इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा.
पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा.
सर्वांगात मुरणारा पाउस.
घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख
कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
वार्यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी.
त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान
आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत
पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे.
बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात
लोकांपुढे आले आणि खूप जणांना ते आवडले .
साईट वर टाकल्यावर बर्याच चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आणि हे पेंटिंग
Contemporary Masters' 2009 या कलाविष यातील पुस्तकात जाऊन पोहोचले.

प्रतिक्रिया
1 Jul 2011 - 8:39 pm | जयंत कुलकर्णी
काय बोलू ? रंगाच्या फटकार्यात पाण्यातून दिसताना आकाशाचा, जमिनीचा, घराचा रंग.........मस्तच आहे. वार्याचा, पावसाचा वेग.....कोणी काढले आहे हे चित्र ? एका ब्रिटीश माणसाने असेच एक चित्र काढले होते ते फार पूर्वी पाहीले होते त्याची आठवण करून दिलीत.
धन्यवाद !
1 Jul 2011 - 9:26 pm | मुलूखावेगळी
आवडले
2 Jul 2011 - 12:42 am | कवितानागेश
मस्तय.
2 Jul 2011 - 12:57 am | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!
2 Jul 2011 - 1:38 am | रेवती
छानच आहे पेंटींग!
2 Jul 2011 - 2:04 am | धनंजय
मस्तच आहे
2 Jul 2011 - 8:05 am | ५० फक्त
मस्तच आहे, भावना शब्दात उतरवणंच इतकं अवघड असतं त्या चित्रात उतरवणं तर अजुन अवघड.
2 Jul 2011 - 9:50 am | स्पा
झकास
2 Jul 2011 - 11:50 am | किसन शिंदे
क्लास आहे पेंटिग..
पावसाचा आणी वारयाचा वेग...अप्रतिम.
2 Jul 2011 - 11:58 am | सुधीर मुतालीक
जुलै च्या पहिल्या आठवड्यात ही ठणठ्णीत कोरड्या असणा-या नाशिक मध्ये चिम्ब भिजल्या गत झाले.
2 Jul 2011 - 12:07 pm | RUPALI POYEKAR
केवळ अप्रतिम
2 Jul 2011 - 12:46 pm | अरुण वडुलेकर
श्री. प्रकाश बाळ जोशी,
माझं बालपण इगतपुरीत गेलं. त्यामुळे हे छायाचित्र पहातांना फार मजा आली. त्या काळी (साधारणतः १९४७ ते १९५७) या काळाताल्या त्या रौद्र पावसाचे थैमान मी प्रत्यक्ष पाहिले आहे आणि अनुभवले आहे. पंधरा पंधरा दिवस सूर्यदर्शन होत नसे आणि आंबट ओले कपडे घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रनकोट वापरणे ही श्रीमंती होती आणि छत्रीचा कसाही निभाव लागत नसे. त्या काळी इगतपुरीच्या पंचक्रोशीत ठाकर आदिवासींची वस्ती असायची आणि इरले (पळसाची पाने आणि बांबूचा कामट्याने बनवलेला देशी रेनकोट) अंगावर घेऊन भाताच्या खाचरांत भाताची 'आवणी' (लावणी० करणारे ठाकर मामे आणि माम्या पाहातांना मोठि मौज वाटायची. (ठाकर आदिवसी जमातीत सरसकटपणे पुरुषाला ' मामा ' म्हणतात आणि स्त्रीला ' मामी ')
हे चित्र पहातांना त्या सार्या आठवणी जाग्या झाल्या. काळाचे काटे उलटे फिरले आणि मी पुन्हा इगतपुरीच्या तीनलकडीत गेलो असं झालं. हा पुनः प्रत्यय आपण दिलात. त्या बद्दल धन्यवाद.
2 Jul 2011 - 5:56 pm | मदनबाण
ह्म्म्म... खरं सांगायच झाल तर या पेंटींग मधुन मला काही घंटा समजलं नाहीये...
तसही पेंटींग बद्धल मी अल्प ज्ञानी आहे...त्तवा माझी प्रतिक्रीया आवडली नसल्यास क्षमस्व...
बाकी एक पेंटींग माझ्या खवत डकवल आहे, ते इच्छुकांनी डोकावल्यास त्यांना दिसावे...
असो...
3 Jul 2011 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या......!
-दिलीप बिरुट
3 Jul 2011 - 10:32 am | श्रावण मोडक
चित्र भरगच्च आहे. वाऱ्याचे, सरींचे आवेगच आवेग आहेत त्यात. तो भरगच्चपणा थोडा कमी असता, आवेग थोडा विरळ असता तर कसे दिसले असते या विचारात पडलो आहे.
अवांतर: चित्रातून वादळ प्रतीत होते. इगतपुरीचा पाऊस जोराचा असतो हे खरे, पण तो वादळी असतो का?
3 Jul 2011 - 2:10 pm | कानडाऊ योगेशु
चित्रात काही ठिकाणी सरींच्या पलिकडे असणारा प्रकाश हि दिसतो आहे.(विशेषतः वरील बाजुस डाव्या कोपर्यात).
म्हणजे वादळी पाऊस पण आकाशात सूर्य पण आहे असा प्रकार वाटतोय.
पुढचे पेंटींग मग कदाचित इंद्रधनुष्याचे असावे.
4 Jul 2011 - 7:52 pm | गणेशा
येथे मला पेंटींग दिसले नाही म्हणुन निराशा झाली.
कृपया पिकासावरुन येथे फोटो देता का ?
किंवा
ganesh.jagtap@zenta.com या आयडी वर मेल करता का हे चित्र