गाभा:
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते.
माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्याची गाडी वापरली गेली.
सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे.
बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्याची गाडी वापरली. कचर्याची गाडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली होती.
विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
प्रतिक्रिया
29 Jun 2011 - 9:05 pm | यकु
You can file a complaint either online or through post to Electronic Media Monitoring Center. To file an online complaint, you have to visit http://emmc.gov.in/ and register as a user. Alternatively, you can download the application format by clicking here and post it on the address provided in the application.
On receiving a consumer complaint, the agency validates the information against the official records. If the complaint is valid, it is forwarded to the Ministry of Information and Broadcasting, which can then take strict action against the party that has violated the law.
News Broadcaster Association (NBA) is another agency which seeks consumer complaints against unlawful reporting. It is an industry consortium for news broadcast channels and aims to promote self-regulation in news reporting. It is a private entity and not a government agency.
29 Jun 2011 - 10:25 pm | नर्मदेतला गोटा
Thanks for info, there has to be control over these people
29 Jun 2011 - 11:18 pm | बिपिन कार्यकर्ते
पूर्ण सहमत आहे.
आधी ती बातमी बघितली तेव्हा चक्रावलो पण नंतर काही अधिकार्यांचे खुलासे ऐकले ते पटण्याजोगे होते. विशेषकरून हिंदी न्यूज चॅनेल्स अतिशय खालच्या दर्जाचे वर्तन नेहमीच करतात. त्यांचा या निमित्ताने निषेध करतो.
29 Jun 2011 - 11:28 pm | नर्मदेतला गोटा
>>त्यांचा या निमित्ताने निषेध करतो.
नूसता निषेध नाही
टी व्ही चे बटन बंद करा
शेवटी तूच आहेस बाबा तूझ्या जीवनाचा शिल्पकार
29 Jun 2011 - 11:32 pm | मी-सौरभ
ही सगळी भिकारडी न्युज चॅनेल्स बंद करुन फक्त दूरदर्शन आणि बी बी सी ही दोनच ठेवली पाहिजेत :)
त्यापेक्षा दोन - तीन फॅशन ची चॅनेल्स काढा की ;)
30 Jun 2011 - 6:51 pm | रामदास
(साधासुधा) सहमत.
1 Jul 2011 - 12:35 am | पिवळा डांबिस
त्यापेक्षा दोन - तीन फॅशन ची चॅनेल्स काढा की...
(डांबिस) सहमत
1 Jul 2011 - 1:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुरूषांना त्यात फारश्या नोकर्या मिळणार नाहीत. मग युयुत्सुंना राग येईल बरं. (युयुत्सु, ह घ्या हो!)
2 Jul 2011 - 10:00 am | प्यारे१
बीबीसी दूरदर्शन मध्ये पुरुषांना का बरे नोकर्या मिळणार नाहीत? :P
बाकी आपण फॅशन टीव्ही'देखील' बघतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न ....
30 Jun 2011 - 12:21 am | विकास
विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
सहमत.
पण, भडकपणा फक्त बातम्यातूनच दिसतो अशातला भाग नाही. लेख, चर्चा, इतरांच्या श्रद्धांचा अनादर, वैचारीक मतभेदासंदर्भात पण दिसतो.
नितिनरावांचा लेख आहे म्हणून पुढचे लिहीलेले नाही असे आधीच स्पष्ट करतो:
दिग्विजय सिंग अथवा अगदी चिदंबरम सारख्यांची वक्तव्ये ही सरकारी भडकपणाचे नमुनेच आहेत... असे अनेक सांगता येईल. तुर्तास मुद्दा मांडण्यापुरते खूप झाले असे वाटते.
असो.
30 Jun 2011 - 7:59 am | नितिन थत्ते
सहमत आहे.... मी व्यक्तिशः नेहमीच या गोष्टींचा विरोध केलेला आहे.
चालायचंच.
