पुण्याहून आला होता. या वेळेला पण येईल अशी आशा आहे.
वप्या, जमते आहे का रे ?
28 Jul 2011 - 6:24 pm | वपाडाव
बघतोय रे,
पण फार पुसटशी शक्यता आहे?
आप्ल्याला कट्टे भरवायला लै आवडतात रे !!!
28 Jul 2011 - 4:18 pm | चिमी
नमस्कार,
शुभेछा .
पुढचा कटटा पुण्यालाच करा. म्ह्ननजे आम्हाला पण येता येइल.
28 Jul 2011 - 6:27 pm | वपाडाव
करुयाच की...
मागील वेळेस आपण मिपावर नव्ह्ता काय?
सरुटॉबाने -१
सरुटॉबाने -२
28 Jul 2011 - 7:12 pm | सूड
मकमावशी कुठे आहेस गं !!
28 Jul 2011 - 5:13 pm | प्रचेतस
कट्ट्यास अनेकानेक शुभेच्छा.
साद्यंत वर्णन लवकर टाका.
28 Jul 2011 - 6:02 pm | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा!
आमच्या गोडबोले म्हातार्याची काळजी घ्या. लै वाभरट आहे त्ये! ;)
28 Jul 2011 - 8:09 pm | चतुरंग
सांगताय बिका?
गडबोले बोलायला बसले की काळजी इतरांनी करायची असते! ;)
-गडूरंग
28 Jul 2011 - 6:19 pm | स्मिता.
ठाणे कट्ट्याला शुभेच्छा! दुसर्या दिवशी फटुसहित वर्णन टाकायला विसरू नका म्हणजे झालं.
28 Jul 2011 - 6:29 pm | निवेदिता-ताई
कट्ट्याला अनेक शुभेच्छा.
28 Jul 2011 - 6:38 pm | विशाखा राऊत
कट्ट्याला अनेक शुभेच्छा.
28 Jul 2011 - 8:04 pm | ५० फक्त
आज गुरुवार संपला आणि अथक प्रयत्न करुनहि शनिवार साठी एखादा बकरा कापु शकलो नाही, त्यामुळे फक्त शुभेच्छा.
स्पावड्या साडेसातला फोन करेन रे,तुला मंगलाश्ट्कं म्हणेन्, ऑनलाईन म्हण्जे फोन लाईन वरुन, चालेल ना.
29 Jul 2011 - 6:34 pm | वपाडाव
माझापण +१
आमचे येणे जमणे नाही....
28 Jul 2011 - 9:55 pm | आनंदयात्री
बेष्ट रे भो .. फोटु टाका ही रिक्वेष्ट.
>>निखील देशपांडे आणि मस्त कलंदर (यांना १ धरायचे की २ ? )
अडीच पावणे तीन ... (हॅ हॅ हॅ .. आकारमानाने हो !! (तीन म्हणनार होतो, पण अनर्थभयाने बोललो नाही ;) )
28 Jul 2011 - 10:07 pm | पंगा
'तीन' न म्हणून जो अनर्थ टाळायचा होता, तो 'अडीच-पावणेतीन'ने अधिक चांगल्या रीतीने व्यक्त होतोय, असे वाटते... ;)
असो.
29 Jul 2011 - 12:54 am | बिपिन कार्यकर्ते
तुझी समाधी बांधायला घेतलीये रे! ;)
29 Jul 2011 - 2:55 am | आनंदयात्री
बृटस यु टु !!
29 Jul 2011 - 12:54 pm | गणपा
झाली का नाय पुर्वतयारी उद्याच्या कट्ट्याची?
सर्वाना शुभेच्छा... मस्त धमाल करा.
वृत्तांत आणि फटु टाका कट्ट्याचे. (मेन्युचे नाय टाकलेत तर उत्तम) ;)
29 Jul 2011 - 1:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> (मेन्युचे नाय टाकलेत तर उत्तम)
असे कसे? थोडासा सूड (खरा सूड, आपला सुधांशू नाही) उगवू दे की :-)
29 Jul 2011 - 1:03 pm | मृत्युन्जय
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
29 Jul 2011 - 2:54 pm | स्पा
हजेरी लावल्या जाईल
29 Jul 2011 - 4:31 pm | ५० फक्त
फक्त हजेरी लावल्यास मार दिल्या जाईल..
29 Jul 2011 - 5:27 pm | सूड
तुम्हाला येणं शक्य नाही म्हणताहात, मग मार कसा व्हर्च्युअल देणार का ??
29 Jul 2011 - 5:30 pm | प्रचेतस
मार देण्यासाठी काही सदस्यांना आधीच गुप्तपणे सांगून ठेवणेत आलेले आहे. ;)
29 Jul 2011 - 5:51 pm | ५० फक्त
''तुम्हाला येणं शक्य नाही म्हणताहात, मग मार कसा व्हर्च्युअल देणार का ''''
वरच्या एका प्रतिसादात कल्पना दिलेली आहे ना, मार कसा देणार ते, आणि फिजिकल मार देणं परवडणार आहे का रे मला, तिथं दुर्लक्षित पँथरचे अध्यक्ष असणार ते सोडतील का काय मला. रेनकोट घालुन किंवा रेनकोटात घालुन मारतील.
