गाभा:
नमस्कार मित्रहो,
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :(
ही बातमी खरी आहे काय?
असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना!
आपला,
-(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
प्रतिक्रिया
13 Jul 2011 - 7:40 pm | धमाल मुलगा
रामदासकाका,
तुमची खुशाली कळवा प्लिज.
13 Jul 2011 - 9:26 pm | नितिन थत्ते
रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत.
13 Jul 2011 - 9:31 pm | रामदास
काही वेळापूर्वीच ठाण्यात पोहचलो.
13 Jul 2011 - 9:58 pm | अलख निरंजन
स्फोट दादरला झाले आहेत.
13 Jul 2011 - 10:09 pm | स्वानन्द
त्यांचे कामाचे ठिकाण दादर असेल.
14 Jul 2011 - 1:06 pm | sagarparadkar
नेमक्या ह्या धाग्यासाठी आपण स्वाक्षरी बदललेली पाहून डोळे पाणावले ....
आपल्यासारखे महान लोक ह्या भारतात आहेत, हे पाहून मला एकदम समृद्ध अशा ग्रीक / रोमन (चू.भू.द्या.घ्या.) संस्कृतीच्या, (त्या काळच्या) क्रूर, हिंस्र आणि रानटी अशा 'स्पार्टन' लोकांकडून झालेल्या पराभवाची आणि नंतर झालेल्या र्हासाची आठवण होतेय.
आपली (म्हणजे आम्हा केविलवाण्या) सामान्य भारतीयांची सध्याची स्थिती बरीचशी त्या काळच्या ग्रीकांशी मिळती-जुळती असावी.
14 Jul 2011 - 1:29 pm | नितिन थत्ते
स्वाक्षरी धाग्यासाठी बदलता येत नाही. सध्या (मी माझ्या खात्याच्या सेटिंग मध्ये बदल करेपर्यंत) मी कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद दिला तरी हीच स्वाक्षरी दिसेल. आणि मी वर्ष-दोन वर्षापूर्वीच दिलेल्या प्रतिसादांखालीसुद्धा हीच स्वाक्षरी आत्ता अपेण्ड झालेली असेल.
<पंगा मोड ऑन>
ही स्वाक्षरी घेण्याचं कारण काल मला स्फोटांनंतर अनेकांच्या लेखनात कसाबला फाशी न झाल्याविषयी त्रागा दिसला.
कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना. तेव्हा कसाबच्या फाशीची मागणी करणे हा देशभक्ती व्यक्त करण्यासाठीचा एक वाकप्रचार असावा ("जयहिंद" किंवा "भारतमाता की जय" सारखा) असे वाटून तो रोज न करणारे म्हणजे देशद्रोहीच असणार असा माझा समज झाला. तेव्हा तो वाक्प्रचार रोज वापरण्याची आठवण सर्व देशभक्तांना रहावी म्हणून ही स्वाक्षरीच बनवून घेतली. :)
<पंगा मोड ऑफ>
.
.
.
14 Jul 2011 - 1:52 pm | sagarparadkar
घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्यांचे 'टार्गेट' ठरू नये.
>> कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना.
कारण तुम्ही स्व्तःच कंसात उद्धृत केले आहे ... तरी पण एकूणातच इतर देशांतील न्यायव्यवस्था पहावी. तुम्ही किंवा तेथील कोणताही नागरीक असाच प्रतिवाद सौदी मधे जाऊन करू शकाल का? तिथे आपल्यापेक्षा गुन्हेगारी खूपच कमी आहे कारण गुन्हेगाराला कडक शिक्षा होते आणि त्या शिक्षेचा इतर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक बसतो. मी स्वतः हे पाश्चात्य देशांत पाहिलेले आहे आणि सौदीमधील व्यवस्थेचं वर्णन जवळच्या नातेवाईकांकडून ऐकले आहे जे स्वत: तिथे अनेक वर्ष राहिले आहेत.
पण जाऊ दे हे बोलून काय उपयोग? शेवटी कंसातील कबुलीच खरी म्हणायची :)
एकच विनंती: कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचे परीणाम आपल्या जवळच्यांना भोगायला लागतील (असं होवू नये ही सदिच्छा) तेव्हासुद्धा हाच युक्तिवाद कायम ठेवा. आत्ता जे तळ्तळाट ऐकू येत आहेत ते अशाच बळींशी सहनुभूती बाळगणार्यांचे आहेत.
14 Jul 2011 - 4:55 pm | नितिन थत्ते
>>घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्यांचे 'टार्गेट' ठरू नये.
धन्यवाद. परंतु आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांत कसाब येत नाही, त्याला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने ती कन्फर्म केली आहे.
तसेच त्याची शिक्षा अंमलात आणू नये असे मी (किंवा अन्य कोणीही) कुठेही सुचवल्याचे स्मरत नाही.
(माझे त्यावेळचे म्हणजे त्याच्यावर खटला चालू होण्यापूर्वीचे आणि अजूनही मत आहे की तो भारताचा नागरिक नसल्याने भारतीय घटनेनुसार दिले जाणारे हक्क त्याला लागू होत नाहीत. त्यावर खटला चालवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. फारतर तो सीसीटिव्हीवर दिसणारा गोळीबार करणारा माणूस तोच आहे एवढेच सिद्ध करण्याची गरज होती).
एखादा जवळच्याचा मृत्यू झाल्यावर छाती पिटून मोठ्याने रडला नाही म्हणजे त्याला दु:ख झालेले नसते असे नाही. स्फोटात मृत झालेल्यांबद्दल सहानुभूती आहेच.
13 Jul 2011 - 9:57 pm | घाशीराम कोतवाल १.२
Emergency Numbers: 022-22621855, 022-22621983, 022-22625020
Helpline Numbers: के.ई.म. ईस्पितळ (022-24136051), नायर ईस्पितळ (022-23085379), हरकिसन्दास ईस्पितळ(23855555 / 30095555), सैफी ईस्पितळ चर्नीरोड (22 6757 0111)Please share
13 Jul 2011 - 7:42 pm | पुष्करिणी
होय, ३ ठिकाणचे पोलिसांनी कंफर्म केलेत. १५ जखमी ...