कधीकधी अशा बिनबुडाच्या गोष्टी "झाकलेली सत्ये" म्हणून पुन्हापुन्हा सांगितली जातात. उदा. विशिष्ट व्यक्तींचे मूळ आडनाव अमूकतमूक होते. ते राजकीय फायद्यासाठी बदलून घेण्यात आले वगैरे.
हुसेन यांनी जो "फक्त टॅक्सवाल्यांचा त्रास" सांगितला तस्साच त्रास तेहलकाने स्टिंग (बंगारू लक्ष्मण-जया जेटली-जॉर्ज फर्नांडिस वगैरे) ऑपरेशन केले तेव्हा त्यांना झाला होता. तेव्हा तो "फक्त टॅक्सवाल्यांचाच त्रास" नसू शकतो असे मानायला जागा आहे. उरलेल्यांनी त्रास दिला हे तर उघड सत्य आहे.
30 Jun 2011 - 9:13 am | चिरोटा
टॅकसवाल्यांनी टॅक्स भरायला सांगितला म्हणून त्रास की टेबलाखालून जास्त मागितले म्हणून त्रास हे कळायला मार्ग नाही. यॉडेलिंगसाठी प्रसिद्ध असणार्या एक दिवंगत हिंदी गायकालाही टॅ़क्सवाल्यांबद्दल मनस्वी चीड होती. ते उघडपणे तसे बोलूनही दाखवत.
30 Jun 2011 - 6:54 pm | विकास
उदा. विशिष्ट व्यक्तींचे मूळ आडनाव अमूकतमूक होते. ते राजकीय फायद्यासाठी बदलून घेण्यात आले वगैरे.
फरक आहे: एखाद्याला आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खुनी ठरवणे आणि एखाद्या व्यक्तीस जर कोणी राजकीय फायद्यासाठी नाव बदलले असे म्हणणे या दोन्ही आरोपांत फरक आहे. त्यात काय भडक आहे हे सरळ सरळ आहे. तरी देखील कुठल्यातरी नाटकातील वाक्ये पुन्हा पुन्हा जणू काही ऐतिहासिक सत्य आहेत अशा पद्धतीने पसरवायचा प्रयत्न होतो....
हुसेन यांनी जो "फक्त टॅक्सवाल्यांचा त्रास" सांगितला तस्साच त्रास तेहलकाने स्टिंग (बंगारू लक्ष्मण-जया जेटली-जॉर्ज फर्नांडिस वगैरे) ऑपरेशन केले तेव्हा त्यांना झाला होता.
यात देखील फरक आहे: हुसैन यांच्याकडून कदाचीत करभरतीत चूक झाली असेलही पण त्यांचे एकंदरीत व्यक्तीमत्व पहाता त्यात करचुकवेगिरी नसण्याची शक्यता आहे. तसेच जरी ती असली, तरी सरकारी अधिकारी म्हणून कसे वागावे यावर बंधन आहे. थोडे अवांतर - व्हिपि सिंग अर्थमंत्री असताना तत्कालीन ७५-८० वर्षे वयाच्या शंतनुराव किर्लोस्करांना टॅक्स ऑफिसर्सनी ओव्हरनाईट चौकशीकरता अडकवून ठेवले होते. शंतनुराव (चांगल्या अर्थाने) खमके निघाले. त्यांनी सगळी कागदपत्रे दाखवली आणि परीणामी काहीच करू शकले नाहीत. पण तसा त्रास होऊ शकतो.
स्टींग ऑपरेशन त्याची विश्वासार्हता आणि त्यातील बायास्ड निकष (म्हणजे फक्त एनडीएच्या नेत्यांचे तसे स्टींग ऑपरेशन करणे आणि आपोआप काँग्रेस वगैरे जणू स्वच्छ आहेत असा गैरसमज अप्रत्यक्षपणे पसरवणे) यावर वाद होऊ शकतात. पण तो माध्यमांचा हक्क देखील आहे. त्यातही बंगारू रंगे हात पकडले गेले. जॉर्ज फर्नांडीस यांनी स्वतः काही केल्याचे कधीच सिद्ध झाले नाही. त्यांच्या बाहेरील व्यक्तीने घेतले होते. म्हणून अप्रत्यक्षपणे त्यांनी केले असे म्हणले गेले. मग तसे तर २जी च्या संदर्भात ३ "जी" ना (मनमोहनजी, सोनीयाजी, राहूलजी) भ्रष्ट म्हणता येईल. मनमोहनजींना तर नक्कीच...