29 Jul 2011 - 6:00 pm | इंटरनेटस्नेही
आम्ही आता छत्री वापरतो! ;)
-
:D इंट्या छत्री.
29 Jul 2011 - 6:41 pm | वपाडाव
देव, तुम्ही जे वापरता त्याचं रक्षण करो...*(छत्री तर छत्री, रेनकोट तर रेनकोट)*
-गुरु गुलाब खत्री
29 Jul 2011 - 6:15 pm | सूड
>>वरच्या एका प्रतिसादात कल्पना दिलेली आहे ना, मार कसा देणार ते,
हा हा आत्ता नीट वाचलं ते !! मग अष्टकंच कशाला अष्टकाची आवर्तनं करा. आम्ही पण येऊ आवर्तनं करायला, पण दक्षिणेचं काय ते बघा.
29 Jul 2011 - 9:02 pm | रेवती
कट्ट्याला शुभेच्छा!
मी इनो घेणार.;)
29 Jul 2011 - 10:07 pm | प्राची
मेहेंद्ळे काका,माझंपण नाव लिहा यादीत.मीपण येणार कट्ट्याला.
30 Jul 2011 - 2:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>मेहेंद्ळे काका
कुणी रे माझे वय सांगितले मिपा वर ?? असा गेम करण्यापेक्षा एकदा सरळ येऊन नडा ना, काय व्हायचे ते हौन जौ दे. अरे ओळख आहे आपली. खुरटेवाडी बुद्रुक मध्ये निघणाऱ्या पेपरच्या हापिसातला प्यून आपल्या ओळखीचा आहे बरं... काय समजता आपल्याला ???
>>माझंपण नाव लिहा यादीत.मीपण येणार कट्ट्याला.
जरूर ये. ते वरच्या वाक्याचे मनावर घेऊ नकोस :-)
30 Jul 2011 - 2:26 pm | किसन शिंदे
असा गेम करण्यापेक्षा एकदा सरळ येऊन नडा ना, काय व्हायचे ते हौन जौ दे. अरे ओळख आहे आपली. खुरटेवाडी बुद्रुक मध्ये निघणाऱ्या पेपरच्या हापिसातला प्यून आपल्या ओळखीचा आहे बरं.
हॅ हॅ हॅ
लै भारी...! :D :D
31 Jul 2011 - 8:02 am | नरेशकुमार
अरे व्वा ! त्यो आपल्या पन वळखिचा आहे.
1 Aug 2011 - 12:34 pm | बबलु
>>>> एकदा सरळ येऊन नडा ना, काय व्हायचे ते हौन जौ दे. अरे ओळख आहे आपली. खुरटेवाडी बुद्रुक मध्ये निघणाऱ्या पेपरच्या हापिसातला प्यून आपल्या ओळखीचा आहे बरं.
खि खि खि ..... "पेपरातली ओळख" चा घाव मस्त मारलाय. किती लोकांना कळला काय माहित ? :) :)
1 Aug 2011 - 1:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नाही कळणार फार लोकांना. ज्यांना कळायचा त्यांना कळले तरी खूप झाले.
असो, सध्या "आम्ही स्वान्तसुखाय प्रतिसाद लिहितो" असे म्हणतो. नंतर मत बदलले तर "माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता" किंवा "मी विनोदाने, उपहासाने लिहिले होते, हे लहान मुलाला पण कळेल" असे म्हणून अंग काढून घेईन.
फारच शेकायला लागले अंगावर तर वर सांगितलेली ओळख आहेच. :-)
2 Aug 2011 - 10:05 am | सूड
काका, व्हर्च्युअल गंमत म्हणायचं असतं म्हणे त्याला !!
(परेश उरबडवी) ;)
2 Aug 2011 - 12:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>(परेश उरबडवी)
गडबडा लोळून हसणारी स्मायली !!!
बाकी तुझी स्वाक्षरी या प्रतिसादाला परफेक्ट शोभून दिसते आहे रे.
2 Aug 2011 - 1:29 pm | बबलु
बाय द वे.... विमे काका, आपूनची "सामना" प्येपरात ओळख हाये बरंका ?? जास्त बोलायचा काम न्हाई. :) :)
त्यामुळे मला बळं बळंच घाबरा बरंका तुमी. :) ;)
;) ;)
3 Aug 2011 - 11:46 am | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही, बबलूराव, तुम्ही मस्करी करत आहात, पण एका महाभागाने खरेच मला अशी धमकी दिली परवा. मला की नाही, दोन मने आहेत. दोघांचीही प्रतिक्रिया वेगवेगळी झाली.
