सार काही क्षम्य असतं

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
22 May 2008 - 2:35 pm

म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं
पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं.......
हे इतके रम्य असते की
त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ;
क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं
त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं.........

माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं...
आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
हे इतके रम्य असतं की
त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......

मला उमजत असतात तुझी ती खोटी आर्जवं..
तुझे ते कसलेही बहाणे....
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

मुक्तक

प्रतिक्रिया

मनिष's picture

22 May 2008 - 2:38 pm | मनिष

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

सकस छे!!! :)

धमाल मुलगा's picture

22 May 2008 - 2:48 pm | धमाल मुलगा

पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

हाय्य !!!! खल्लास आपण....
एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !

माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......

लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....

हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला.

लगे रहो विजुभाऊ :)

आनंदयात्री's picture

22 May 2008 - 3:39 pm | आनंदयात्री

सही जमलिये एकदम !

मनिष's picture

22 May 2008 - 2:55 pm | मनिष

अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या आवडत्या ओळींचे, जमेल तसे स्वैर भाषांतर....

मेरा युंही ख्वाबों मे खोये रहेना,
और तुम्हारा वो ख्वाबों की तावीर की बातें करना,
मै सहम जाऊ तो वो हलकेसे मुझे छू लेना...
तुम्हारे छुने का अहेसास, वो छूने की मासुमियत,
ये सब इतना लुभावना है,
के हजार गमों को भी इनमे बह जाना है|

विजुभाऊ - जियो!

मनस्वी's picture

22 May 2008 - 3:29 pm | मनस्वी

त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

छान जमलंय.

राजे's picture

22 May 2008 - 5:36 pm | राजे (not verified)

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

:) हे खास !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर's picture

22 May 2008 - 5:40 pm | विसोबा खेचर

आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......

क्या बात है...!

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....

मार डाला!

विजूभाऊ, सुंदर कविता...!

तात्या.

चतुरंग's picture

22 May 2008 - 5:43 pm | चतुरंग

मस्त काव्य!

(स्वगत - हा विजुभाऊ स्वप्नात पाडगावकरांच्या घरी जाऊन आला की काय? :W :? )

चतुरंग

शितल's picture

22 May 2008 - 5:47 pm | शितल

वीजुभाऊ एकदम अफलातुन काव्य रचना,मस्त.
स्वप्नातुन उतरून एवढे खतरनाक वास्तविक काव्य सही.

शितल's picture

22 May 2008 - 5:48 pm | शितल

काव्यासाठी वेगळा विभाग सुरू करायला हवा.
तात्या ऐकताय ना ?

वरदा's picture

22 May 2008 - 5:59 pm | वरदा

झक्कास्.....खूपच सुंदर कविता....
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......


आय हाय!

प्राजु's picture

22 May 2008 - 6:59 pm | प्राजु

माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......

हे अतिशय छान.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

22 May 2008 - 8:30 pm | स्वाती राजेश

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

या ओळी खासच... आवडल्या....
बाकी, तुम्ही काव्य कधी पासून करायला सुरवात केली?
सही आहे वरील कविता...

llपुण्याचे पेशवेll's picture

22 May 2008 - 8:59 pm | llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ, सगळीच कविता इतकी आवडली कि कुठल्या १-२ ओळिच आवडल्या म्हणून उल्लेखच करू शकत नाही. एकदम मस्त.

(सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेला)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

यशोधरा's picture

22 May 2008 - 10:20 pm | यशोधरा

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

आय हाय!

अगदी अगदी!! एकदमच आय हाय!!
मस्तच लिहीलय!

धनंजय's picture

23 May 2008 - 12:07 am | धनंजय

रम्य कल्पना. ती शेवटच्या कडव्यातील कल्पना फार आवडली!

(पण शेवटचे कडवे बाकीच्या कवितेशी प्रवाहीपणे जोडलेले वाटत नाही - माझे तसे वाटणे क्षम्य असावे... )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2008 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ,
प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली मनभर फिरणारी....सुंदर कविता.
'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वरविनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''
आपण  बस स्टॉपवर तासन तास  वाट पाहावी,अन् तिने आपल्या असण्याचा  लांबून अंदाज घ्यायचा अन निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!
'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणंअन मानेच्या हालचाली बरोबरते कानातल्या लोलकांचे डुलणं .....हे इतकं रम्य असतं कीत्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "
बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची  निरिक्षणे चालली,  तर कानातल्या लोलकांवर आमची  नजर हमखास जातेच. टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)
''वार्‍यामुळे अवखळुन केसांचंतुझ्या गालांवर रुंजी घालणं......तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....हे इतकं रम्य असतं की''
विजुभौ,  दिलसे  प्रेम ज्यानं  केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं..... वा-यामुळे भुरभुरणा-या  केसांची बट मागे घेण्याची तिची अदाजीवघेणीच..... आणि  हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....आठवणी जागवुन हे सगळे क्षणपुन्हा अनुभवणं... जगणं....हे इतकं रम्य असतं की
डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने  आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.
" माझ्याच प्राक्तनातका वैशाख उन आले,जेथे विसावलो मीतिथे तुफान आले. "

सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा  मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ
- दिलीप बिरुटे

गणा मास्तर's picture

23 May 2008 - 8:05 pm | गणा मास्तर

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

हय क्या बात कही है

वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......

हे लई बेस्ट.....

(अवखळ पोरगा)
मदनबाण.....

बकुळफुले's picture

24 May 2008 - 10:39 am | बकुळफुले

विजुभाउ प्रेमात पडलात की काय त्या मलेशियन ऍन ताइंच्या.
बाकी मस्तच आहेत तुमचे शब्द.
तुम्ही कविता लिहित असाल हे आमच्या स्वप्नात ही आले नव्हते ( तुमच्या स्वप्नात आले असेल आणि तुम्ही त्या धक्क्याने जागे झाले असाल)
फक्त एक करा कविता तेवढ्या क्रमशः लिहु नका
तुमच्या लेखनाचा आस्वाद घेणारी बकुळफुले

मयुरयेलपले's picture

29 May 2008 - 12:40 am | मयुरयेलपले

हाय येड लावल....... ओ तुमच्या कवितेनि घायाल केल.....

आपला मयुर

अजिंक्य's picture

29 May 2008 - 12:49 pm | अजिंक्य

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

क्या बात है!! मस्तच!!

लगे रहो!!!

मृगनयनी's picture

15 Sep 2008 - 12:52 pm | मृगनयनी

ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......

मस्त!!!!..........
जबरा!!!.........
चाबुक.....
फंडु.....
.....
...
..
.
नि:शब्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)

विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 1:05 pm | प्रभाकर पेठकर

विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?

का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात?

कविता छान आहे.

जैनाचं कार्ट's picture

15 Sep 2008 - 1:10 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात?

=))

का उगाच मीठ चोळत आहात असे देखील वाक्य येथे चालू शकेल ना पेठेकर'काका ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 1:18 pm | विजुभाऊ

मरहम लगाने के बहाने से सौ आयेंगे
मरहम लगाने के बजाय जख्म कुरेद जायेंगे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत