मिपाकरांची क्रियेटीव्हता आजमावण्यासाठी हा धागा...
तर विषय हा आहे कि.. प्रत्येक प्रतिसाद कर्त्याने, एक प्रोडक्ट द्यायचं, आणि त्या खालच्या मेम्ब्राने त्याची जाहिरात करून दाखवायची, आणि नवीन प्रोडक्ट टाकायचं
ति पण एकदम हटके.
प्रोडक्ट पण एकदम झकास द्यायचं गड्यांनो (आणि गडींनो )
तर सुरुवात मी करतो..
माझ प्रोडक्ट -- "वास" डीओ - डी वास इफ्फेक्ट
असो डीओ जो सर्व पब्लिक ला करील.. बेहोष.. धुंद..
असा वास जो सर्व लोकांना ठेवेल दहा फुट लांब तुमच्यापासून .., गर्दीत ट्राफिक मध्ये तुमची स्वतःची स्पेस जपणारा ..
आणि ह्याचा परिणाम चालेल संपूर्ण १२ तास .....
आजच मारा
वास == दी वास इफ्फेक्ट
तर माझ प्रोडक्ट "हेल्मेट"
करा सुरुवात
प्रतिक्रिया
4 Jul 2011 - 9:47 pm | अप्पा जोगळेकर
उत्पादकतेची प्रचीती अजून आलेली नाही पण क्रिएटीवीटीच्या नावाने आम्ही ठणठणाट असल्यामुळे पास देत आहे.
4 Jul 2011 - 10:01 pm | सूर्यपुत्र
हेल्मेट :
सादर आहे "डोके" कंपनीचे नवीन हेल्मेट.
असे परिपूर्ण डोके, की जे कुठेही आणि कितीही आपटले, तरी बिल्कुल पश्चात्ताप होणार नाही. हे हेल्मेट वापरा आणि परीक्षेत न सुटणारा पेपर, 'हो' न म्हणणारी गर्लफ्रेंड, या आणि अशाच गोष्टींवर मनसोक्त डोके आपटूनही डोके शाबूत राहील, याची खात्री बाळगा.
या हेल्मेट मधे इन-बिल्ट हेड-मसाजर, इन-बिल्ट हेडफोनसुद्धा समाविष्ट केले आहे. शिवाय, हेल्मेटची समोरची काच तुमच्यासाठी टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीनचे सुद्धा काम करू शकेल.
याचबरोबर हे "डोके" तुमच्या केसातील उवा, लिखा आणि कोंडा यांचे रिपेलंट म्हणूनही काम करेल. (फक्त यातील पेस्ट्रीसाईड्स लेव्हल कायम मेंटेन करणे आवश्यक.)
टॅगलाईन : डोक्याच्या सर्व समस्यांपासून मुक्त राहण्यासाठी तुमच्याकडे "डोके" असणे आवश्यक.
माझा विषय : घड्याळ.
-सूर्यपुत्र.
4 Jul 2011 - 11:58 pm | शुचि
विवाहीत आणि त्रस्त (द्विरुक्तीची गरज आहे का?) नवर्यांनो त्वरा करा. "गानकोकीळ" या कंपनीचे "स्वरपुष्प" गजराचे घड्याळ घेऊन तर बघा. लग्नानंतर काही काळ कोमल गांधार लावून उठविणारी पत्नी काही वर्षातच तारसप्तका लावून उठवू लागते. तुमच्यापैकी प्रत्येकाचाच अनुभव कमी अधिक प्रमाणात वरीलप्रमाणे असेलच. काही वर्षातच बायकांच्या या वागण्यामुळे नवरे मंडळी अनुक्रमे बुचकळ्यात पडतात, आश्चर्याने थक्क होतात, रागावतात, धुमसतात, थंड होतात, निर्ढावतात असा आमचा अनुभव आहे. जर आपण आमचे "स्वरपुष्प" गजराचे घड्याळ घेऊन पहाल तर आपण अनेक वर्षे परत मागे जाल याचे हमी आहे. आपल्याच पत्नीच्या आवाजातील कोमल पुष्प ओवून आपल्याला रोज जागे करण्यात येईल. फक्त अपल्या पत्नीच्या नकळत तिचा आवाज यात रेकॉर्ड करायचा. पुढे तो आवाज मृदू, मुलायम करून, एक सुंदर तान, मुरक्यासहीत आपल्याला ऐकवायची जबाबदारी आमची.
तेव्हा त्वरा करा "गानकोकीळ" या कंपनीचे "स्वरपुष्प" गजराचे घड्याळ घेऊन तर बघा. ऑफर लिमिटेड.
माझे प्रॉडक्ट - उशी
5 Jul 2011 - 10:24 am | पंगा
नेमक्या कोणत्या द्विरुक्तीबद्दल गोष्ट चाललेली आहे?
कंसाची जागा लक्षात घेता, 'त्रस्त' आणि 'नवरा' या द्विरुक्तीबद्दल हे विधान असावे, असे प्रथमदर्शनी वाटते. हे साहजिकच आहे, कारण 'नवरा = त्रस्त' हे समीकरणवजा गृहीतक आता 'क्लीशे' म्हणता यावे इतके अतिवापराने घासघासून गुळगुळीत झालेले आहे. त्यामुळे सर्वप्रथम तेच लक्षात आल्यास दोष त्या कॉपीरायटरणीचा नसून, स्त्रीकडे केवळ 'एक त्रास' या एकाच नजरेने पाहणार्या, पुरुषप्रधान मानसिकतेखाली वाढलेल्या आपल्या या समाजाचा* आहे. (* वॉर्निंग: या असल्यांना 'तुमच्या घरी आयाबहिणी नाहीत काय रे, लेको?' हा तितकाच घासघासून गुळगुळीत झालेला क्लीशेवजा सनातन प्रश्न विचारूनही काऽही उपयोग होणार नाही. यांच्या आयांनी यांच्या लहानपणी यांना फक्त धपाटे घातले आणि बहिणींनी फक्त भोकाड पसरून यांच्या कागाळ्या यांच्या आयांकडे करून यांच्या आयांना यांना आणखी धपाटे घालण्यास प्रवृत्त केले. तेव्हा, फरगेट इट.) मात्र, या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे, कोणताही त्रास हा रोजचाच झाला, की ('रोज मरे त्याला कोण रडे' या न्यायाने) कालांतराने त्याची सवय होऊन त्याचे काही वाटेनासे होते, आणि मग तो त्रास त्रास राहत नाही. सबब, दीर्घकालीन ('निर्ढावलेल्या') नवर्यांच्या बाबतीत 'त्रस्त' आणि 'नवरा' ही द्विरुक्ती होईलच, असे खात्रीलायकरीत्या सांगता येईलसे वाटत नाही.
उलटपक्षी, या चटकन डोळ्यात भरणार्या द्विरुक्तीपाठी या वाक्यात आणखी एक महत्त्वाची (आणि भरवशाची) द्विरुक्ती दडलेली आहे, हे सहसा लक्षात येत नाही. ती म्हणजे 'विवाहित' आणि 'नवरा' ही द्विरुक्ती. 'नवरा' हा व्याखेनेच 'विवाहित' असतो, हे येथे लक्षात आणून देणे प्राप्त आहे. (एरवी नवर्याची भूमिका पुरेपूर वठवणार्या परंतु अविवाहित अशा पुरुषास मराठीत 'नवरा' असे संबोधले जात नाही. त्याकरिता मराठीत - किमान बोलीभाषेत तरी - वेगळा शब्द आहे, परंतु त्याचा उल्लेख अथवा त्याबद्दलची चर्चा करणे येथे अप्रस्तुत ठरेल, सबब तूर्तास आवरते घेतो. आभारी आहे.)
9 Jul 2011 - 7:04 pm | सेरेपी
:D
काय राव तुमीबी?क्रियेटिविट्टीमदि थोडं उन्नीस-बीस वाय्चंच!
5 Jul 2011 - 12:04 am | मी-सौरभ
जशी नाकाखाली मिशी ही पुरुषांची शान
तशीच डोक्याखाली 'झोपे बंधूंची' उशीच छान :)
आजच घ्या अन झोपून पहा .....
झोपे बंधूंची मखमली उशी........
माझे प्रॉडक्ट - टॉवेल (महावस्त्र)
5 Jul 2011 - 7:34 am | रेवती
वापराल आमचे टॉवेल तर म्हणाल ऑल इज वेल.;)
5 Jul 2011 - 12:26 am | लॉरी टांगटूंगकर
उगवत नसेल मिशी तर वापरा पेशल उशी!!!!!!!!!!!!!!!
कुठ्ल्याही प्रकारची मिशी हवी असेल तर आमची स्पेशल उशी वाप्रा.हि उशी वेग वेगळ्या ठिकाणी ठेवुन
पाहीजे तसे आणी पाहिजे त्या प्रकारे केस उगव्ता येतात.हेअर रीप्लाण्टपेक्षा
स्वस्त आणी मस्त!!!!४० वर्शानच्या दिर्घ सन्शोधना नन्तर या उशीचि निर्मिति करण्यात आलि आहे.आमचे सुखी ग्राहक सम्पुर्ण जगात आहेत.................
ता.क.---जास्त केस आल्यास आम्च्यावर केस करु नये.