एक मन म्हणाले
धमकी वाचून घाबरलो, थरथर कापु लागलो. सर्वांगाला घाम पण फुटला (मग लक्षात आले, हापिस चा AC चालत नाही आहे). माझ्या डोळ्यासमोर माझ्या भयाण भविष्याची चित्रे उभी राहिली. सामना मध्ये माझ्यावर टीकात्मक लेख लिहून आला आहे. दर दिवशी माझ्यावर वेगवेगळ्या मार्गाने चिखलफेक होते आहे. रोज सकाळ संध्याकाळ, शबनम घेऊन जाणारी काही माणसे माझा पाठलाग करत आहेत. कमी गर्दीच्या ठिकाणी गाठून माझ्यावर आपल्या पेनातील शाई उडवून माझे कपडे खराब करीत आहेत अशी स्वप्ने मला पडू लागली आहेत. अहो ही धमकी ऐकल्यापासून अन्नाचा घास गोड लागेना झाला हो, डोळ्याला डोळा पण लागला नाही. इतकी भयानक धमकी ऐकल्यावर माझे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे.
माझे जाऊ देत हो, माझ्या घरच्यांचे कसे होणार. हे सामना वाले माझ्या घरच्यांवर तर लेख नाही ना लिहिणार. त्यांच्यावर जिव्हारी लागेल अशी टीका तर नाही ना करणार. आता जिकडे बघावे तिकडे केवळ सामनाच दिसतो आणि थरकाप उडतो जीवाचा. सामना दिसू नये म्हणून मी नाक्यावरच्या पेपरवाल्याच्या बाजूने पण जात नाही. फिरायची सोय राहिली नाही. कंटाळा आला म्हणून TV बघायला गेलो तर मराठी वाहिनीवर भारत आणि इंग्लंड चा सामना अशी बातमी आली. मग परत थरकाप उडाला. काही म्हणता काही करायची सोय राहिली नाही हो या धमकीमुळे. तेव्हा मला झाली तितकी शिक्षा पुरे झाली, आता माफी मागून मांडवली करून टाकावी झाले.
दुसरे मन म्हणाले
हा प्राणी अंमळ मंदबुद्धी असावा. धमकी देऊन देऊन कसली दिली तर पेपरची. आणि पेपर तरी कुठला, तर सामना. धमकी कुणाला दिली, तर ज्याचे आजवरचे आयुष्य गिरणगावात गेले त्याला. कुणी दिली, तर मुंबईबाहेर राहणाऱ्या माणसाने. अशा धमकीने कुणी घाबरेल असे ज्याला वाटते तो माणूस साडेसातव्या महिन्यातला असणार, फार फार तर पावणेआठ. तेव्हा तूर्तास या साडेसातव्या महिन्यातील पावणेआठ-कुमाराच्या करामती बघून मनसोक्त हसून घ्यावे.
कुठल्या मनाचे ऐकू, कुणी सांगेल काय ?
विमेश माजउतरवी
3 Aug 2011 - 12:03 pm | किसन शिंदे
हॅहॅहॅ...:D
ओ काका वाईच दम घ्या की...
3 Aug 2011 - 3:56 pm | सूड
काका, दुसर्या मनाचं ऐकावं. म्हणजे हे माझं मत. खरं तर या धमक्यांना फाट्यावर मारण्याइतकीही किंमत देऊ नका. अगदीच वाटलं तर एखादा फाटा स्पॉन्सर करा, म्हणजे असल्या धमक्या वैगरे देणाराने त्या स्वतःच फाट्यावर मारुन घेऊ देत.
एक सूचना मात्र लिहायला विसरु नका: धमकी/ प्रतिसाद फाट्यावर मारताना सदर धमकी/ प्रतिसाद मोडण्याचा आवाज येणार नाही याची खबरदारी घेणे, शेजार्यांनी शिव्या दिल्यास आम्ही जबाबदार नाही.
-सदाशिव पेठकर
30 Jul 2011 - 10:09 am | कवितानागेश
मेहेंद्ळे काका, मेंब्रांच्या यादीचे भेंडोळे सांभाळून आणा बरे का.
भाज्यांच्या पिशव्यांमध्ये हरवू नका.
:)
30 Jul 2011 - 12:57 pm | माझीही शॅम्पेन
मी पण कुंपणावर आहे :)
30 Jul 2011 - 1:05 pm | इंटरनेटस्नेही
कट्ट्याला अवघे काही तास उरले आहेत!
-
वृत्तप्रतिनीधी, इंट्या चौरसिया.
30 Jul 2011 - 1:09 pm | सहज
वृत्तांत , फटू टाका.
31 Jul 2011 - 8:31 am | ५० फक्त
कट्टा होउन काही अवघे तास झाले आहेत..
31 Jul 2011 - 5:32 pm | मी-सौरभ
कुठे आहे उप्दते???
31 Jul 2011 - 5:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
उप्दते लवकरच येत आहेत :-)
31 Jul 2011 - 11:37 pm | मी-सौरभ
पु. धा. प्र.
आमचे हर्षद राव लगेच धागा टंकतात ब्बॉ :)
1 Aug 2011 - 8:37 am | नितिन थत्ते
रिपोर्ट कुठाय?
1 Aug 2011 - 10:12 am | सुनील
वृत्तांत (फोटोसहित) न आल्यास, कट्टा रद्द झाला होता असे समजल्या जाईल!
1 Aug 2011 - 11:02 am | किसन शिंदे
वृत्तांत फोटोसहित लवकरच टाकल्या जाईल.