नमस्कार मंडळी,
माझा सध्याचा लॅपटॉप बराच जुना झाल्यामुळे नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार आहे. मला core i5/i7 (, 4GB RAM, 500 GB HDD, DVD RW, BLUETOOTH, WIRELESS LAN, MIN. 3 USB PORTS, 14/15 INCH SCREEN असलेला लॅपटॉप हवा आहे. पण मला विन्डोज नको आहे. आपण मला सदर फ़िचर्स असलेल्या लॅपटॉपबाबत अधिक माहिती द्यावी. त्याबरोबरच थेट वेबसाईटवरून खरेदी करावी की दुकानांमधून, आपले अनुभव - सर्व्हीस व स्पेअर पार्टची उपलब्धता वगैरेबाबतही मार्गदर्शन अपेक्षित आहे.
चैतन्य कुलकर्णी.
प्रतिक्रिया
14 Jul 2011 - 12:35 am | आत्मशून्य
मग काय लिनक्स वापरणार की मॅक ?
14 Jul 2011 - 1:20 am | इंटरनेटस्नेही
एम-एस डॉस असेल बहुधा! ;)
-
इंट्या गेट्स.
14 Jul 2011 - 2:03 am | निमिष ध.
थोडे दिवस थांबा.. Android वर चालणारा संगणक मिळेल. आता खिडक्या नकोत तर तोच चांगला पर्याय वाटतो आहे.
14 Jul 2011 - 3:03 am | योगी९००
आता जमाना टॅब्लेट चा आहे..
iPad 2
Samsung Galaxy 10.1 or 8.9
यापैकी काहीतरी घ्या...
14 Jul 2011 - 10:24 am | आत्मशून्य
तूम्हाला जर ३डी गेमींग अथवा त्यासंबधीत अप्लीकेशन मधे रस नसेल तर सरळ समसंग गॅलक्सी टॅब घ्या या मधे त्या सर्व गोश्टी होतात ज्या एका लॅपटॉपमधे करता येतील व रोजच्या ऑफीस वर्कसाठी उपयोगी आहेत. हा पण ऑटोकॅड वा इतर काही हेवी अॅप्लीकेशन्स असतील तर मात्र लॅपटॉपच घ्या.
14 Jul 2011 - 10:54 am | चैतन्यकुलकर्णी
सॉफ्टवेअर डेवलपमेंट्च्या कामासाठी हवा आहे.
त्यामुळे टॅब्लेट उपयोगी नाहीत.
14 Jul 2011 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
बॉस फक्त आणि फक्त तोशिबा किंवा हिताची सारख्या जापनीज ब्रॅंडसचीच खरेदी करावी, काम कुठलेही असो.
बाकी सगळे नुसते धतिंग आणि मिरवायला बरे असतात.
15 Jul 2011 - 6:43 am | निनाद
पूर्ण सहमती!
14 Jul 2011 - 10:19 pm | कानडाऊ योगेशु
डेलची विक्रिपश्चात सेवा अतिशय उत्तम आहे.
माझ्या लॅपटॉपची स्क्रिन आणि मदरबोर्ड वॉरंटीअंतर्गत एक पै ही न घेता रिप्लेस करुन दिली.
आणि विशेष म्हणजे तुम्हाला डेलच्या सर्विस सेंटरवर जायची गरज नाही.टेक्निशियन स्वतः घरी येऊन लॅपटॉप दुरुस्त करुन जातो.
15 Jul 2011 - 3:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्याकडे 'डेल'च आहे, चार वर्षांपेक्षा जास्त झालीत आणि लॅपटॉप मस्त सुरू आहे. 'डेल'चा एकच प्रॉब्लेम होतो तो म्हणजे स्क्रीनची बिजागरी सैल होते. वापरण्यात त्याचा काहीही त्रास नाही. मधे एकदा (पावणेचार वर्ष वय झाल्यानंतर) पावर सप्लाय बदलावा लागला, पण तो मी केलेल्या काही 'खेळां'मुळे असं माझं मत आहे. त्याशिवाय सर्व्हिस सेंटरचा रस्ता शोधावा लागला नाही.