मुंबैतल्या लोकांनो काळजी घ्या
13 Jul 2011 - 7:45 pm | श्रावण मोडक
खरीच बातमी आहे.
तपशीलांसाठी वाट पहावी हे उत्तम.
13 Jul 2011 - 7:49 pm | निखिल देशपांडे
हो ब्लास्ट ची बातमी आत्ताच टिव्ही वर पाहतोय..
आम्ही दोघेही घरीच आहोत, मुंबईतल्या ईतर मिपाकरांना संपर्क करायचा प्रयत्न चालु आहे.
13 Jul 2011 - 7:50 pm | मराठे
दहशतवादी हल्ला असल्याचं गृहखात्याने सांगितलं आहे. एक न फुटलेला बाँब दादरला सापडला. ६ लोकं मेल्यांची बातमी एन.डी.टि.व्ही. च्या साईटवर आहे.
13 Jul 2011 - 7:50 pm | इंटरनेटस्नेही
खरं आहे. देशभर हाय अॅर्लट.
13 Jul 2011 - 7:52 pm | गणपा
:(
कधी थांबणार हे सर्व?
13 Jul 2011 - 7:53 pm | धमाल मुलगा
समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे.
13 Jul 2011 - 8:12 pm | इंटरनेटस्नेही
समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे.
आम्ही गोरेगाव्/जोगेशवरी (अॅज द केस मे बी) येथे राहतो. नुकताच घरी पोहचलो आणि बघतो तर ही बातमी.. मी तरी ठीक आहे. होप, बाकीचे मिपाकर देखील फाईन असतील.
13 Jul 2011 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जखमींची संख्या खूप अधिक दाखवत आहेत.
13 Jul 2011 - 8:02 pm | आत्मशून्य
याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी असं सांगत आहेत. आता हाय अलर्ट काय कामाचा ? आणी मंत्रायलात तातडीची बैठक सुरू :(
तातडीने कृती करायची वेळ असताना बैठका कसल्या घेताय .............
14 Jul 2011 - 1:33 am | सूड
असंच असतं बाबा, बैल गेल्यावरच झोपा करायची आठवण होते यांना. जे काय झालं ते जाईल कुठच्या कुठे आणि हे राजकारणी या गोष्टीचं राजकारण करायला मोकळे होतील.
13 Jul 2011 - 8:08 pm | प्रभो
:(
13 Jul 2011 - 8:13 pm | यकु
स्फोट मुंबईत आणि एनएसजी दिल्लीत!
च्यायला..!
आणि पुन्हा मुंबई वाचवायला दिल्लीतून (पक्षी उत्तरेतून ) कमांडो पाठवले म्हणायला मोकळे...
एनएसजी मुंबईतच ठेवा ना..
14 Jul 2011 - 11:20 am | बिपिन कार्यकर्ते
मुंबईत एनएसजीचे हब आहे असे कळते.
13 Jul 2011 - 8:15 pm | गवि
I hv reached safe place.
They are telling in news that its Kasab' birthday.
Get to hear there are many many more deaths.
All mumbai mipakars, pls let all know you are safe.
ViMe.. Dadar madhe rahtaat. Pls let us know.
13 Jul 2011 - 8:45 pm | यकु
विमे म्हणजे कोण हो?
पूर्ण नाव ?
13 Jul 2011 - 8:52 pm | स्वानन्द
विश्वनाथ मेहेंदळे
13 Jul 2011 - 8:58 pm | धमाल मुलगा
विश्वनाथ मेहेंदळे.
13 Jul 2011 - 8:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?
13 Jul 2011 - 9:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?
13 Jul 2011 - 9:57 pm | अलख निरंजन
They are telling in news that its Kasab' birthday.
उगाच अफवा पसरवू नका. कुठल्याही बातम्यांमधे असे सांगितलेले नाही. कसाबचा जन्मदिन १३ सप्टेंबर आहे. आहे त्या गोंधळात भर घालू नका. निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला. That is the least we can do!
13 Jul 2011 - 10:43 pm | गवि
thats why I specifically said that they are telling in the news.
This is going around in news everywhere.
I am not telling any 'afava'
If news on all channels is not to be believed or mentioned also,then how we believe news for blasts also?
13 Jul 2011 - 8:19 pm | चिरोटा
मी स्फोट व्हायच्या आधी दोन तास त्या(दादर) भागातूनच घरी पार्ल्याला आलो.
13 Jul 2011 - 8:20 pm | शशिकांत ओक
मुंबईतील अनेक दुकानातून तात्काळ मेणबत्या मिळवून वाघासरहद्दीवर त्या पेटवून निषेध व्यक्त करायला पाकीप्रेमी निघाले आहेत असे कळते.
14 Jul 2011 - 4:43 am | निनाद
ह्युमन राईटसवाले विसरलात का?
त्यांच्यामुळे तर मेणबत्त्यांचा धंदा जोरात चालतो.
आता स्फोट घडवणार्या अतिरेक्यांना वाईट वागणूक दिल्याबद्दल मोर्चा काढावा लागेल ना त्यांना. त्यांचीही मेणबत्त्यांसाठी धावाधाव चालली असेल.
13 Jul 2011 - 8:29 pm | घाशीराम कोतवाल १.२
भें** ह्या कसाबला लटकवा रे रोज रोज हे टेंशन नको रे
13 Jul 2011 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा
त्याला कसले लटकवतायत हे...स्वतःच लटकलेले...आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे...
त्या जव्हेरी बजारातल्या एका/दोघांचे साफ तुकडे उडालेले दिसतायत...भयंकर आहे हे.
13 Jul 2011 - 9:56 pm | अलख निरंजन
आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे...
हे कुठे समजले तुम्हाला? निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला.
That is the least we can do!
13 Jul 2011 - 10:13 pm | श्री
अलखजी जरा गुगल सर्च करा....