तेव्हा तो "फक्त टॅक्सवाल्यांचाच त्रास" नसू शकतो असे मानायला जागा आहे. उरलेल्यांनी त्रास दिला हे तर उघड सत्य आहे.
मी त्यांना दिल्या गेलेल्या त्रासाच्या विरोधात आहे, तसेच त्यांना आणि इतरांना समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण्याच्या समर्थनात आहे. हे आधी देखील सांगितले आहे. मुद्दा तो नाहीच. स्वतः हुसैन मुलाखतीत काय म्हणाले आणि ते त्याच मुलाखतीच्या सुरवातीस कसे ट्विस्ट करून सांगितले गेले हा आहे. आणि त्यात सामाजिक विष पसरवण्याचा भडकपणा आहे असे मला म्हणायचे आहे.
3 Jul 2011 - 11:50 pm | सुधीर काळे
मनमोहनजींना तर नक्कीच...
बरोब्बर! बाकीचे "२जी" करून-सवरून नामानिराळे रहातात कारण ते 'रिमोट कंट्रोलद्वारा "करतात-सवरतात".
30 Jun 2011 - 1:02 am | कार्लोस
विक्रुतिआअहे हि
30 Jun 2011 - 4:27 am | शिल्पा ब
<<<विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
म्हंजे काय हो!! तुम्हीपण ना!! टीआरपी कसा वाढायचा मग? तो महत्वाचा का बाकीच्या बारीकसारीक गोष्टी? आणि असं पण "बडे बडे देशोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है" असं खुद्द आबाच म्हणुन गेलेत हे विसलात का?
30 Jun 2011 - 1:22 pm | कुंदन
आबा गेले ? कधी?
30 Jun 2011 - 1:28 pm | शिल्पा ब
अर्र्र्र्र्र!!! तुम्ही पेपरात वाचलं नाही का? आँ!!
30 Jun 2011 - 8:36 am | जयंत कुलकर्णी
पुढच्यावेळी, शववाहीका मिळेतो पर्यंत थांबण्यात आले तर कोण जबाबदार ? हा सगळा मिडीयाचा मूर्खपणा आहे असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.
30 Jun 2011 - 8:59 am | फारएन्ड
आजच्या मटामधेही ही बातमी आली आहे. टायटल साधारण वरती लिहील्याप्रमाणेच. आतली बातमी वाचली तर हे खुलासेही आहेत. बातमी देताना आपले मत त्यात द्यायचे हा प्रकार सगळीकडेच दिसतो आजकाल.
कचर्याची गाडी यासाठी वापरणे बरोबर वाटत नाही, पण कदाचितः
१. दुसरी योग्य गाडी उपलब्ध नसावी आणि
२. खाजगी गाड्यांपेक्षा स्थानिक सरकारकडे उपलब्ध असलेली गाडी वापरणे प्रोसीजर च्या दृष्टीने सोयीचे वाटले असावे.
त्यात बातमीत पुढे सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार वगैरे केले का ते सांगितलेले नाही (पण एक फोटो आहे तसे वाटणारा).
30 Jun 2011 - 1:00 pm | मृत्युन्जय
कचर्याची गाडी स्वच्छ केल्यावर कितपत स्वच्छ होते हे कोणाला माहिती आहे का? त्याच कचरागाडीतुन राष्ट्रपतींचे (आता पती नाहीत म्हणा. मी केवळ उदाहरण दिले) शव आणले गेले असते तर मिपाच्या जनसामान्यांतुन हीच प्रतिक्रिया उमटली असती काय?