ता.क.२--१ कोटी चेलेन्ज विशयी चौकशि केल्यास असलेले केस भादर्ले जातील
माझे प्रॉडक्ट---मिसळपाव
5 Jul 2011 - 9:30 am | स्पा
चून चून के मिसळ
चुनचुन ची आरोग्यदाई मिसळ
खाताच सर्व रोग होतील पसार :)
पोटात उठेल असा आग डोंब, कि सर्व रोगांची होईल बोंबाबोंब
सर्व रोगांना आपल्या आगीने चून चून के मारणारी
चून चून ची मिसळ :)
सूचना : सदर मिसळ खाल्ल्या नंतर , पंचकर्माची अनुभूती मिळत असल्याने (ती हि १२ रुपयात ;) )
दुसर्या दिवशी हापिस ला सुट्टी टाकायला हरकत नाही ;)
माझे प्रॉडक्ट---पांडू बाम
5 Jul 2011 - 10:20 am | ज्ञानोबाचे पैजार
एक बाम फोडतो घाम,
जाला वरचे लेख, धागे, प्रतिक्रीया वाचुन होणारी जळजळ पांडु बाम ने कमी होते.
नाडी वरचे लेख वाचुन जर डोके दुखत असेल तर लावा पांडुबाम
मिपा वरच्या अफाट पाक कॄतींनी पोटात खड्डा पडला.... लावा पांडुबाम
कलादालनातले फोटो पाहुन पाहुन डोळे चुरचुरतायत? आहो पांडु बाम लावा
एकोळी धाग्यांमुळे मस्तकावरची शीर उडायला लागली .. विचार काय करताय पांडुबाम लावा.
टीप
मै पांडु बाम हुवी, डारलिंग तेरे लिये असले गाणे वगेरे म्हणायची आम्हाला गरज नाही.
बाटली वर आमचा फोटो पाहुनच विकत घ्या (डुप्लीकेट माला पासुन सावध रहा)
आपल्या कुवती नुसार वापर करावा दुष्परीणामांना आम्ही जाबाबदार नाही.
क्रमशः धागे काढुन अर्धवट सोडणार्या आपल्या मित्रांना वाढदिवसाची भेट म्हणुन द्या पांडुबाम
पांडु बाम पांडु बाम पिडाहारी बाम
आमचे चॅलेंज :- शरद पशुखाद्य
5 Jul 2011 - 11:58 am | विजुभाऊ
शरद पशुखाद्य
शरद पशु खाद्य
शर " द पशु खाद्य"
कोणत्याही पशुला तब्यात ठेवण्यासाठी शरदपशुखाद्य.
हे खाद्य पशुना द्या आनि भरघोस उत्पन्न मिळवा
( किमतीत कमी तरिही तुमचे उत्पन्न कधीच कोणाला समजून येणार नाही ही हमी )
जेवण्यात हमखास चव आणणारे शरद पशुखाद्य. नव्या संशोधना नुसार खास १२ प्रकारच्या मती वापरून बनवलेले. खात्रीलायक पोट साफ करणारे शरदपशुखाद्य एकदा अनुभव घेवून पहा)
(अवांतरः आमच्या प्रॉडक्टची झैरात आम्ही करीत नाही. विरोधकच करतात. )
माझे प्रॉडक्ट : " राखीव जागा - रीयूजेबल बबलगम "
5 Jul 2011 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार
काही लोकांनी मिपाचा उकिरडा केलाच आहे :) आता आपण त्याला सक्रिय हातभार लावताना पाहून आपला मित्र असल्याची शरम वाटली.
बाकी हे आमचे वैयक्तिक मत असल्याने फार गंभीरपणे घ्यावे अशी अपेक्षा देखील नाहीच.
बाकी चालु द्या...
5 Jul 2011 - 1:31 pm | कवितानागेश
छान जाहीरात सुचत नाही म्हणून इतका रागराग?
:)
9 Jul 2011 - 1:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
याला म्हणतात, "Pot calling the kettle black".
किंवा सरळ भाषेत सांगायचे झाले तर हे म्हणजे "एका खिडकीत बसणाऱ्या बाईने, दुसऱ्या खिडकीतील बाईला चवचाल म्हणण्यासारखे आहे".
बाकी हे आमचे वैयक्तिक मत असल्याने फार गंभीरपणे घ्यावे अशी अपेक्षा देखील नाहीच. ;-)
9 Jul 2011 - 6:53 pm | अप्पा जोगळेकर
प्रत्येक ठिकाणी पिंक टाकणार्या स्वघोषित संपादकांमुळे सुद्धा मिपाचा उकिरडा होऊ शकेल अशी भीती वाटते.
बाकी हे आमचे वैयक्तिक मत असल्याने फार गंभीरपणे घ्यावे अशी अपेक्षा आहे. :)
9 Jul 2011 - 7:12 pm | परिकथेतील राजकुमार
मेहेंदळे ते मी आणि स्पा बघुन घेउ :)
कृपया पुढच्या वेळी आपल्या विनोदाची पातळी जरा जपलीत तर बरे होईल .