14 Jul 2011 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
मालक कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी त्याची जन्मतारीख कायमच वेगवेगळी सांगीतली गेली आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab
http://www.washingtonpost.com/blogs/blogpost/post/mumbai-attacks-on-terr...
13 Jul 2011 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा
काहीही सुचत नाहिये...हे सगळं घडल्याचं कळताचं(नेहमीप्रमाणे)टीव्हीवर चेनल सर्फिंग करत होतो...वेगवेगळ्या बातम्या तर येत होत्याच,म्हटलं रात्रीपर्यंत काय काय अजुन घडणारे कोणास ठाऊक?...तेवढ्यात लोकसभा चेनलवर कुणुसा एक राजकीय विश्लेषक भारतीय जनतेची अवस्था मनुस्म्रुतितल्या शूद्रांसारखी झाल्याचं समर्पक पणे सांगत होता...काय वेगळं बोलला तो?एक तर जनावरांसारखे जगा/नाहीतर त्यांच्यासारखेच मारले जा...कधिही कुठेही नी केंव्हाही...
अवांतर-बरेचसे न्युजचेनल रिपोर्टर नेहमी सारखे मढं फाडत बसलेले दिसतायत...ह्या चेनल रिपोर्टरना पाहिलं की प्र के अत्र्यांचा ''रिपोर्टर आणी कावळा" हा लेख आठवल्यावाचुन रहात नाही...
13 Jul 2011 - 8:55 pm | स्वानन्द
एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर कुठले ही न्युज चॅनेल बघू नका. तसं ही काही नीट माहिती मिळणार नाही. नक्की काय घडलंय हे उद्या वर्तमानपत्रात व्यवस्थीत कळेल.
13 Jul 2011 - 9:09 pm | नावातकायआहे
सहमत
13 Jul 2011 - 8:37 pm | धनंजय
मित्रांनो, काळजी घ्यावी
13 Jul 2011 - 8:43 pm | कार्लोस
मारी टोपी एवढा पावूस पडतोई आणि मुंबई मध्ये हे बिन दिवाळीचे फटाके कसले फुटले ????????
बुधवार ह्या हिंदी चित्रपटाची खूप आठवण आली पण
But at this stage iam searching that kind of common man showed in the movie.
13 Jul 2011 - 8:45 pm | विशाखा राऊत
बातमी वाचुन कळत नाही ही शिक्षा गरीब सामान्य लोकांनाच का?
का त्यांना "Z secirity" नाही म्हणुन कोणीही या काहीही करा.
13 Jul 2011 - 8:45 pm | शुचि
फक्त कसाबला लटकवू नका त्याबरोबर पाकचा आणि देशद्रोह्यांचा सोक्षमोक्ष लावा.
13 Jul 2011 - 8:46 pm | llपुण्याचे पेशवेll
आम्ही हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केल्यापासून बॉम्बस्फोट होणे बंद झाले आहे इति दिग्विजय सिंह
13 Jul 2011 - 8:48 pm | प्रीत-मोहर
मुंबैच्या लोकांनो काळजी घ्या .... आणि आपली खुशाली लवकर कळवा
13 Jul 2011 - 8:49 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो आणि पाकचा निषेध करतो (मेणबत्ती ही पेटवणार) . आता कोणतरी गृहसचिव वैगेरे पाकची आंतराष्ट्रीय पातळीवर वैगेरे निर्भत्सना करेल मग चांगलाच धडा मिळेल या पाकड्यांना.
13 Jul 2011 - 8:53 pm | तिमा
मी तिरशिंगराव सुखरुप घरी पोचलो. बायको पण नुकतीच घरी पोचलीये.
दिग्विजयसिंगांना आत्तापर्यंत हे बाँबस्फोट हिंदुंनीच केल्याचा साक्षात्कार झालाच असेल.
13 Jul 2011 - 8:58 pm | नितिन थत्ते
मी मुंबईत नसतोच. पण आमच्या घरचे सुखरूप.
13 Jul 2011 - 9:04 pm | गणपा
कालच मुंबई ट्रेन स्फोट मालिकेला ५ वर्ष पुर्ण झाली. आमचे एक नातेवाईक त्यात गेले. :( त्यांचीच आठवण काढत होतो आत्ता इतक्यात ही बातमी आली. :(
उद्या सकाळी हातावर पोट असणारे (आणि जिवंत असणारे) सगळे परत कामाला लागतील.
आणि हे मिडीयावाले परत बोंबलायला मोकळे.
"मुंबई पुन्हा धाऊ लागली."
"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे"
13 Jul 2011 - 9:09 pm | स्वानन्द
>>आणि हे मिडीयावाले परत बोंबलायला मोकळे.
ते तोंडावर पोट असलेले...
13 Jul 2011 - 9:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे"
बेडर नाय रे गणपा निडर
कामावर न जाउन सांगता कोणाला हे लोक कसाब ला पोसतायत आम्हाला थोडीच पोसणार
13 Jul 2011 - 9:35 pm | शिल्पा ब
काहीच सुचत नाहीये. :(
सारखे हल्ले होऊनही या राजकारण्यांना अक्कल काही येत नाही. अर्थात त्यांना फक्त त्यांचे कुटुंब आणि पैसा यांचीच काळजी असल्याने बाकी काहीही झाले तरी काय फरक पडतो. :(
आपणही भयंकर आहे असं म्हणण्यापलीकडे काय करू शकतो? :(
13 Jul 2011 - 9:47 pm | सचिन जाधव
हे तर नेहमीचच झालय.....अस काहितरी होत अन आपन केवळ हळ्ह्ळ व्यक्त करत्तो.आता खरच हे थाबल पाहिजे.
आता आर. आर. आबा काय राजिनामा परत देनार काय?
13 Jul 2011 - 9:54 pm | गणेशा
अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे पर्यंत आज.
झाले हे खरेच वाईट आहे.
१३ आणि २६ तारिख या तारखांनाच हे होते आहे कायम.
सामान्य माणासांना मारुन यांना काय मिळते काय माहित .. असे वाटते.. अगळॅ आतंकवादी एकत्र आणावेत आणि उडवुन द्यावे भडव्यांना ...
13 Jul 2011 - 10:19 pm | चिरोटा
फक्त आतंकवादीच नाहीत तर स्वतःची पोटे भरण्यासाठी मुंबईत अंडरवर्ल्ड जाणीवपूर्वक पोसणार्यांनाही.
13 Jul 2011 - 10:38 pm | विकास
सर्वांच्या कडील खुशाली समजली त्यामुळे बरे वाटले.
काहीवेळा पुर्वी बर्याच दिवसांनी मिपावर परत काहीतरी टंकायला म्हणून आलो आणि धमुने दिलेली बातमी पाहीली. मग बराच वेळ लाईव्ह एनडीटीव्ही पाहीला... काही निरीक्षणे:
बाकी आता अजून काही बातम्या-विश्लेषणे येउंदेतच. पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...त्या बाँबस्फोटाइतकाच त्याचा देखील वाचताना त्रास होतो... कारण यात स्पिरीट वगैरे काही दिसत नाही, दिसते ती एकतर निर्विकार भावना अथवा त्याहूनही अधिक, असहाय्यता.
असो.
14 Jul 2011 - 4:44 am | निनाद
अगदी मनातले लिहिले आहे. सहमत आहे. यातला एक स्फोट मी जेथून नेहमी जात असे तेथेच झाला आहे. :( काळजी घ्या! अजून काय म्हणू?
14 Jul 2011 - 9:54 am | llपुण्याचे पेशवेll
पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...
हज्जारदा सहमत आहे.
13 Jul 2011 - 10:49 pm | मस्त कलंदर
फेसबुकावर आताच ही लिंक मिळाली. आणि त्यात भर पडतेच आहे. माणूसकीच्या नात्याने लोक उत्स्फूर्तपणे पुढे होऊन जमेल ती मदत करायला तयार आहेत. त्यात अगदी घरी राहणं, खाणं, फोन, मेल, ट्वीट पासून अगदी कारने घरी सोडण्यापर्यंत आणि वैद्यकीय मदत देण्याचा अंतर्भाव आहे. (इथे दिलेल्या फोन नंबरांचा नंतर दुरूपयोग होऊ नये हीच एक आशा)
पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी. (कीस पाडायला नंतर वेळ आहेच की)
ही ती लिंकः
https://spreadsheets.google.com/spreadsheet/lv?hl=en_US&key=tE-okpwwYgQa...
13 Jul 2011 - 10:59 pm | विकास
चांगला दुवा आहे. मी देखील तो इतरत्र शेअर करत आहे.
धन्यवाद!
14 Jul 2011 - 2:29 am | चित्रा
पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी.
याला +१, पण विधायक मदत करावी असे वाटतानाही डोक्यात यायचे ते येतच राहते, हेही खरेच आहे.
अनेक मुंबईकर निरपराधांना कोणाच्या तरी दुष्ट, दहशतवादी कृत्यांमुळे जीव गमावावा लागला, त्यांच्या मुलाबाळांबद्दल आणि नातेवाईकांबद्दल अतिशय वाईट वाटते आहे. असो.
13 Jul 2011 - 10:49 pm | स्मिता.
आशा आहे की सर्व मिपाकर आणि हल्ल्यात न सापडलेले मुंबईकर सुरक्षीत असोत.
NDTV वर सध्या मृतांची संख्या २१ दाखवत आहेत.
हे सर्व अवघड होत आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत स्फोट होतच आहेत आणि त्यात सामान्य माणूस जनावरासारखा बळी दिला जातोय. पण आपले सरकार 'हल्ल्याचा कडक शब्दात निषेध, तातडीची बैठक, एखादी कमिटी, इ.' च्यापुढे आणखी काही करेल याची शंकाच आहे.
13 Jul 2011 - 11:03 pm | माझीही शॅम्पेन
पुन्हा तेच ते आणि तेच ते !
मृतांच्या नातेवाईकणा घाऊक मदत , स्फोटाचा तीव्र निषेध , पाकिस्तानचा सक्त ताकीद , अजुन एक कमिटी , संशयितना अटक , लांबलेले खटले , कधीही न होणारी फाशी , पुन्हा हल्ला
पुन्हा एकदा क्रांतीच्या प्रतीक्षेत असणारा मी एक भारतीय !
13 Jul 2011 - 11:40 pm | बहुगुणी
मी आज 'स्फोट कसाबच्या वाढदिवशी झाले' असं इथे वाचल्यावर लगेचच (१०-१५ सेकंदात) ajmal kasab असा सर्च केला, तर हे विकीपेडियावरचं पान सापडलं, ज्यात त्यावेळी 'Born on July 13, 1987' अशी माहिती पहिल्याच ओळीत होती. तेंव्हा कदाचित या स्फोटाशी ही तारीख खरोखर संबंधित असावी असा विचार केला.
पण जेंव्हा वरील धाग्यात काही विरोधी मतं (असा कसाबच्या जन्मदिवसाशी संबंध नसल्याची) वाचली, तेंव्हा तेच पान १५ मिनिटांनी परत जाऊन पाहिलं तर ते वाक्य आता काढलेलं आहे. कुणीतरी मधल्या काळात ते पान update केलं आहे. तळाशी पाहिलं तर (आतातरी) हे दिसतं:
This page was last modified on 13 July 2011 at 17:28
केवळ अफवा पसरवण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे आधी पोस्ट केलं होतं, की आणखी भडका उडू नये म्हणून पोलिस वा इतर कोणी हे पान आता 'अपडेट' केलं आहे?
13 Jul 2011 - 11:52 pm | शुचि
त्या पानावर कसाबच्या फोटोखाली पुढील शब्द आहेत -
Born 13 September 1987 (1987-09-13) (age 23)[१] or 13 July 1987 (1987-07-13) (age 24)[२]
14 Jul 2011 - 10:24 am | श्री
हेच म्ह्णतो........
