बरेच दिवस झाले असतील मैत्रीणीला प्रत्यक्ष भेटून
किती महिने गेले असतील अमोरा समोर गप्पा मारुन
हल्ली आपण समाधान मानतो त्या 'online chat' वरंच
e mail करून मित्राला सांगतो "अरे ping केलं होतं मी तिला कालंच"
निवान्त बसून परस्परांची चौकशी करणे कमी झालं आहे
Social Networking sites वरच्या status नाच जणू delegate केलं आहे
एकत्र येउन पत्ते, carrom खेळ्ण्याचे दिवस देखिल जुने झाले
PS3 आणि XBOX वर खेळायलाच वेळ कमी पुरे
आमंत्रणं होतात वेग वेगळे Events create करून
एकमेकांची खेचत अस्तात publically comments मारून
वाढदिवसाच्या शुभेछा offline message टाकून उरकतो
Facebook वर snaps upload करण्यासाठीच photo काढू लागतो
ह्या परिस्थितीला नाही देऊ शकत आपण आता दोश
एक मात्र लक्षात येतय - Virtual world is really very close!!!
प्रतिक्रिया
15 Jul 2011 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
तो शब्द 'समोरा' असा हवा आहे का?
15 Jul 2011 - 12:33 pm | सहज
किती महिने गेले असतील 'वैशाली'(हॉटेल) समोर गप्पा मारुन
पोएटीक लायसन्स, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची काही किंमत आहे की नाही?
15 Jul 2011 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार
खमा असावी ;)
त्यांना बहुदा सिडनी मधले अमोरा अपेक्षित असावे. पण आम्ही ब्लडी इंडियन असल्याने बुद्धीची झेप देखील सहसा देशाबाहेर जात नाही ;)
15 Jul 2011 - 1:04 pm | पंगा
जालावर 'आमोरा'वर शोध घेतला असता, पोर्तुगीज भाषेत 'आमोरा'चा अर्थ 'मलबेरी' (एका प्रकारचे फळ) असा असल्याचे कळले.
'आमोरा' (किंवा 'द मलबेरी') ही नावे एखाद्या जरा बर्यापैकी उच्चभ्रू रेस्तराँसाठी वाईट नाहीत. कोणीतरी कोठेतरी काढले असेलही, कोणास ठाऊक!
किंवा, दुसरी शक्यता म्हणजे, कवितेचा/ची उत्सवमूर्ती आणि त्या/तिची मैत्रीण हे/या पूर्वी 'हियर वी गो राउंड द मलबेरी बुश'चा खेळ खेळत असतील, आणि तो खेळ खेळताखेळता गप्पा मारत असतील. याचे वर्णन उत्सवमूर्तीस करायचे असावे. पण मध्यंतरीच्या काळात उत्सवमूर्तीने पोर्तुगीजचा क्र्याश कोर्सही घेतला असावा, आणि त्यात मागच्याच तासाला 'आमोरा' म्हणजे 'मलबेरी' हे ज्ञान प्राप्त झाले असावे, तेही पाजळायचे असावे. म्हणून मग असले काहीतरी धड ना मराठी नि धड ना पोर्तुगीज भाषांतर केले असावे. त्या भानगडीत 'राउंड' (किंवा 'अराउंड') म्हणजे 'भोवती'; 'समोर' नव्हे, या बाबीचे विस्मरण झाले असावे. (चालायचेच. असे वेगवेगळ्या परभाषांचे क्र्याश कोर्स केले, की डोक्यात कॉकटेल होऊन त्यात मातृभाषेचे विस्मरण होऊन धिंडवडे निघायचेच.)
(किंवा, सर्वात सोपी शक्यता म्हणजे, ते थेट 'आमनेसामने'चे हिंदी-टू-मराठी डायरेक्ट ट्रान्सलेशन असावे.)