10 Jul 2011 - 5:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>मेहेंदळे ते मी आणि स्पा बघुन घेउ
जरूर बघून घ्या. मी कोण अडवणारा? पण वरील वाक्यात "तुम्ही का मध्ये बोलता?" असे रीडिंग बिटवीन द लाईन करणे अपेक्षित असेल तर सांगा. त्या प्रमाणे उत्तर देता येईल.
>>कृपया पुढच्या वेळी आपल्या विनोदाची पातळी जरा जपलीत तर बरे होईल .
गुरुजी, तुमच्या कडून शिकतो आहे. पुढील वेळेस पातळी अजून खाली आणून तुमच्या तोडीस तोड करण्याची "जी-तोड कोशिश" नक्की करेन. बाकी तुमची "शिष्यात इच्छेत पराजयम" ही वृत्ती पाहून आनंद झाला.
11 Jul 2011 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार
कसे आहे मेहेंदळे चुक माझीच आहे बघा. भडव्याला सगळीकडे खिडकीत बसणार्या चवचाल बायाच दिसणार हे माझ्या लक्षातच आले नाही आणि उगा तुम्हाला काहीतरी सुचवायला गेलो.
बाकी खिडकीत बसणार्या आपल्या जातीवर उतरल्या तर तुमच्यासारख्यांना कंबरेचे पण लाज वाचवायला वाचवणे मुश्कील होते हे ध्यानात ठेवलेत म्हणजे झाले.
असो..
अजुन काही तक्रार असल्यास प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु :)
11 Jul 2011 - 12:01 pm | स्पा
विमे स्वतःला आवरा
इतक्या हीन भाषेत प्रतिसाद द्यायची निदान ह्या धाग्यावर तरी गरज नव्हती
संबंधित भाषेत गरळ ओकायला खरड वह्या दिलेल्या आहेत, त्याचा वापर करावा
11 Jul 2011 - 12:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे
स्पा भाऊ, मी केवळ दाखला दिला. उपमा, उत्प्रेक्षा वगैरे वगैरे (मूळ प्रतिसादात "सारखे" हा शद्ब आहे. कुठला अलंकार झाला ओळख पाहू). इतके पर्सनली घ्यायची गरज नाही. कुणीच.
आणि भाषेबद्दल बोलायचे झाले तर, यापेक्षा हीन भाषेत प्रतिसाद / दाखले दिले गेले आहेत. ते पुन्हा पुन्हा वापरले पण गेले आहेत. आणि हे सर्व खवत नाही तर धाग्यांवरच झाले आहे. तुम्हाला उदाहरणे हवी असतील तर व्यनी करा. अनेक देऊ. हे दाखले कुणी दिले होते हे सांगायला फारशा व्यासंगाची गरज नाही. त्यामुळे ज्याला ज्या भाषेत पटकन कळेल अशा भाषेत बोलावे, हे तत्व वापरले.
असो, या बाबतीत आम्ही त्यांना गुरु मानले आहे. पण त्यांची पातळी गाठणे आम्हाला शक्य नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या प्रतिसादावरून ही बाब अधोरेखित होते आहे, असे मला वाटते. अर्थात तुम्हाला तो प्रतिसाद हीन भाषेतील वाटला नसेल म्हणा, वाटावा असा आग्रह पण नाही.
11 Jul 2011 - 1:31 pm | स्पा
प्रश्न हा आहे कि...
अवांतर करण्यास सुरुवात तुमच्याकडून झाली.. खरं तर त्याची काहीच गरज नव्हती
आणि तुम्हाला व्यक्तिगत काहीही बोलले गेले नसताना , तुम्ही चवचाल बाईची जी उपमा वापरलीत, ती नक्कीच सोडून देण्यागत बाब नाही
11 Jul 2011 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार
त्यांनी चवचाल बै कधी पाहिली नसावी.
त्यांना कधी वेळ आहे विचार, स्वखर्चाने दाखवायला घेऊन येतो म्हणाव ऑफिस किंवा घरी :) कुठे सोयीचे पडेल ठरवा म्हणाव.
11 Jul 2011 - 2:30 pm | गवि
अरे विमे आणि परा. कशाला आता बिनकामी वाद.
जाऊ दे ना.
आमचे दोन मित्र असे एकमेकांत वादावादी शब्दाशब्दी करताना बघून जाम अस्वस्थ वाटतं. मनापासून बोलतो.
कशाला उगीच?