14 Jul 2011 - 7:37 am | स्पंदना
नमक हराम, लेकाचे, इथ राहुन खातात पितात, अन उलटतात.
14 Jul 2011 - 9:13 am | ऋषिकेश
मुंबईत नसतो.. मात्र घरचे सगळे सुखरुप आहेत.
काळजी घ्या मित्रांनो
14 Jul 2011 - 10:03 am | रुतिका
माझे सासरे काल गेले होते झवेरि बाजारात
पण स्फोटच्या अर्ध्या तासापूर्वीच तिकडून निघाले होते.
14 Jul 2011 - 10:25 am | हुप्प्या
लोक स्फोटबीट दोन दिवसात विसरून जाणार.
सरकार लाख दोन लाख दरडोई वाटणार, निदान घोषणा तरी करणार.
विरोधी लोक दोन दिवस बोंब मारणार आणि मग गपगार.
पोलिस मिळतील तितक्या दोन, चार, सहा मुस्लिम लोकांना अटक करणार. आणि खटला झाला की पुराव्याअभावी सगळे सुटणार.
हे एखाद्या फॉर्म्युल्याप्रमाणे होत आले आहे आणि होत रहाणार.
असल्या षंढ, मुर्दाड समाजावर आपल्या अतिरेकी कारवायांचा काहीही परिणाम होत नाही असे जाणवून अतिरेकीच तो नाद सोडतील अशी आशा करु.
14 Jul 2011 - 10:30 am | ब्रिजेश दे.
मला तर वाटत की शाळेच्या इतीहासात आता मुंबई स्फोट यावर विशेष धडा घालतील ....
14 Jul 2011 - 2:29 pm | मी ऋचा
धडा घालू शकतील पण घेउ शकतील असं काही वाटत नाही!
14 Jul 2011 - 10:52 am | मनिष
मंगळवारी रात्री उशीरा मुंबईहून परत आलो (खर तर काल दादरहून येणार होतो) आणि आज ही बातमी. कसाबला फाशी करून हे संपणार नाही, पण निदान स्फोटात मेलेल्यांची चेष्टा होतेय असे तरी वाटणार नाही. खरे तर लवकरात लवकर पाकिस्तानात 'कारवाई' करून ज्ञात अतिरेक्यांना मारले पाहीजे, थोडी तरी लाज राखली जाईल.
14 Jul 2011 - 11:04 am | विजुभाऊ
काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच होतो.
वडीलांचा गावाहून फोन आला.संभाळून रहा म्हणून........
पण सांभाळून रहायचे म्हणजे नक्की काय करायचे? घरातच बसायचे?
आपले दुबळे राज्यकर्ते जनतेला वेठेस धरतात.( वेंगसरकराना विरोध करताना काहीजणाना अतीआदाणीय क्रिकेट्कृषीमंत्री सुरक्षीत क्रिकेट मॅचबद्दल बोलतात..... बहुतेक त्याना दंगेधोपे/बॉम्ब स्फोट करणारे माहीत असावेत)
14 Jul 2011 - 11:06 am | स्वाती दिनेश
काल रात्री उशीरा ही बातमी समजली, पहिल्यांदा आपल्या तेथे असलेल्या लोकांचा विचार मनात आला, सगळे नातेवाईक,मित्र, सुहृद सुखरुप आहेत हे समजल्यावर सुटकेचे हुश्श केले पण कोणाचे तरी मित्र, नातेवाईक.. आपल्यासारखेच सामान्य ह्या बाँबस्फोटात जखमी झाले, मृत्यूमुखी पडले हे वाचून, पाहून खिन्नही झाले.. हे असं किती दिवस चालायचं?
स्वाती
14 Jul 2011 - 11:07 am | गवि
काल काही चॅनेल्सवर उत्तेजित रिपोर्टर्स गळ्याच्या शिरा ताणताणून ओरडत होते, “ये खून जो रस्तेमें गिरा है वो आम आदमीका है. सरकार क्या कर रही है आम आदमी की सुरक्षा के लिये. आम आदमी का सरकारने विश्वासघात किया है.. उनका पर्दाफाश होगया है..” वगैरे भडकावणे चालू होते.
आपण मुंबईसारख्या शहरात आणि फॉर दॅट मॅटर भारतासारख्या देशात कितीही सुरक्षितता ठेवायची म्हटले तरी प्रत्येकाची पिशवी, छत्री, खिसे चेक करणे चोवीस तास शक्य नाही. त्याउप्पर पोटात बाँब लपवून हाराकिरी करणारे दहशतवादीही आहेतच (नाईन इलेव्हन आठवा.. विमानासोबत स्वतःचाही जीव दिलाच की..) तेव्हा काय काय चेक करत बसणार. निराशाजनक आहे सगळं.
आणी आता फोरेन्सिक तज्ञ येऊन त्यांनी म्हटलंय की या स्फोटांत काहीतरी आयईडी की तत्सम तंत्र वापरलंय.. मी म्हणतो की असले शोध लावून पुढे काय होणार? समजा अगदी सापडले आरडीएक्स.. किंवा कळले की १००% हे काम अल कायदाचे आहे, तरी आपण अफगाणिस्तान्-पाकिस्तानात शिरुन त्या अल कायदाची दाढी धरणार आहोत का?
काय उखाडणार आपण.
जाऊ दे. संताप आणि निराशा एकाचवेळी ओव्हरव्हेल्मिंग होत आहेत.
14 Jul 2011 - 11:23 am | मनिष
१०१% सहमत!!!
खूप असहाय्य वाटते.
अगदी, अगदी!!! :(
14 Jul 2011 - 8:13 pm | मराठे
अगदी मनातलं
14 Jul 2011 - 11:14 am | मराठी_माणूस
अजिबात घाबरु नका, पिएम नि कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आता काळजीचे कारण नाही.
