✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

ध
धमाल मुलगा यांनी
Wed, 07/13/2011 - 19:30  ·  लेख
लेख
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40183 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

रामदासकाका, तुमची खुशाली कळवा

धमाल मुलगा
Wed, 07/13/2011 - 19:40 नवीन
रामदासकाका, तुमची खुशाली कळवा प्लिज.
  • Log in or register to post comments

रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत.

नितिन थत्ते
Wed, 07/13/2011 - 21:26 नवीन
रामदासकाका ऑनलाईन दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

होय

रामदास
Wed, 07/13/2011 - 21:31 नवीन
काही वेळापूर्वीच ठाण्यात पोहचलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

स्फोट दादरला झाले आहेत.

अलख निरंजन
Wed, 07/13/2011 - 21:58 नवीन
स्फोट दादरला झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

त्यांचे कामाचे ठिकाण दादर

स्वानन्द
Wed, 07/13/2011 - 22:09 नवीन
त्यांचे कामाचे ठिकाण दादर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

नेमक्या ह्या धाग्यासाठी ...

sagarparadkar
गुरुवार, 07/14/2011 - 13:06 नवीन
नेमक्या ह्या धाग्यासाठी आपण स्वाक्षरी बदललेली पाहून डोळे पाणावले .... आपल्यासारखे महान लोक ह्या भारतात आहेत, हे पाहून मला एकदम समृद्ध अशा ग्रीक / रोमन (चू.भू.द्या.घ्या.) संस्कृतीच्या, (त्या काळच्या) क्रूर, हिंस्र आणि रानटी अशा 'स्पार्टन' लोकांकडून झालेल्या पराभवाची आणि नंतर झालेल्या र्‍हासाची आठवण होतेय. आपली (म्हणजे आम्हा केविलवाण्या) सामान्य भारतीयांची सध्याची स्थिती बरीचशी त्या काळच्या ग्रीकांशी मिळती-जुळती असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अधिक माहिती

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 13:29 नवीन
स्वाक्षरी धाग्यासाठी बदलता येत नाही. सध्या (मी माझ्या खात्याच्या सेटिंग मध्ये बदल करेपर्यंत) मी कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद दिला तरी हीच स्वाक्षरी दिसेल. आणि मी वर्ष-दोन वर्षापूर्वीच दिलेल्या प्रतिसादांखालीसुद्धा हीच स्वाक्षरी आत्ता अपेण्ड झालेली असेल. <पंगा मोड ऑन> ही स्वाक्षरी घेण्याचं कारण काल मला स्फोटांनंतर अनेकांच्या लेखनात कसाबला फाशी न झाल्याविषयी त्रागा दिसला. कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना. तेव्हा कसाबच्या फाशीची मागणी करणे हा देशभक्ती व्यक्त करण्यासाठीचा एक वाकप्रचार असावा ("जयहिंद" किंवा "भारतमाता की जय" सारखा) असे वाटून तो रोज न करणारे म्हणजे देशद्रोहीच असणार असा माझा समज झाला. तेव्हा तो वाक्प्रचार रोज वापरण्याची आठवण सर्व देशभक्तांना रहावी म्हणून ही स्वाक्षरीच बनवून घेतली. :) <पंगा मोड ऑफ> . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

घटनेला अनुसरून सर्वोच्च

sagarparadkar
गुरुवार, 07/14/2011 - 13:52 नवीन
घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्‍यांचे 'टार्गेट' ठरू नये. >> कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना. कारण तुम्ही स्व्तःच कंसात उद्धृत केले आहे ... तरी पण एकूणातच इतर देशांतील न्यायव्यवस्था पहावी. तुम्ही किंवा तेथील कोणताही नागरीक असाच प्रतिवाद सौदी मधे जाऊन करू शकाल का? तिथे आपल्यापेक्षा गुन्हेगारी खूपच कमी आहे कारण गुन्हेगाराला कडक शिक्षा होते आणि त्या शिक्षेचा इतर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक बसतो. मी स्वतः हे पाश्चात्य देशांत पाहिलेले आहे आणि सौदीमधील व्यवस्थेचं वर्णन जवळच्या नातेवाईकांकडून ऐकले आहे जे स्वत: तिथे अनेक वर्ष राहिले आहेत. पण जाऊ दे हे बोलून काय उपयोग? शेवटी कंसातील कबुलीच खरी म्हणायची :) एकच विनंती: कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचे परीणाम आपल्या जवळच्यांना भोगायला लागतील (असं होवू नये ही सदिच्छा) तेव्हासुद्धा हाच युक्तिवाद कायम ठेवा. आत्ता जे तळ्तळाट ऐकू येत आहेत ते अशाच बळींशी सहनुभूती बाळगणार्‍यांचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

टवाळी?