11 Jul 2011 - 2:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ओके. मी माझ्या बाजूने हा वाद अजून वाढवत नाही.
11 Jul 2011 - 2:36 pm | स्पा
गवि तुम्ही जाहिरात चुकून माझ्या व्यनित टाकलीत ,
इथे लिहा ती ;)
5 Jul 2011 - 1:00 pm | स्पा
श्रीयुत परा,
सदर धाग्यातून फक्त मनोरंजन व्हावे इतकाच हेतू आहे ,
शिवाय कुठला विशिष्ट गट दुखावला जाईल असे प्रक्षोभक लिखाणही नाही, वादा वादी नाही
त्यात आपणाला उकिरडा झाल्यासारखे काय वाटले हे समजले नाही
असो चालायचेच
5 Jul 2011 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार
सदर खेळांसाठी फेसबुक, ऑर्कूट, गूगल प्लस अशी माध्यमे आहेतच की :) उद्या ह्याच धर्तीवर वरच्या सदस्यनामाला कुठला डीपी चांगला दिसेल ? , वरील सदस्याच्या नावाला शोभेल असा फिशपाँड द्या, वरील सदस्यनामाला बघुन कोणते गाणे सुचते ते लिहा अशा खेळांचा उगम झाला आणि त्या खेळांमधुन देखील मिपाकरांची प्रतिभा बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे असा सदर लेखकानी दावा केला तर ? मग ह्या अशा धाग्यांचा जनक म्हणुन दोष आपणावर जाणार नाही काय ? बघा... शांत डोक्याने विचार करा.
अवांतर :- अर्थात आपल्या सहीचा आणि लिखाणाचा काही संबंध नाही असे दिसत असताना मी पामर काय बोलणार ? ;)
अती अवांतर :- १० दिवसांपूर्वी एक काम सांगीतले होते त्यात देखील लक्ष घालत असाल अशी आशा आहे.
5 Jul 2011 - 1:48 pm | स्पा
आपला रोख समजला
तसं काही होणे इथे शक्य नाही असे वाटते :)
आणि झालेच तर मिपाकर त्याला योग्य रस्ता दाखवतीलच :)
अवांतर : - कामात लक्ष आहे.... चिंता करू नये , फोनवले जाईल
5 Jul 2011 - 2:32 pm | नाना बेरके
माकडछाप चरखा
चरखा, चरखा, चरखा
आपल्या संस्कृतीचा हेका
चर आणि खा
चाती फिरते जातीसारखी
पेळू फिरतो वळू सारखा
चरखा, चरखा, चरखा
चौसष्ट वर्षांची परंपरा असलेला आमचा चरखा वापरा
आणि लांबच लांब सूत तयार करा.
एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनचा धागा अजून घट्ट आहे.
अडाणी माणसाला चालवता येईल बरं कां
आहेच आमचा बहुगुणी माकडछाप चरखा
:bigsmile:
5 Jul 2011 - 2:50 pm | इरसाल
माकडछाप चरखा अहो माकडछाप चरखा
चरखा आहे चरखा आहे नानांचा बरका
वापरते हो वापरते हि दत्तांची बरखा.
माकडछाप चरखा अहो माकडछाप चरखा
पाहता पाहता चरखा हा चहा तुम्ही भुरका,
चरखा चरखा करता करता आला हा गुरखा
चरखा,बरका, बरखा, कोण आहे गुरखा.
समजलं जर का नशीन तर पावणं वाईच जरा सरका.
5 Jul 2011 - 3:00 pm | नाना बेरके
हा.. हा.. एक नंबर.
5 Jul 2011 - 5:00 pm | विजुभाऊ
श्री राजटुकार याना सर्वत्र उकिरडे का दुसतात कोण जाणे.
त्यानी सत्वमूर्ती स्पा याचाशी भाम्डान उकरून काढले त्यामुळे माझे प्रोडक्ट मागे पडले
माझे प्रॉडक्ट आहे चित्रपट "राखीव जागा : द रीयूजेबल बबलगम"
5 Jul 2011 - 5:00 pm | विजुभाऊ
श्री राजटुकार याना सर्वत्र उकिरडे का दुसतात कोण जाणे.
त्यानी सत्वमूर्ती स्पा याचाशी भाम्डान उकरून काढले त्यामुळे माझे प्रोडक्ट मागे पडले
माझे प्रॉडक्ट आहे चित्रपट "राखीव जागा : द रीयूजेबल बबलगम"
5 Jul 2011 - 5:01 pm | विजुभाऊ
श्री राजटुकार याना सर्वत्र उकिरडे का दुसतात कोण जाणे.
त्यानी सत्वमूर्ती स्पा याचाशी भाम्डान उकरून काढले त्यामुळे माझे प्रोडक्ट मागे पडले
माझे प्रॉडक्ट आहे चित्रपट "राखीव जागा : द रीयूजेबल बबलगम"
5 Jul 2011 - 5:10 pm | इरसाल
इजूभौ कितीदा ?