(अवांतरः सीएम म्हणतात अफवावर विश्वास ठेउ नका . आम्ही राजकारणी बोलतात त्याच अफवा समजतो)
14 Jul 2011 - 11:20 am | बिपिन कार्यकर्ते
मी सुरक्षित आहे. बातमी येईपर्यंत घरी पोचलो होतो.
14 Jul 2011 - 11:22 am | मदनबाण
सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि मग माझे अभिनंदन करतो ! कारण तू हा धागा काढायला आणि मी हा धागा वाचायला जिवंत आहोत...
आपला देश महासत्ता होतोय ! जीडीपी ग्रोथ होतोय... त्याचीच तर सुमधुर फळे आपण चाखत आहोत नाही का ?
रस्त्यात खड्डे नव्हे तर देशच खड्यात गेला असुन राजकारणी मात्र आनंदात आहेत... ओहो पगारवाढ करुन मिळते ना त्यांना !
त्यासाठी सर्व लगेच एकत्र आले की नाही ? मग अशी देश सेवा करतात तर त्यांना पगार नको का वाढवुन द्यायला ! आपण आहोतच टॅक्स भरायला तयार...
आता मॄतांचे आकडे कळतील,सरकार मॄत व्यक्तींच्या नातेवाईकांना "मदत" जाहीर करेल... "उच्च" स्तरीय बैठका / चौकश्या होतील आणि त्याचा अहवाल लवकारात लवकर जाहीर केला जाईल असे आपल्याला कळेल... चूकुन एखाधा अपराधी सापडलाच तर त्याची सुद्धा कसाब प्रमाणेच व्यवस्था होईल... सगळ कसं नेहमी घडतं तसचं. वेगळ काही घडेल याची शक्यता मात्र नाहीच नाही.
जनता जनार्दन त्यांच्या नावाने फक्त बोटेच मोडु शकते त्यावर त्यांच्या हातात काहीच उरले नाही... कारण षंढपणा बरोबरच आपण या षंढपणात निर्ढावले देखील आहोत. कुत्र्या सारखे आयुष्य जगायचे आणि मग अशाच एखाद्या स्फोटात कुत्ते की मौत मरायचे हेच आपले "सुखी" जीवन.
जाता जाता :---- धमालराव ते वाक्य विसरायच नाही बरं... कुठल ? तेच :--- बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है |
14 Jul 2011 - 11:37 am | सुधीर१३७
बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है |
हेच लक्षात ठेवा आणि विसरुन जा........................ (बाकी सर्व)
14 Jul 2011 - 11:56 am | अमोल केळकर
ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.
खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !
या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!
अमोल केळकर
14 Jul 2011 - 11:59 am | हुप्प्या
ठाकर्यांनी आपल्या स्टाईलने डायलॉगबाजी सुरु केली की लोकांनीच आता अतिरेक्यांचा निकाल लावावा वगैरे.
पण जोवर ज्या सरकारच्या अधिकाराखाली बॉम्बस्फोट होतायत त्यांना त्या मुद्द्यावरून खुर्ची गमवावी लागेल अशी भीती वाटत नाही तोवर ते असेच निष्क्रिय रहाणार. विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर असेच होणार.
उलट जर सत्ताधारी पक्षाला अशी भीती वाटली तर आपले गुप्तचर खाते, खबर्यांचे जाळे पणाला लावून अशा गोष्टी होण्यापासून वाचवेल वा झालेल्या गोष्टींचा छडा लावून लोकांना शासन करेल.
खरे तर सामान्य जनतेला आपल्यापैकी डझन दोन डझन मेल्याचे फार वाईट वाटत नाही. त्यामुळे नेत्यांचे सोकावते आहे. उद्या जर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून कसाबच्या कोठडीवर चाल करुन गेले आणि असे पुन्हा पुन्हा होत रहिले तर झक मारत सरकारला फाशीची शिक्षा त्वरेने द्यावी लागेल.
अजून एक गोष्ट म्हणजे तमाम मंत्री संत्री, आमदार खासदार भक्कम सुरक्षा कडे बाळगून असतात. त्यांना असल्या प्रकारापासून काहीही धोका नाही.
कुणी अण्णा, अप्पा, दादा, मामा, रामदेव, नामदेव, कामदेव बाँबस्फोटचा तपास लागो, असल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशी मिळो म्हणून उपोषण का करत नाही?
छ्या. पुढच्या स्फोटाची वाट बघावी हेच खरे!
14 Jul 2011 - 12:19 pm | नितिन थत्ते
>>विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर....
म्हणून स्फोट घड(वले जा)त आहेत की काय ? [आम्ही यांनी सत्ता मिळवण्याची संधी साधावी म्हणून बॉम्बस्फोट घडवत आहोत पण यांना त्याचे काहीच नाही हे] गुपित असे उघडे करून येथे का बरे सांगितले ? [ते खाजगीत विरोधी पक्षाला नसते का सांगता आले?]
असो. विरोधी पक्षाला ही सत्ता मिळवण्याची संधी कशी काय? लोक बहुधा विरोधी पक्षाच्या कारकीर्दीतल्या घटना जाणून असतीलच.
काळेकाकांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांना सत्ता विरोधी पक्षाकडे सोपवण्यासाठी पत्र लिहावे म्हणतो. निदान विरोधी पक्षाला सत्ता मिळवण्यास मदत म्हणून जे स्फोट घडवले जात असतील ते तरी थांबतील.
14 Jul 2011 - 12:25 pm | श्रीरंग
खरोखरंच, तोड नाही तुमच्या काँग्रेस भक्तीला. आत्ताही तुम्हाला "विरोधकांच्या कारकिर्दीतल्या घटनांबद्दल" गळा काढावासा वाटतो.... कमाल आहे.
14 Jul 2011 - 12:45 pm | नितिन थत्ते
छे बुवा.
मी तर उलट विरोधी पक्षाच्या काळात "कणखरपणे पाकिस्तानवर हल्ला न केल्याच्या/आर या पार की लदाई न केल्याच्या कृतीचं" वेळोवेळी समर्थनच केलंय. दुवे हवे असल्यास शोधून देईन.
