धग

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Jul 2011 - 2:52 pm

माझ्या भावनांची धग;
मी जाणीवपूर्वक कमी करतो आहे;..
जेणेकरून त्यांची झळ;
तुला कधीच अस्वस्थ करणार नाही.........
.......... मी जळालो तरी तुला कळणार नाही.....

मला माहित आहे,.......
दिवस ढळणार नाही, रात्र मावळणार नाही.........
स्वप्नपंखात वाढणारं वारूळही; कधी कोसळणार नाही.........
.........पण
आभाळ फाटलं तरीही,
आता ते गळणार नाही.........

उन्हासोबत सावली; तसा वार्‍याबरोबर गंध येणार.....
गाढ साखरझोपेतदेखिल; चाहूल तुझी देणार..............

सुखात तुझ्या;
माझा मी;
अंग मोडून पडणार..
चुकून आलंच वादळ-.....
माझ्या अंगावरती घेणार.......

घाबरू नकोस,.........

............चूक-भूल; देणे-घेणे; डोळे मिटूनच होणार......
सावरीचं कुंपण;....
फक्त आधाराला असणार...............

...........................अज्ञात

करुणकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Jul 2011 - 5:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडेश.

गणेशा's picture

12 Jul 2011 - 6:55 pm | गणेशा

कविता छान , आवडली

कच्ची कैरी's picture

12 Jul 2011 - 8:44 pm | कच्ची कैरी

>>>स्वप्नपंखात वाढणारं वारूळही; कधी कोसळणार नाही.........
खूपच आवडले :)