यावरून एक झ्हाहिरात आटवली.
इग्नोर कर. (नाना पाटेकरच्या आवाजात)
5 Jul 2011 - 5:31 pm | टिलू
भाई...तुम स्नान करते हो कि नाय ?
भाई...तुम स्नान करते हो कि नाय ?
हा हा...मै स्नान करुंगा...लेकीन जाव पेहले वो चंदन साबून लेके आओ जिसके साथ चमेली शाम्पू फ्री मिलता है...उसके बाद मेरे भाई तुम जिस बाथरूम मी कहोगे मै स्नान करणे के लिये तय्यार हु !!
चंदन साबून...आज हि आजमाये !!
5 Jul 2011 - 7:44 pm | गणेशा
मस्त .. आवडली जाहिरात. मुन्नाभाई मुळे चित्र समोर आले.. पण हल्लीच्या साबनाच्या अॅड मध्ये पुरुष फक्त नावालाच उरले आहेत.. बिच्चारा पुरुष.
--
पण पहिल्या लेखात असे आहे की पुढच्याला एक वस्तु द्यायची ती तर येथे आता कोणीच देत नाहिये. ?
11 Jul 2011 - 7:00 pm | वपाडाव
आपला चित्रपटांचा अभ्यास फारच तोडका आहे असे यावरुन प्रतित होते.....
असो... लिहिण्याची गरज नव्हती....
अज्ञान झाकुन राहिले अस्ते तर आम्हालाही आनंद झाला असता....
ही जाहिरात "दिवार" चित्रपटातील दोन भावांचा संवाद आहे...
5 Jul 2011 - 7:41 pm | गणेशा
'ऑक्सीफ्रेश' साबन
---
वस्तु स्थीती :
एक मस्त बाथ टफ विथ मादक कन्या आणि तिचा प्रियकर.
बाथरुम मध्ये जवळच मोहक फिश टँक
प्रियकर जोश मध्ये आलेला असतो आणि मादक कन्येचा हातातील साबन तो बाजुला भिरकवतो.
तो साबन फिश टँक मध्ये पडुन त्यातील सगळे मासे ( जे रंगानी काळे असतात), ते सगळे पांढरे शुभ्र होतात.
आणि बाजुला यांचा मस्त रोमांन्स
पाठिमागे जाहिरातीचा आवाज :
रंग रंग उजाळणारा.. ऑक्सीजन युक्त साबनाचा गंधाळलेला फ्रेश रोमांस, आता आपल्या घरात ..
आजच 'ऑक्सीफ्रेश' खरेदी करा आणि रोज फ्रेश रहा...
अवांतर: सर्व मासे हे कन्येसारखे सडपातळ आणि मादक असतात, उगाच बेढब जाड मासे कोणी डोळ्यासमोर आनु नये, मासे हे मादक कन्येचे रुप आहेत.. जावुद्या आयडीआ कशी वाटली पन?
पुढील व्यक्तीसाठी : आस्मी बिंदि
5 Jul 2011 - 7:59 pm | राजेश घासकडवी
गर्वसे जताओ संस्कृती हिंदी
बीबी को लगाओ आस्मा बिंदी
हर शख्स लगवा सकता है, अपनी पवित्र, देवीस्वरूप बीबी को, आस्मां बिंदी.
आस्मा बिंदी लगाओ, चांद को भगाओ.
बुरखा आहे? छे, चिंधी ही!
मागे आस्मा बिंदी ही!
आस्मा बिंदी.
आमचं प्रॉडक्ट - बामन शेंडी (रेडीमेड, तुळतुळीत गोट्यासकट. केस कापायची गरज नाही)
5 Jul 2011 - 8:22 pm | स्पा
काय म्हणालात ? पूजा सांगायचा पार्ट टाईम बिजिनेस टाकायचाय
कुडबुड कुडबुड तोंडातल्या तोंडात पुट पुटायला जमलंय
अहो मग वाट कसली पाहताय
घेऊन टाका बामन शेंडी, रेडीमेड , केस कापायची गरज नाही,
पूजा सांगायच्या ५ मीन आधी डोक्यावर लावा, आणि बना दशग्रंथी ब्राह्मण :)
सोबत शनी कवच, आणि असली रुद्राक्ष फ्री :)
पुढच प्रोडक्ट : चीनी तेल , महत्वाच्या क्षणांसाठी
5 Jul 2011 - 8:48 pm | गणेशा
'चीनी तेल'
---
वस्तुस्थीती
क्रिकेट खेळ चालु असतो, बॅट्समॅन बॉल मारतो आणि तो स्टेडीयमच्या बाहेर चीनी तेल ठेवलेल्या पात्रात पडतो.