स्थानिक अधिकार्यांनी अॅम्ब्युलन्सचा वापर जखमींसाठी केला हे स्तुत्य आहे. पण शवांसाठी कचरागाडी हा तरीही अयोग्य निर्णय होता असे म्हणावे लागेल. स्थानिक अधिकार्यांच्या हातात याहुन जास्त कदाचित काही नसेल आणि त्यांच्यावर होणारी टीका अनाठायी असेलही. पण अश्या अपवादात्मक परिस्थितींमध्ये उच्चपदस्था़ंकडे ही बाब एस्कॅलेट करण्यासाठी आणि योग्य ती व्यवस्था करण्याची यंत्रणा असायला हवी असे वाटते. त्या परिस्थितीत योग्य त्या अधिकार्यांच्या निदर्शनास ती बाब आणली गेली असती आणि त्यांनी गंभीरपणे आणि प्रसंगाचे महत्व ओळखुन योग्य त्या सुविधा पुरवल्या असत्या (जे अशक्य नव्हते) तर मला वाटते हा वाद उद्भवलाच नसता.
मिडीया मुर्ख आहे यात वाद नाही. घटना गरजेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जास्त टीकेची धनी झालेली आहे हे मान्य. पण मुळात हा प्रकार टाळता यायला हवा होता. टाळता आला असताच असे म्हणत नाही. पण जर तो सद्यपरिस्थितीत तसा टाळता येत नसेल (म्हणजे योग्य त्या लोकांना योग्य ते अधिकार नसतील किंवा त्यांना त्या अधिकारांची जाण नसेल किंवा त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि महत्व कळत नसेल) तर सरकारी यंत्रणेत योग्य ते बदल केले जाउन, अपवादात्मक परिस्थितीत योग्यप्रकारे सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचे अधिकार आणि साधनसंपत्ती यंत्रणेकडे उपलब्ध करुन दिली पाहिजे असे मला वाटते.
30 Jun 2011 - 1:17 pm | चिरोटा
ते अधिकार असले पाहिजेत. फक्त संबंधित अधिकर्यांनी त्या अधिकारांचा वापर केला नसावा.(पोलिसच मेले आहेत. त्यात काय एवढे असा विचार करुन).
जवानांऐवजी कोणी मोठे अधिकारी,राजकरणी असते तर कचर्याच्या गाडीतून नेले नसते एवढे नक्की.भारतात लोकशाही असली तरी सरकारी यंत्रणेत Feudal Mentality अजूनही आहे.
1 Jul 2011 - 11:52 am | पांथस्थ
सत्यवचन.
आणि ह्या वागण्यामागे हेतुपुरस्सरता नसुन मानसिकता आहे असे मला वाटते.
30 Jun 2011 - 1:40 pm | भडकमकर मास्तर
धागाकर्त्याच्या मताशी सहमत... हल्ली बातम्या पाहून भावना भडकावून न घेणे योग्य...
अवांतर : आता एक भाषेचा अभ्यास म्हणून समजा ,.... जर शव न्यायला उत्तम गाडीची वाट पाहत देह तसेच ठेवले गेले असते तर शहीदांचा अपमान, नातेवाईकांना ताटकळत कसे ठेवले, सरकारी अनास्था यावर बातमी लिहून पाहता येइल
30 Jun 2011 - 1:43 pm | रणजित चितळे
कच-याची गाडी कच-याची गाडी असते. ती धुतली तरी कच-याचीच राहते. काल पर्यंत कचरा नेला. आज धुतली व हुतात्म्याचे शव नेले व उद्या पासून परत कचरा नेऊ वाः हे काही पटत नाही मनाला. जर गाडी नसेल तर बाहेरून हायर का नाही केली गेली. प्रत्येक संस्थेकडे अशी कामे करण्यासाठी पैशांची तरतूद असते, ती का वापरली गेली नाही. जर त्याच भागातला एखादा मिनीस्टर किंवा मॅजीस्ट्रेट किंवा एखादा सिनेमातला नट अपघात होऊन मृत्युमूखी झाला असता व त्यांना अश्या कच-याच्या धूतलेल्या गाडीतून घेऊन गेले असते तर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया असत्या का हा प्रश्न पडतो . थोडी जास्त तसदी घेतली असती किंवा जास्त घडलेल्या घटनेत इनव्हॉलव्हमेंट असती तर मला नाही वाटत कच-याच्या गाडी व्यतिरीक्त त्यांना कोणतीही गाडी मिळाली नसती असे.
माणसाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत हेच खरे.
30 Jun 2011 - 1:57 pm | मराठी_माणूस
माणसाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत हेच खरे.
सहमत . सर्वसामान्यांच्या बाबतीत तर त्या अती बोथट होत चालल्या आहेत.
30 Jun 2011 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
अहो ज्यांना जिवंतपणी काडीची देखील किंमत मिळत नाही त्यांना मेल्यावर मिळेल असे वाटलेच कसे तुम्हाला ?
30 Jun 2011 - 2:03 pm | रणजित चितळे
सैन्या मध्ये अशा गोष्टींचा फार प्रभाव पडतो. एक सैनीक बघत असतो आपल्या साथीदाराचे काय होते मेल्यावर. सैन्यात अशा गोष्टी साठी पैशाची तरतूद केलेली असते व सैन्य प्रशासन पण पुर्ण मदत करते. हुतात्म्याला त्याचा मान मिळालाच पाहीजे. म्हणूनच अशा गोष्टीचे वाईट वाटले.
30 Jun 2011 - 2:14 pm | एक तारा
हि माझी पहिली प्रतीक्रिया आहे. चुकिचे वाटल्यास क्षमस्व.
ती गाडी कचर्याची होती हे मीडीयाला सांगायची काय गरज होती. ज्याने कोणी हे सांगीतले त्याचा हेतु काय होता?
30 Jun 2011 - 2:27 pm | रणजित चितळे
ती गाडी कच-याची आहे ही शंका बघितल्यावर आली असणार (धुतली की झाले म्हणा-यांसाठी). मग मिडीयाने विचारणा केली असेल. अशा गोष्टी लपू शकत नाहीत.
30 Jun 2011 - 3:15 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे योग्य वाटत असेल त्यांनी हा विचार करावा की त्यांचा कोणी आप्तेष्ट निवर्तला आणि त्या वेळेला शववाहीनी उपलब्ध नसेल तर त्या वेळेला हे लोक स्वतः खाजगी (मित्राची किंवा स्वतःची, नात्यामधल्या एखाद्याची मोठी गाडी) वाहन मिळवतील? जर त्यांना त्यासाठी कचर्याची धुतलेली गाडी चालणार असेल तर ठीक आहे.
30 Jun 2011 - 3:27 pm | एक तारा
पहिले केला. पण उत्तर आले कि जर माझा नाते॑वाईक एखाद्या दुर्गम भागात असेल आणि जर त्याला आणायला दुसरी कोणतीच गाडी उपलब्ध नसेल तर मला ही गाडी चालेल.
सन्दर्भ हा कि ही घटना एका दुर्गम भागात घडली आहे.
30 Jun 2011 - 3:32 pm | llपुण्याचे पेशवेll
दुर्गम भागात कचर्याच्या गाड्या इतक्या सहज उपलब्ध (आणि ते सुधा धुवून)होत्या का? आणि हो असेल तर मग दुर्गम भागात एकही अन्य मालवाहू खाजगी गाडी नव्हती का?
30 Jun 2011 - 3:41 pm | एक तारा
Point to be noted...
चुकलेच, माझे आणि त्यांचे सुद्धा.
1 Jul 2011 - 7:53 am | ५० फक्त
तुम्ही एक तारा का एक आगाउ का एक आगाउ तारा हे निश्चित ठरवा बरं आधी.
1 Jul 2011 - 11:21 am | मी ऋचा
ह्याचं आपलं भलतच काहीतरी!