माझा लॅपटॉप जुना असल्यामुळे त्याचं कन्फिगरेशन, तेव्हाची किंमत वगैरे सांगण्यात अर्थ नाही. 'डेल'चे लॅपटॉप कस्टमाईज करता येतात हा आणखी एक फायदा.
(देशा-परदेशात 'एच्पी' आणि 'एसर'च्या काही लॅपटॉप्सचे अकाली बारा वाजलेले पाहिले आहेत, काही चांगले टिकलेलेही पाहिले आहेत.) माझी व्यक्तीगत पसंती 'डेल'लाच आहे.
दुकानात जाऊन घेणार असलात, दुकानदार (डोक्याने) बरा असेल आणि तुम्ही अडीबाजी केलीत तर बिनविण्डोजचा लॅपटॉप मिळू शकेल. छोट्या दुकानात जाण्याचा फायदा होईल असं वाटतं. साधारण वर्षापूर्वी पुण्यातल्या 'कंप्युसिटी' नामक औंधातल्या दुकानात माझ्या मित्राने फार त्रासाशिवाय बिनविण्डोजचा, 'डेल'च घेतला होता.
थेट वेबसाईटवरून कंप्यूटर घेताना विण्डोजशिवाय मिळतो का हे तपासून पहा. इंग्लंडातल्या एका मित्राला फोनवर बराच वेळ आणि शक्ती दवडावी लागली होती. (त्यापेक्षा मी काही हजार रूपये जास्त देणं परवडलं!)
15 Jul 2011 - 4:51 am | गणपा
अर्रर्र मुळात ही पाळी (स्क्रिन आणि मदरबोर्ड बदलायची) आलीच का ? ती ही वॉरंटी काळात.
18 Jul 2011 - 12:12 am | कानडाऊ योगेशु
प्रश्न अपेक्षितच होता . :)
लॅपटॉप बंद करताना कि-बोर्ड आणि स्क्रीनच्या मध्ये बॉलपेन नजरचुकीने तसाच राहिला आणि त्याच्या पॉईंटमुळे स्क्रिन रप्चर झाली आणि एक कि पण तुटली.
विशेष म्हणजे डेलवाल्यांना खरे सांगुन सुध्दा त्यांनी पार्ट रिप्लेसमेंट देताना टाळाटाळ केली नाही.
14 Jul 2011 - 11:23 pm | चैतन्यकुलकर्णी
धन्यवाद
14 Jul 2011 - 11:28 pm | स्वानन्द
काय ठरलं मग?
15 Jul 2011 - 4:57 am | Nile
शोध घेत रहा ...
15 Jul 2011 - 4:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
माझा HP चा अनुभव फार चांगला नाही. १३व्या महिन्याला मदरबोर्ड उडला. वॉरंटी १२ महिन्याची होती. शिवाय तो मी भारतात घेतला नसल्याने आणि त्या मॉडेल चा सपोर्ट भारतातून नसल्याने सगळे पैसे पाण्यात गेले.
नंतर तोशिबा घेतला. तो साधारण २ वर्षे काहीही त्रास न देता चालला. अगदी परवा काही keys चालणे बंद झाले. पण ते रुटीन मेंटेनन्स ने ठीक व्हायला पाहिजे. त्यामुळे सध्यातरी मी HP रेकमेंड नाही करणार, तोशिबा करेन.
17 Jul 2011 - 5:21 pm | अभिज्ञ
गेटवे चा लॅपटॉप घ्या. भारतात कुठे मिळतो ते माहित नाही.परंतु ताबडायला बरा आहे.
किंमत कमी व पर्फॉरमन्स चांगला असा अनुभव आहे.
अभिज्ञ