लेडी प्रेक्षक दोन्ही हातानी तो बॉल स्टेडीअम मध्ये फेकते. बॉलचा आकार वाढल्याने पंच नविन बॉल मागवतात.
बॅकग्राउंड आवाज
सडौल आकारासाठी आजच ऑर्डर करा .. चिनी तेल.
पत्ता : सूर्यबॉल, सडौल गल्ली, तेलंगण.
अवांतर : येथे लेडी प्रेक्षक त्या तेलाबरोबर काय करत असते असा प्रश्न कोणीही मनात आणु नये . ही प्रोडक्ट ची जाहिरात आहे.. स्टेडीयम बाहेरील लेडी प्रेक्षकाची नाहि
------
पुढे : आयरिश कॉफि
5 Jul 2011 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय म्हणता, चिनी तेल वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही? अहो, मग तेल विसरा आणि घ्या आपल्या प्रिय व्यक्तीसमवेत आयरीश कॉफीचा आस्वाद!
काय म्हणता, तुमच्या बेजबाबदार व्यक्तव्यांमुळे बायको नाराज आहे? मग तिच्यासोबत लुटा लुत्फ आयरीश कॉफीचा!
आयरीश कॉफी प्या आणि सर्व चुकांवर पांघरूण घाला.
पुढचे प्रॉडक्टः राजहमाल टोमॅटो
5 Jul 2011 - 9:53 pm | राजेश घासकडवी
सीन:
नवरा- अगं, मला एका भाषणाला जायचंय, थोडे सडके टोमॅटो दे पाहू.
बायको- अगंबाई, सडके टोमॅटो कुठून आणून देऊ? मी तर कोशिंबिरीसाठी चांगले छान टोमॅटो घेतले.
नवरा- मग तेच दे.
बायको- (वस्सकन अंगावर येत) पैशे वर आले का? टोमॅटो काय झाडाला लागतात का? हे टोमॅटो फेकायला वापरलेत तर खबरदार!
नवरा - कपाळाला हात लावून मटकन् खालीच बसतो...
निवेदक - तुमच्याकडे असा प्रसंग निश्चितच घडला असेल. पण आता काळजी करू नका. राजहमाल टोमॅटो वापरा. आम्ही सडक्यातले सडके टोमॅटो निवडून ते स्वस्तात घेतो. पेटण्ट पेंडिंग (#पी.यु.एन.इ.३०) प्रोसेस वापरून ते आणखीन सडवतो. मग घरचे ताजे टोमॅटो न वापरल्याबद्दल बायकोही खुश.
(बायको मिठी मारतानाची चित्रं)
आणि भाषणात एका टोमॅटोत वक्ता गारद झाल्याबद्दल तुम्हीही खुश.
(वक्ता पळतोय. प्रेक्षक पळताहेत... नवरा टोमॅटोचं चुंबन घेतोय... अशी चित्रं)
ताबडतोब विकत घ्या. राजहमाल टोमॅटो.
सडके व्हर्च्युअल टोमॅटो लवकरच वेबवर मिळतील...
नवीन प्रॉडक्ट - मिसळपाव टू मिसळपाव फ्री कॉलिंग
5 Jul 2011 - 10:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सीन - एका बॅचलर्स-रूमवर सकाळी असणारी शांत धावपळ. 'पाचव्या खोली'च्या दरवाजावर बाहेरून धडका मारणारे दोन बॅचलर्स.
आतून त्रस्त आवाज येतो: का रे, तुम्ही तर मित्र म्हणवता आणि या इथेही शांतता लाभू देत नाहीत?
बाहेरचे दोघे: अरे, सकाळ-सकाळी आमचाही विचार करत जा!
आतला आवाजः अरे त्या मिपाच्या कंपूमुळे मला काही सुचेनासं झालंय, जेवण जात नाही, सकाळी नीट होत नाही. काय करू मी तरी?
बाहेरच्यांतला जाड चष्मावाला, गीक चेहेर्याचा मित्रः कंपूच्या छळामुळे आलेल्या त्रस्ततेतून काही सुचत नाहीये? स्वतःच्या मित्रांशी कसं बोलावं हे समजत नाहीये? मग घे मिपा सिम कार्ड. यात मिसळपाव-टू-मिसळपाव फ्री कॉलिंग आहे. कितीही वेळ बोला याचं बिल येणार नाहीत. मित्रा, तू ही तुझ्या मित्रांबरोबर फोनवरच प्रतिसाद ठरव आणि कंपूबाजी सुरू कर. जुन्या कंपूची खोड मोडायला या कार्डासारखी दुसरी प्रभावी स्कीम नाही. हे कार्ड घेच आणि पहा कशी कंपूची जिरते ते!
दुसर्या सकाळी: आता मी पण कंपूबाजी सुरू केली आहे. आता मी ही आनंदी आयुष्य जगतो आहे. आणि तुम्ही?