15 Jul 2011 - 1:14 pm | सहज
परा म्हणतो सिडनी ऑस्ट्रेलीया पण तेथे तर जाण्यार्या भारतीयास कापतात, मारतात ते ऑस्ट्रेलीयन असे पेपरात वाचले आहे त्यामुळे तिथे नसावे (किंवा फार पूर्वी मारत नसतील, आजकाल नवप्रांतवाद उफाळून आल्याने मारत असतील म्हणुन तेथून परांगदा झालेल्या काव्यनायक/नायीकेने त्या आमोरा समोरच्या गप्पा आठवून ..)
अर्थात छत्तीसगड मधे आहे अमोरा, तिथे स्टेट बँक ऑफ इंडीयापण आहे (माहीतीपूर्ण प्रतिसाद) तेथे असेल एखादा मॉल ऑफ अमोरा म्हणून 'अमोरा' समोर
थोडक्यात काय तर कवयित्रीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखला पाहीजे.
15 Jul 2011 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार
कवितेत कुठेही 'नग्नतेचा' उल्लेख नसल्याने कविता - कवयत्री आणि अभिव्यक्ती ह्यांचा संबंध जोडला जाउ नये असे वाटते.
जपुन सहकार्यकर्ते
15 Jul 2011 - 3:03 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
मेलो!
>जपुन सहकार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
हे तर महाभैताड आहे.
श्री. परिकथेतील राजकुमार ह्यांना ताबडतोब 'लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' देऊन सन्मानित करावे असा मी शून्यप्रहरात प्रस्ताव मांडतो.
15 Jul 2011 - 3:33 pm | पल्लवी
काय तुम्ही..साध्या सोप्या गोष्टीची चिरफाड केलीत !
आमोरा हे खरे तर स्पॅनिश मुलीचे नाव आहे. कवितेचे पहिले कडवे लक्षपूर्वक वाचल्यास कवयित्री एका अमोरा नावाच्या मैत्रिणीविषयी(च) बोलते आहे हे स्पष्ट आहे...
तुमचे आपले भलतेच काहीतरी...!!
15 Jul 2011 - 3:37 pm | सहज
सद्य कवितेत नसलेली नग्नता मधेच घुसवून वेगळेच चर्चाचित्र रंगवत आहात परा हुसेनजी!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तुमच्या अश्या गैरवापराला तीव्र आक्षेप!
15 Jul 2011 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही का तुम्ही? जिथे नग्नताच नाही तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले कुठुन?
हान आता अमोरा हे भारतमातेचेच एक नाव असेल तर चर्चा होउ शकेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अश्या (गैर)वापराला तीव्र आक्षेप घेणार्या पाली झुरळांची आम्हास तमा नाही.
15 Jul 2011 - 3:40 pm | गवि
किती महिने गेले असतील
किती महिने झाले असतील म्हणावं हो..
15 Jul 2011 - 3:44 pm | धमाल मुलगा
योग्य तेच तर लिहिलं आहे ना त्यांनी.
पहिली ओळ वाचलीत?
किती दिवस झाले असतील
कवितेचं मिटर गंडू नये म्हणून 'झाले-गेले' ची पहिल्या आणि दुसर्या ओळीत उलटापालट करावी लागली म्हणजे?
15 Jul 2011 - 4:03 pm | गवि
थांबा परत नीट वाचतो. मी तर बुच कळ्यात पडलो आहे बुवा.
विचाराअंती माझं विधान महिने आणि दिवस अशा दोन्हीसाठी लागू आहे असे जाहीर करत आहे.
दोन्हीकडे "झाले" च पाहिजे.
15 Jul 2011 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार
'झाले' च्या ऐवजी 'उलटले' हा शब्द जास्ती योग्य ठरावा.
भाषापंडित
पराकाका खरे
15 Jul 2011 - 4:08 pm | मेघवेडा
झाले-गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे! :D
15 Jul 2011 - 4:19 pm | सूड
सातव्या महिन्यातल्या (पक्षी: जुलै) कवितेवर एवढा काथ्याकुट ??