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 16:55 नवीन
>>घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्‍यांचे 'टार्गेट' ठरू नये. धन्यवाद. परंतु आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांत कसाब येत नाही, त्याला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने ती कन्फर्म केली आहे. तसेच त्याची शिक्षा अंमलात आणू नये असे मी (किंवा अन्य कोणीही) कुठेही सुचवल्याचे स्मरत नाही. (माझे त्यावेळचे म्हणजे त्याच्यावर खटला चालू होण्यापूर्वीचे आणि अजूनही मत आहे की तो भारताचा नागरिक नसल्याने भारतीय घटनेनुसार दिले जाणारे हक्क त्याला लागू होत नाहीत. त्यावर खटला चालवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. फारतर तो सीसीटिव्हीवर दिसणारा गोळीबार करणारा माणूस तोच आहे एवढेच सिद्ध करण्याची गरज होती). एखादा जवळच्याचा मृत्यू झाल्यावर छाती पिटून मोठ्याने रडला नाही म्हणजे त्याला दु:ख झालेले नसते असे नाही. स्फोटात मृत झालेल्यांबद्दल सहानुभूती आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

Emergency Numbers:

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/13/2011 - 21:57 नवीन
Emergency Numbers: 022-22621855, 022-22621983, 022-22625020 Helpline Numbers: के.ई.म. ईस्पितळ (022-24136051), नायर ईस्पितळ (022-23085379), हरकिसन्दास ईस्पितळ(23855555 / 30095555), सैफी ईस्पितळ चर्नीरोड (22 6757 0111)Please share
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

होय, ३ ठिकाणचे पोलिसांनी

पुष्करिणी
Wed, 07/13/2011 - 19:42 नवीन
होय, ३ ठिकाणचे पोलिसांनी कंफर्म केलेत. १५ जखमी ... मुंबैतल्या लोकांनो काळजी घ्या
  • Log in or register to post comments

खरंच आहे की

श्रावण मोडक
Wed, 07/13/2011 - 19:45 नवीन
खरीच बातमी आहे. तपशीलांसाठी वाट पहावी हे उत्तम.
  • Log in or register to post comments

हो ब्लास्ट ची बातमी आत्ताच

निखिल देशपांडे
Wed, 07/13/2011 - 19:49 नवीन
हो ब्लास्ट ची बातमी आत्ताच टिव्ही वर पाहतोय.. आम्ही दोघेही घरीच आहोत, मुंबईतल्या ईतर मिपाकरांना संपर्क करायचा प्रयत्न चालु आहे.
  • Log in or register to post comments

दहशतवादी हल्ला असल्याचं

मराठे
Wed, 07/13/2011 - 19:50 नवीन
दहशतवादी हल्ला असल्याचं गृहखात्याने सांगितलं आहे. एक न फुटलेला बाँब दादरला सापडला. ६ लोकं मेल्यांची बातमी एन.डी.टि.व्ही. च्या साईटवर आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे. देशभर हाय अ‍ॅर्लट.

इंटरनेटस्नेही
Wed, 07/13/2011 - 19:50 नवीन
खरं आहे. देशभर हाय अ‍ॅर्लट.
  • Log in or register to post comments

कधी थांबणार हे सर्व?

गणपा
Wed, 07/13/2011 - 19:52 नवीन
:( कधी थांबणार हे सर्व?
  • Log in or register to post comments

समस्त मुंबईकर मिपाकरांना

धमाल मुलगा
Wed, 07/13/2011 - 19:53 नवीन
समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे.
  • Log in or register to post comments

समस्त मुंबईकर मिपाकरांना

इंटरनेटस्नेही
Wed, 07/13/2011 - 20:12 नवीन
समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे. आम्ही गोरेगाव्/जोगेशवरी (अ‍ॅज द केस मे बी) येथे राहतो. नुकताच घरी पोहचलो आणि बघतो तर ही बातमी.. मी तरी ठीक आहे. होप, बाकीचे मिपाकर देखील फाईन असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

जखमींची संख्या खूप अधिक दाखवत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/13/2011 - 19:55 नवीन
जखमींची संख्या खूप अधिक दाखवत आहेत.
  • Log in or register to post comments

याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी

आत्मशून्य
Wed, 07/13/2011 - 20:02 नवीन
याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी असं सांगत आहेत. आता हाय अलर्ट काय कामाचा ? आणी मंत्रायलात तातडीची बैठक सुरू :( तातडीने कृती करायची वेळ असताना बैठका कसल्या घेताय .............
  • Log in or register to post comments