पुढचे प्रॉडक्ट: सप्तरंगी नाडी
5 Jul 2011 - 10:47 pm | राजेश घासकडवी
सीन - दोन नौटंकीत नाचणाऱ्या बायका एकमेकांशी बोलत आहेत.
पहिली - काय सांगू गं, आजकाल माझा नाच बघायला कोणी येतच नाही.
दुसरी - तुझ्या लेहंग्याची नाडी दिसेल असं नाचतेस ना?
पहिली - हो. पण तरीही लोक मंत्रमुग्ध होत नाहीत. माझ्या खेळाला नावं ठेवतात.
दुसरी - अगं ही नाडी वापर.
(ती झळझळणारी सप्तरंगी नाडी बाहेर काढून दाखवते. चमचमणाऱ्या, फिरत्या, भडक रंगांमुळे पहिलीचे डोळे दिपून जातात)
पहिली - तू धन्य आहेस. आतापासून मी हीच नाडी वापरणार.
दुसरी - (विनोदाने) पण खरोखर कोणी तपासायला आलं तर त्यांना हात लावू द्यायचा नाही बरं का...
पहिली - (खिदळत) मी त्यांना नाडी सापडतच नाही म्हणून सांगेन.
(दोघी हसतात)
(पुढच्या सीनमध्ये पहिली नाचतेय आणि डोळे दिपलेले प्रेक्षक शिट्ट्यांवर शिट्ट्या मारत आहेत)
निवेदक - सप्तरंगी नाडी (डोळे दिपून डोळ्यावर हात धरलेली पहिली पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसते)
पुढचं प्रॉडक्ट - इंच इंच पुढे सरकणारी ऑटोमॅटिक पोस्टकार्डं
9 Jul 2011 - 2:02 pm | विजुभाऊ
अर्र............ गल्ली चुकलात घासकडबी मामा.
त्याना ही ती नाडी नव्हे.... "सप्तरंगी नाडी" आता तमिळसोबत मराठीतही उपलब्ध.
खास दंडकाअरण्यात म्यानुफ्याक्चर केलेली .......... अतीप्राचिन सप्तरंगी नाडी..... पट्टीदार नाडी सप्तरंगी नाडी
9 Jul 2011 - 9:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टीव्हीवरचा कार्यक्रम संपताना जाहिरात, "अर्ध्या किमतीत मिळणार्या महागड्या पण सुंदर, मनमोहक काश्मिरी शालींसाठी या पत्त्यावर पोस्टकार्ड टाका..."
अनाऊन्सरचा आवाजः
या शालींसाठी पोस्टकार्ड लिहून लिहून दमला आहात? काश्मीरी शाली मिळवण्यासाठी खूप दबाव येतो आहे? सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे? शेजार्यांच्या घरातल्या काश्मीरी शाली पाहून तुमची जळजळ वाढते आहे? वापरा आमची इंच इंच पुढे सरकणारी ऑटोमॅटिक पोस्टकार्डं आणि शाली जिंकण्याची शक्यता शंभर टक्क्यांनी वाढवा.
ऐका आमच्या एका समाधानी ग्राहकाच्याच तोंडूनः
आमच्या घरून माझ्यावर काश्मिरी शाल आणण्यासाठी फार दबाव येत होता. माझ्या पगारात मला हे परवडणं शक्यच नव्हतं. मी इंच इंच पुढे सरकणारी ऑटोमॅटिक पोस्टकार्डं आणली. पुढच्याच आठवड्यात मलाही अर्ध्या किमतीत शाल मिळाली. आता मी आणखी पोस्टकार्ड वापरून घरच्या प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र शाल मिळवण्यासाठी हीच पोस्टकार्ड वापरत आहे.
अनाऊन्सरः
आत्ताच फोनवर ऑर्डर करा आणि एका सेटच्या किंमतीत दुसरा सेट फुकट. आंतरजालासाठी विशेष ऑफर, त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा.
-------
पुढचं प्रॉडक्ट - काळी किटली
9 Jul 2011 - 2:32 am | इंटरनेटस्नेही
धागा ठीक वाटला.. खरंतर कल्पना फार चांगली आहे. पण, पराशेठ म्हणतात त्या प्रमाणे मिपावरदेखील हे लोण पसरुन ऑर्कुट कम्युनिटी वर जसे खेळ चालतात तसे खेळ इथेही सुरु होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
9 Jul 2011 - 5:38 pm | तिमा
पराशेठ यांचे म्हणणे पटले असल्यामुळे या खेळात भाग घेणार नाही.
11 Jul 2011 - 11:56 am | आत्मशून्य
म्हणूनच मला झेपणारा नाय..... पण इतरांच्या प्रतीसादाने मनोरंजन होतय...