1 Jul 2011 - 11:48 am | एक तारा
जास्त चांगलं वाटतयं :)
30 Jun 2011 - 3:12 pm | सुनील
म्हटले तर हे अवांतर आहे पण गोष्ट प्रसार माध्यमांची सुरू आहे म्हणून येथेच देतो.
मटातील ही बातमी वाचा.
बातमी तशी नेहेमीचीच पण मराठी वृत्तपत्रात आढळणारे खास शब्द आणि वाक्यप्रयोग जसे की, "धनदांडगे" आणि "गाड्या उडवणे" ह्यांना फाटा देऊन चक्क "श्रीमंत" आणि "गाडी चालवणे/वाहन हाकणे" असे अत्यंत सामान्य शब्द वापरले आहेत!
30 Jun 2011 - 5:35 pm | श्रीरंग
मला तर मटा च्या बातमीतील "फुल-टू" , "रॅश ड्रायव्हिंग", "रेस्टॉरन्ट", हे शब्द प्रचंड खटकले.
असो.
30 Jun 2011 - 3:23 pm | गणपा
खेदजनक.. हल्लीच्या बाजारु मिडियापासुन कसलीच अपेक्षा नाही. नित्य काही ना काही सनसनाटी देण्याचा नादात हे लोक कधी कमरेच सोडुन डोक्याला गुंडाळतील भरवसा नाही.
बिकाशी सहमत.
30 Jun 2011 - 3:35 pm | Nile
बातमी मी वाचली/पाहिलेली नाही पण ही बातमी काळजी वाटावी अशी भडकावू नक्कीच नाही.
वीरगतीला गेलेल्या जवानांचे अत्यंसंस्कार विशेष इतमामाने होत असतात आणि ते योग्यच आहे. कचर्याच्या गाडीतून जर देह नेले असतील तर ती घोडचूक आहे, जबाबदार व्यक्तींना इथे धारेवर धरण्यात काहीही चूक नाही.
बातमीतील शब्द योग्य वापरून धार तशीच ठेवता येते हे मात्र मला मान्य आहे. पण शहिदांचा अपमान झाला नाही असे पटवून देणे या उदाहरणात फार अवघड वाटते.
30 Jun 2011 - 5:06 pm | वेताळ
अंगावर घाण उडवुन घेण्याचा प्रकार आहे.
तरी देखिल ,शववाहिका उपलब्द नसती तर मृतदेह बैलगाडीतुन देखिल नेता आले असते. कचर्याची गाडी वापरणे हे एकदम अयोग्य आहे. सदर अधिकारी भात मिळाला नाही तर शेण खातील का?
30 Jun 2011 - 5:41 pm | गवि
+१ अगदी अगदी..
मृतदेह कचर्याच्या गाडीतून नेणे हे अत्यंत गलिच्छ वर्तन आहे.
मृत देहच ते. वाट पाहू शकत होते थोडी. काही इमर्जन्सी तर नव्हती. अगदी शहरगावापासून एखादी गाडी तिथे पोचेपर्यंत धीर धरणं अशक्य होतं असं पटत नाही.
30 Jun 2011 - 6:01 pm | नगरीनिरंजन
प्रसारमाध्यमे अधिक चवचाल की सरकारी यंत्रणा अधिक मुर्दाड असा इथे प्रश्न आहे. दोन्हीत कमीजास्त ठरवणे अवघड आहे. शहीदांची प्रेते न्यायला कचरागाडी धुऊन चालत असेल तर इतरही बर्याच गोष्टी चालल्या पाहिजेत. अनेक उदाहरणे सुचताहेत पण असो.
बाकी बर्याच दिवसात पेपरात 'अक्षम्य' हा अत्यंत विनोदी शब्द वाचला नाही.
सरकारची अक्षम्य हलगर्जी
मंत्र्यांचा अक्षम्य भ्रष्टाचार
पोलिसांची अक्षम्य मग्रूरी
वगैरे वाक्यं वाचून छान करमणूक होते.