असंच असतं बाबा, बैल गेल्यावरच

सूड
गुरुवार, 07/14/2011 - 01:33 नवीन
असंच असतं बाबा, बैल गेल्यावरच झोपा करायची आठवण होते यांना. जे काय झालं ते जाईल कुठच्या कुठे आणि हे राजकारणी या गोष्टीचं राजकारण करायला मोकळे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

:(

प्रभो
Wed, 07/13/2011 - 20:08 नवीन
:(
  • Log in or register to post comments

स्फोट मुंबईत आणि एनएसजी

यकु
Wed, 07/13/2011 - 20:13 नवीन
स्फोट मुंबईत आणि एनएसजी दिल्लीत! च्यायला..! आणि पुन्हा मुंबई वाचवायला दिल्लीतून (पक्षी उत्तरेतून ) कमांडो पाठवले म्हणायला मोकळे... एनएसजी मुंबईतच ठेवा ना..
  • Log in or register to post comments

मुंबईत एनएसजीचे हब आहे असे

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/14/2011 - 11:20 नवीन
मुंबईत एनएसजीचे हब आहे असे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

I hv reached safe place. They

गवि
Wed, 07/13/2011 - 20:15 नवीन
I hv reached safe place. They are telling in news that its Kasab' birthday. Get to hear there are many many more deaths. All mumbai mipakars, pls let all know you are safe. ViMe.. Dadar madhe rahtaat. Pls let us know.
  • Log in or register to post comments

विमे म्हणजे कोण हो? पूर्ण

यकु
Wed, 07/13/2011 - 20:45 नवीन
विमे म्हणजे कोण हो? पूर्ण नाव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विश्वनाथ मेहेंदळे

स्वानन्द
Wed, 07/13/2011 - 20:52 नवीन
विश्वनाथ मेहेंदळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विश्वनाथ मेहेंदळे.

धमाल मुलगा
Wed, 07/13/2011 - 20:58 नवीन
विश्वनाथ मेहेंदळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मी आणि माझ्या ओळखीतील सगळे

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/13/2011 - 20:58 नवीन
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी आणि माझ्या ओळखीतील सगळे

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/13/2011 - 21:00 नवीन
मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

They are telling in news that

अलख निरंजन
Wed, 07/13/2011 - 21:57 नवीन
They are telling in news that its Kasab' birthday. उगाच अफवा पसरवू नका. कुठल्याही बातम्यांमधे असे सांगितलेले नाही. कसाबचा जन्मदिन १३ सप्टेंबर आहे. आहे त्या गोंधळात भर घालू नका. निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला. That is the least we can do!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

thats why I specifically said

गवि
Wed, 07/13/2011 - 22:43 नवीन
thats why I specifically said that they are telling in the news. This is going around in news everywhere. I am not telling any 'afava' If news on all channels is not to be believed or mentioned also,then how we believe news for blasts also?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

मी

चिरोटा
Wed, 07/13/2011 - 20:19 नवीन
मी स्फोट व्हायच्या आधी दोन तास त्या(दादर) भागातूनच घरी पार्ल्याला आलो.
  • Log in or register to post comments

असे कळते.

शशिकांत ओक
Wed, 07/13/2011 - 20:20 नवीन
मुंबईतील अनेक दुकानातून तात्काळ मेणबत्या मिळवून वाघासरहद्दीवर त्या पेटवून निषेध व्यक्त करायला पाकीप्रेमी निघाले आहेत असे कळते.
  • Log in or register to post comments

ह्युमन राईटसवाले विसरलात का?

निनाद
गुरुवार, 07/14/2011 - 04:43 नवीन
ह्युमन राईटसवाले विसरलात का? त्यांच्यामुळे तर मेणबत्त्यांचा धंदा जोरात चालतो. आता स्फोट घडवणार्‍या अतिरेक्यांना वाईट वागणूक दिल्याबद्दल मोर्चा काढावा लागेल ना त्यांना. त्यांचीही मेणबत्त्यांसाठी धावाधाव चालली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

भें** ह्या कसाबला लटकवा रे

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/13/2011 - 20:29 नवीन
भें** ह्या कसाबला लटकवा रे रोज रोज हे टेंशन नको रे
  • Log in or register to post comments

कसाबला लट-(नक्की)कवा?...

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/13/2011 - 20:47 नवीन
त्याला कसले लटकवतायत हे...स्वतःच लटकलेले...आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे... त्या जव्हेरी बजारातल्या एका/दोघांचे साफ तुकडे उडालेले दिसतायत...भयंकर आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस

अलख निरंजन
Wed, 07/13/2011 - 21:56 नवीन
आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे... हे कुठे समजले तुम्हाला? निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला. That is the least we can do!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अलखजी जरा गुगल सर्च करा....