इथे हुप्प्या यांना असे बॉम्बस्फोट ही विरोधी पक्षांसाठी सत्ता मिळवण्याची संधी वाटते आहे म्हणून हा प्रतिसाद दिला.
शिवाय मी तर काँग्रेसने सत्ता सोडून विरोधीपक्षांकडे सत्ता द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे याचे कारण "बॉम्बस्फोट ही सत्ता मिळवण्याची संधी आहे" असे काँग्रेसभक्त नसलेल्या सदस्याचे म्हणणे आहे. निदान त्यामुळे असे घडवले जाणारे बॉम्बस्फोट थांबतील अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
14 Jul 2011 - 1:42 pm | श्रीरंग
"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या आघाडीवरही साफ अपयशी ठरून सुध्दा, आपल्याला सत्तेवरून कोणीही खाली खेचू शकत नाही, या आत्मविश्वासापोटी सरकार सुरक्षीततेच्या बाबतीत ढिलाई दाखवत आहे." या मताशी आपण सहमत आहात का थत्ते साहेब? का अजूनही "विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा तरी त्यांनी काय दिवे लावले होते!" असा टिपिकल पळपुटा युक्तिवाद आपल्याला समर्थनीय वाटतो?
14 Jul 2011 - 2:08 pm | नितिन थत्ते
नाही. सहमत नाही. विरोधकांकडे सत्ता असताना काय दिवे लावले? असा माझा (पळपुटा ऑर अदरवाइज) युक्तिवाद नाही. त्याही वेळच्या सरकारने जे करणे आवश्यक आणि शक्य होते ते केलेच होते . आणि आजचेही सरकार जे करणे आवश्यक आणि शक्य आहे ते करीतच आहे इतकेच माझे म्हणणे आहे. सध्याचे सरकार कदाचित तुमच्या नावडत्या पक्षाचे असल्यामुळे माझ्या प्रतिसादात तुम्हाला बायस दिसत असावा.
[काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही. तसेच येथल्या परक्या आणि मतांची फिकीर आजिबात करावी लागत नसणार्या जुलमी वगैरे सरकारने अनेक लोकांना फाशी/जन्मठेप वगैरे शिक्षा सुनावल्या/अंमलात आणल्या. पण ती कृत्ये करणारे आणखी लोक तयार होतच राहिले]].
14 Jul 2011 - 8:36 pm | आनंदयात्री
>>काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही.
खरे आहे थत्ते काका, आपण त्यांनाही आपली गांधीगिरी शिकवुयात. आपण आजवर गांधीगिरीने दहशतवादाला जे सडेतोड उत्तर दिलेय त्याला तोड नाही, बघा ना या वेळेच चक्क त्यांनी आरडीएक्स वापरले नाही, अशीच हळुहळु सुधारणा होईल, मला दहशतवाद्यांचा त्यांच्या या मवाळ धोरणाबद्दल आदर वाटतो. मुंबई हा एक गाल झाला आता आपण मुजाहिदीनला दिल्लीत स्फोट करायला सांगु म्हणजे दुसर्या गालावर तोंडात मारुन घेतल्यासारखे होईल.
14 Jul 2011 - 9:31 pm | हुप्प्या
बलात्कार, चोरी, दरोडे ह्याविरुद्ध कायदे आहेत. वेळोवेळी अशी कृत्ये करणार्यांना शिक्षाही झालेल्या आहेतच. म्हणून हे गुन्हेही संपल्याचे ऐकिवात नाही. म्हणून ह्या गुन्ह्यांविरुद्ध कायदे बनवणे, ते कठोर करणे, आधुनिक पद्धतीने पुरावे गोळा करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न करणे बंद करावे की काय?
कणखर देश उदा. इस्रायल हे दहशतवादाशी लढत आहेत. त्याने दहशतवाद कमी झाला आहे. आणि दहशतवाद संपण्याचे सोडा, जर हे लोक असे लढले नाहीत तर ते स्वतःच संपतील अशी जिवाची भीती असल्यावर ते कारवाया करणारच.
आजचे सरकार दहशतवादाविरुद्ध जे काही करायचे आहे ते करतच आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. ज्या पद्धतीचे वक्तव्ये काँग्रेसी नेते करत आहेत त्यावरुन त्यांचा राजकीय स्वार्थीपणा दिसतो आहे. हिंदूंचा दहशतवाद त्यांना बोचतो. त्याला ते स्वच्छ हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणतात. मात्र मुस्लिम अतिरेक्यांनी कारवाया केल्या की दहशतवादाला धर्म नसतो असा त्यांना साक्षात्कार होतो.
निव्वळ आकडेवारी बघितली तरी कळेल की मुस्लिमांनी केलेला दहशतवाद कितीतरी जास्त आहे. असे असताना गृहमंत्री म्हणतात की भारताला सगळ्यात जास्त धोका भगव्या दहशतवादाचा.
भाजपासारख्या बुळचट, निष्क्रिय, हतबल, हतवीर्य पक्षाचा हवाला देऊन त्यांनीही तसे केले म्हणून कॉंग्रेस तसेच करते हे म्हणणेही चूक आहे. भाजप नालायक होता म्हणून तो हरला. आता जे जिंकले आहेत त्यांनी काही तरी करून दाखवावे.
15 Jul 2011 - 2:22 am | अर्धवटराव
विचारवंतांचे रंगीत चश्मे देशाच्या मूळावर ऊठलेत भाऊ. त्याला इलाज नाहि.
अर्धवटराव
14 Jul 2011 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार
रागावु नको यार धम्या पण प्रतिक्रियापण द्यावीशी वाटत नाही राव आजकाल :(
बाकी काल दादरच्या घटनास्थळावरच्या अधिकार्याला 'मिटरबॉक्स मध्ये शॉर्टसर्किटने स्फोट झाला आहे' हे सांगताना बघून इतके भरुन आले म्हणून सांगतो ना...
ह्या अशा अधिकार्यांची सार्वजनीक दृष्ट वैग्रे का काढत नाहीत ?
14 Jul 2011 - 12:12 pm | श्रीरंग
हे असंच चालू राहणार. दोन दशकं होत आली मुंबईतील ९३ च्या स्फोटांना. आजवर आपण काहीही उपटू शकलो नाहिये पाकड्यांचं. ते मात्र हव्या त्या क्षणी भारतात हवे तिथे स्फोट घडवू शकतात.
सैन्याचा उपयोग १५ ऑगस्ट ची परेड, आणी हवाईदलाचा वापर फक्त क्रिकेटपटू व सेलेब्रिटीजच्या हवाई सफरींसाठी असतो, एवढेच आम्हाला माहित आहे.
14 Jul 2011 - 12:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
दादरला झालेल्या बाँबस्फोटातील मृत व्यक्तींना विनम्र आदरांजली!!
आपण आणि आपले सर्व सहृदय सुरक्षीत आहेत अशी आशा करतो.
ज्यांनी हे स्फोट घडवून आणले त्यांना उत्तम चिकन बिर्याणी आणि उत्तम प्रतिची दारु तिहारला कधी मिळेल याची वाट बघत बसण्यावाचून आपण काहीच करु शकत नाही याची लाज वाटते. जरी त्याचा काही उपयोग नसला तरी त्यांचा तिव्र निषेध नोंदवतो आणि गप कामाला लागतो. :(
14 Jul 2011 - 1:37 pm | शाहिर
आबा : झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ..याचा तपास चालु आहे ..कोणाचीही गय केली जाणार नाही ..दोषी ना कडक कारवाइ ल सामोरे जावे लागेल..[ ( आणि बडे बडे देशो मे ऐसि छोती छोटी बाते होती है)]
बाबा .(आपले सी. एम) : झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो..तथापि , जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी मुंबईकरांनी शांतता राखावी..मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच जखमींवर उपचारांचासाठी होणारा सर्व वैद्यकीय खर्च सरकार करेल.[. (झाला माझा काम)]
14 Jul 2011 - 2:29 pm | शाहिर
http://starmajha.starnews.in/india/34-more/7337-2011-07-14-06-56-23
14 Jul 2011 - 5:09 pm | विलासराव
आजच आलो गावावरुन परत .
बोलण्यासारखे काही नाही ,बाकी गप्प रहाणेच बरे.
14 Jul 2011 - 7:22 pm | समंजस
<<<(भयभीत आणि काळजीत पडलेला) >>>
.....काळजीत पडू नये....मुंबईकरांना या गोष्टींची नवलाई राहीलेली नाहीय आणि भिती सुद्धा नाही.
अश्या घटना घडल्या नाहीत तर आम्हा मुंबईकरांना चुकल्या सारखं वाटतं. या उलट जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सगळं जग आमचं कौतुक करतं (आमचं कार्याप्रती असलेल्या निष्ठेचं, आमच्या professionalism चं, दुसर्याच दिवशी कामावर धावत पळत जाण्याचं आणि मुंबईचा देशातील आर्थिक राजधानी म्हणून असलेला दबदबा कायम ठेवण्याचं, आमच्या सहनशक्तीचं वै. वै....) आता अशी कौतुकं करून घ्यायची तर अश्या घटना घडायलाच हव्यात. नाही का?
14 Jul 2011 - 9:29 pm | राजेश घासकडवी
लहानपणच्या खूप आठवणी आहेत. मोठेपणच्याही आहेत. माझ्या भावी पत्नीला मी त्यांच्या घरी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा तिथल्याच २०१च्या बसस्टॉपवर उभा होतो. (तेव्हा अर्थातच ती भावी आहे हे माहीत नव्हतं...) आमचे सासुसासरे भवानीशंकर रोडवरच राहातात. त्यांचा ठाण्याहून ताबडतोब फोन आला तेव्हा बरं वाटलं. सर्व सुखरूप आहेत.
मिपावर अगदी अगत्याने इतर मिपाबांधवांची चौकशी झालेली पाहूनही बरं वाटलं. सातासमुद्रापलिकडे राहणारे संकटकाळी एकमेकांना आपण सगळे व्यवस्थित आहोत याची हक्काने विचारपूस करतात. स्वतःचा हात वरून काळजी करू नका, मी ठीक आहे सांगतात...
तरीही आंतरजालामुळे माणूस माणसापासून दूर गेलाय असं काहींना वाटतं.
15 Jul 2011 - 8:16 pm | खादाड_बोका
मिपावर......एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही, की फार वाईट झाले. एरव्ही स्वतःला पुरोगामी दाखवणार्या मुसलमानाची रा. स्व. संघाबद्दल, या हिंदुसमाजाबद्दल थोडेसे ही काहि लिहीले तर फार तिखट प्रतिक्रिया येते. पण जेव्हा केव्हा बॉम्ब स्फोट होतात तर सगळे कुठे गायब होतात देव जाणे.
15 Jul 2011 - 9:30 pm | अर्धवटराव
इथे मुसलमान वगैरे प्रश्न कुठे येतो?
(मुस्लीम) अर्धवटराव
18 Jul 2011 - 4:00 am | इंटरनेटस्नेही
दुर्देवी प्रतिक्रिया एव्हढंच म्हणेन. निषेध नोंदवतो. दहशतवादाला धर्म नसतो असे आमचे स्पष्ट मत आहे.
16 Jul 2011 - 6:03 pm | अजातशत्रु
पुन्हा तेच???
.
.
.
.
.
.
.
.
.
इथे मुसलमान वगैरे प्रश्न कुठे येतो? +१
.
.
.
.
.
मृतांमध्ये मुसलमानही आहेत....आता पर्यंन्तची मृतांची संख्या १९ झाली आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
किडा-मुंगी प्रमाणे मरणं, मरण स्वस्त होत आहे.... हे शब्द वाचले होते आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे,
आता बाहेर असलो की घर कधी गाठतोय असं होतं... :(
हताशवाणं,विषण्ण आहे सगळं........ :(