एक छोटा पिंगु
नेहमी शाळेत जातो
आई ओरडेल म्हणुन
पटकन डबा खातो
खाताना झाली गंमत
घश्यात अडकला घासं
लवकर खायला लागलं
म्हणुन झाला त्रासं
घरी आल्यावर आई
डबा पाहुन चिडली
नीट खाल्ला नाही
म्हणुन वरात काढली
मग आमी शांगतो
नीट डबा खाल्ला
त्या येडपट चिंगुनी
धक्का देऊन पाडला
माझी चूक नाही
मला नको ओरडू
मग तूच म्हणतेस?
चिडलं माझं करडू
उद्या पासुन शाळेत
देऊ नको डब्बा
मधल्या सुट्टीत खेळेन
लपंडाव-पाणी-धप्पा
डबा खायची कटकट
आमच्या मागुन जावी
त्याच्या ऐवजी फक्त
मधली सुट्टी रहावी
आसा आहे पिंगू
आणी त्याची शाळा
वाजली शेवटची घंटा
चला आता प---ळा....
पराग दिवेकर...
प्रतिक्रिया
1 Jul 2011 - 4:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
भारी आहे हा पिंगू :)
2 Jul 2011 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा
आमच्या पिंगुच्या भाषेत...थेंकू...
3 Jul 2011 - 9:48 pm | पिंगू
हाहा.. कविता वाचून बालपणीचे रम्य दिवस आठवले..
- (शाळकरी) पिंगू