श्री
Wed, 07/13/2011 - 22:13 नवीन
अलखजी जरा गुगल सर्च करा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

मालक कोर्टाची दिशाभूल

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/14/2011 - 11:56 नवीन
मालक कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी त्याची जन्मतारीख कायमच वेगवेगळी सांगीतली गेली आहे. http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab http://www.washingtonpost.com/blogs/blogpost/post/mumbai-attacks-on-terrorist-ajmal-kasabs-birthday/2011/07/13/gIQAULdlCI_blog.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलख निरंजन

अता ह्यावर प्रतिक्रीया काय लिहायची मित्रांनो?

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/13/2011 - 20:30 नवीन
काहीही सुचत नाहिये...हे सगळं घडल्याचं कळताचं(नेहमीप्रमाणे)टीव्हीवर चेनल सर्फिंग करत होतो...वेगवेगळ्या बातम्या तर येत होत्याच,म्हटलं रात्रीपर्यंत काय काय अजुन घडणारे कोणास ठाऊक?...तेवढ्यात लोकसभा चेनलवर कुणुसा एक राजकीय विश्लेषक भारतीय जनतेची अवस्था मनुस्म्रुतितल्या शूद्रांसारखी झाल्याचं समर्पक पणे सांगत होता...काय वेगळं बोलला तो?एक तर जनावरांसारखे जगा/नाहीतर त्यांच्यासारखेच मारले जा...कधिही कुठेही नी केंव्हाही... अवांतर-बरेचसे न्युजचेनल रिपोर्टर नेहमी सारखे मढं फाडत बसलेले दिसतायत...ह्या चेनल रिपोर्टरना पाहिलं की प्र के अत्र्यांचा ''रिपोर्टर आणी कावळा" हा लेख आठवल्यावाचुन रहात नाही...
  • Log in or register to post comments

एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर

स्वानन्द
Wed, 07/13/2011 - 20:55 नवीन
एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर कुठले ही न्युज चॅनेल बघू नका. तसं ही काही नीट माहिती मिळणार नाही. नक्की काय घडलंय हे उद्या वर्तमानपत्रात व्यवस्थीत कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सहमत

नावातकायआहे
Wed, 07/13/2011 - 21:09 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

मित्रांनो, काळजी घ्यावी

धनंजय
Wed, 07/13/2011 - 20:37 नवीन
मित्रांनो, काळजी घ्यावी
  • Log in or register to post comments

जाहीर निषेध

कार्लोस
Wed, 07/13/2011 - 20:43 नवीन
मारी टोपी एवढा पावूस पडतोई आणि मुंबई मध्ये हे बिन दिवाळीचे फटाके कसले फुटले ???????? बुधवार ह्या हिंदी चित्रपटाची खूप आठवण आली पण But at this stage iam searching that kind of common man showed in the movie.
  • Log in or register to post comments

काळजी घ्यावी

विशाखा राऊत
Wed, 07/13/2011 - 20:45 नवीन
बातमी वाचुन कळत नाही ही शिक्षा गरीब सामान्य लोकांनाच का? का त्यांना "Z secirity" नाही म्हणुन कोणीही या काहीही करा.
  • Log in or register to post comments

फक्त कसाबला लटकवू नका

शुचि
Wed, 07/13/2011 - 20:45 नवीन
फक्त कसाबला लटकवू नका त्याबरोबर पाकचा आणि देशद्रोह्यांचा सोक्षमोक्ष लावा.
  • Log in or register to post comments

आम्ही हिंदुत्ववाद्यांवर

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/13/2011 - 20:46 नवीन
आम्ही हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केल्यापासून बॉम्बस्फोट होणे बंद झाले आहे इति दिग्विजय सिंह
  • Log in or register to post comments

मुंबैच्या लोकांनो काळजी घ्या

प्रीत-मोहर
Wed, 07/13/2011 - 20:48 नवीन
मुंबैच्या लोकांनो काळजी घ्या .... आणि आपली खुशाली लवकर कळवा
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
Wed, 07/13/2011 - 20:49 नवीन
हेच म्हणतो आणि पाकचा निषेध करतो (मेणबत्ती ही पेटवणार) . आता कोणतरी गृहसचिव वैगेरे पाकची आंतराष्ट्रीय पातळीवर वैगेरे निर्भत्सना करेल मग चांगलाच धडा मिळेल या पाकड्यांना.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा