नाही भय लाज
सारे सत्तातूर
देशाचा विचार
कवडीमोल
लोभालोभ सारा
सत्तेचिये पायी
आपापल्या सोयी
लाघव भावे
आज वाटे त्यांसी
ब्रम्हांड ठेंगणे
टेकीता ढुंगणे
खुर्चीवरी
सुखाचिया राशी
त्यांच्यांच पायाशी
मग जनतेशी
काय पुसावे?
मतीमंद झाला
आज बुद्धीवंत
नाही बलवंत
कोणीच येथे
उठ माझ्या लेका
आता नको चुका
नाहीतर भिका
मागशील
हातामध्ये घेरे
सत्तेचा आसुड
भडव्यांच्या ओढ
पाठीवरी
हिच माझी इच्छा
पुरी कर बाबा
देशाचा या ताबा
तुझे हाती ..!!!
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
आणी तुंम्ही ओढलायही चांगला....
26 Jul 2011 - 11:10 am | अजुन कच्चाच आहे
आमच्याच मनातल्या भावना या, फक्त तुमच्या लेखणीतून अतीशय संतुलीत शब्दात आल्यात!
26 Jul 2011 - 12:52 pm | विदेश
चांगलाच फटकारलाय काव्यातून . मस्त .
27 Jul 2011 - 10:19 am | पाषाणभेद
अचूक वार
27 Jul 2011 - 5:45 pm | नरेशकुमार
मला पन एक कविता स्फुरली आहे.
.
.
अशी टेरेरीस्ट येती आनिक स्फोट करुनी जाती.......
.
.
.
.
आत्ता पेस्ट करु का नेक्स्ट* टाईमाला पेस्ट करु ? लोकांला कधी ऐकायला/वाचायला आवडेल ?
.
.
* अवांतर : नेक्स्ट म्हनजे पुढच्यावेळेला बॉम्बस्फोट झाल्यावर