15 Jul 2011 - 4:24 pm | धमाल मुलगा
व्याकरण चुकायला नको. वेळेत दुरुस्ती केलेली बरी. काय ते तुमच्या विंग्रजीत म्हणतात ना, " अ स्टिच इन टाईम सेव्हज नाईन' का कायसं!
15 Jul 2011 - 4:28 pm | मेघवेडा
... मन्थ्स? ;)
15 Jul 2011 - 4:34 pm | गवि
धमु.. स्टिच वगैरे इतके तपशिलात नको बाबा जाऊ आता...कुठून शंका काढली असे झाले आहे.
15 Jul 2011 - 4:45 pm | मेघवेडा
>> .कुठून शंका काढली असे झाले आहे.
आत्ता खरी तुमची स्वाक्षरी प्रतिसादात मिसळली तरी चालेल! ;) केवळ वरील प्रतिसादाकरिता ते "स्वाक्षरी सुरू/बंद" चं फाटक काढून टाका! ;)
15 Jul 2011 - 4:47 pm | सूड
अग्गं बाब्बॉ !! मेव्याऽऽऽ !! :D
___/\___
15 Jul 2011 - 5:40 pm | धमाल मुलगा
अहो गविकाका,
पण मी व्याकरणाच्या चुका वेळेत दुरुस्त करण्याबद्दल म्हणतोय तर काय झालं एकदम?
आता नाही येत बॉ आम्हाला ते विंग्रजी, पण जरा जरा करतो प्रयत्न इकडचं तिकडचं वाचून. म्हण चुकलीए का माझी? तसं सांगा ना राव,.
15 Jul 2011 - 8:02 pm | श्रावण मोडक
अमोरासमोर असे म्हणतात. इतके नक्की. कुठल्या मराठी प्रदेशात हे आत्ता आठवत नाही. बारा गावचं पाणी पिल्यानंतर वय झालं की, हे असं होतं.
समोरासमोरलाच तो समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. :)
15 Jul 2011 - 12:29 pm | स्पा
तो शब्द 'समोरा' असा हवा आहे का?
शक्यता नाकारता येत नाही
15 Jul 2011 - 1:09 pm | गवि
सोशल नेटवर्किंग आहे म्हणून तेवढेतरी संपर्कात राहतात..तेवढेतरी का? चांगलेच बरेच संपर्कात राहतात.
तेही नसते तर सारे शाळूसोबती जिवंत की मेले तेही कळले नसते.
आणि पिंग / ईमेल फॉरवर्डस् एवढेच कम्युनिकेशन ज्यांच्यात आहे त्यांचेही असे काय नवीन?
पूर्वीच्या नॉन इंटरनेट नॉन मोबाईल काळात समोरासमोर येऊनही "काय मग.. भाजीला चाललात वाटतं.. हॅ हॅ हॅ.." एवढंच उगाच काहीतरी बोलून टळणारे खूप असायचेच की..
15 Jul 2011 - 3:55 pm | मनीषा
वास्तवदर्शी कविता ...
15 Jul 2011 - 8:04 pm | आत्मशून्य
.
16 Jul 2011 - 3:33 am | अरुण मनोहर
>>किती महिने गेले असतील आमोरा समोर गप्पा मारुन<<
श्रामोंनी लिहीले आहे ते बरोबर आहे.
"तुम्ही एकदा आमोरा-समोर बसून काय ते ठरवून घ्या" असे म्हणायची पद्धत विदर्भात आहे. हिंदीतील आमने-सामने ह्यावरून हा शब्दप्रयोग आला असावा असे वाटते.
तसे बघितले तर महिने गेले, दिवस गेले असे भलतेच श्लेष निकालात काढता येतील. आणि आमोरा जरी स्पॅनीश मुलगी असली तरी, नुसते तिच्या समोर गप्पा मारून दिवस कसे जाणार? आणखी काही कार्यशीलतेची आवश्यकता आहे ना!
बाकी कविता ठीक-ठाक आहे.
17 Jul 2011 - 11:28 am | तिमा
वाटलंच होतं की हे काहीतरी वैदर्भीय असणार!