30 Jun 2011 - 6:40 pm | गंगाधर मुटे
जाऊ द्याहो नितीनजी, काही फारसं मनाला लावून घेऊ नका.
तसं म्हणाल तर यापेक्षाही गलिच्छ वर्तणूक अधिकार्यांनी केली असती किंवा यापेक्षाही भडकाऊ निवेदन प्रसारमाध्यमाने केले असते तरी कोणीही भडकले नसते.
शहिद झालेले जवान ना एका जातीचे होते, ना एका धर्माचे होते, ना एखाद्या पक्षाचे होते.
त्यांच्या विषयी भडकून क्षोभ व्यक्त करण्यासाठी कोण कशाला रस्त्यावर उतरेल?
या धावपळीच्या भाऊगर्दीत कोणाला फुरसत आहे बरे?
30 Jun 2011 - 7:14 pm | तिमा
कचर्याची गाडी स्वच्छ होते असे वाटते त्यांनी त्याच्यातून खाण्याचे पदार्थ नेऊन दाखवावेत.
30 Jun 2011 - 10:44 pm | इंटरनेटस्नेही
अश्या प्रकारची चॅनल्स आम्ही टीव्ह वर ब्लॉक करुन ठेवतो. जेणेकरुन आपण टीव्ही विकत का घेतला असा प्रश्न पडुन नये!
30 Jun 2011 - 11:22 pm | रेवती
दूरदर्शनच चांगलं होतं.
लोकांनाही ना अतोनात माहिती देवूच नये.
काहीतरी वाद घालत बसतात.
1 Jul 2011 - 12:32 am | विकास
दूरदर्शनच चांगलं होतं.
हल्ली दूरदर्शन पेक्षा (इतर वाहीन्यांमार्फत) दुर्दर्शन जास्त असते. :-)
4 Jul 2011 - 12:03 am | सुधीर काळे
हल्ली भारतीय मीडियासुद्धा पाश्चात्य मीडियाचे अनुकरण करत आहे म्हणून असे होते असे वाटते. २४ तास बातम्या देणार्या वाहिन्या बंद करायला हव्यात. २४ तास कानी-कपाळी त्या सांगणार तरी काय?
1 Jul 2011 - 1:10 am | भडकमकर मास्तर
लोकांनाही ना अतोनात माहिती देवूच नये.
काहीतरी वाद घालत बसतात.
अहा.स्स्सार्या चर्चेचे सार आवडले...
1 Jul 2011 - 3:13 pm | अजातशत्रु
असे काही झाले तर या पुढे आदर्श अन लवासा सारखी प्रकरणे अन् त्यांच्या मागे असणारे खरे हात समोर येणार नाहीत.
सगळेच संक्षिप्त स्वरुपात असेल,दूरदर्शन सारखेच,
जाता जाता: जवानांना नेहमीच व्हेपन मशीन समजून त्यांच्या बरोबर हवे तसे व्यवहार करणारे अधीकारी,नेते लोक
आप्त स्वकियांवर असा प्रसंग ओढवला तर असे करतील काय?
काहींनी तर शहीदांच्या शवपेटितही भ्रष्टाचार केला आहे ही विटंबना नव्हे काय?
याला म्हणतात मृताच्या टाळूवरचे लोणी खाने
2 Jul 2011 - 1:50 am | रेवती
भ्रष्टाचार करावा असे मी कुठेही म्हटले नाहीये.
कचर्याच्या गाडीतून मृतदेह न्यावेत हेही पसंत पडले नाहिये.
तिथे नक्की अजून कोणती व्यवस्था होवू शकत होती/नव्हती याची सगळी कल्पना आपल्याला घरात बसून येवू शकत नाही. नाईलाजाने तशी व्यवस्था करावी लागली असेल असे गृहीत धरले आहे. त्यावर लोकांची टीका त्या निर्णयकर्त्याला सहन करावी लागतेच. अश्या वेळेस लोकांना फार गोष्टी नाही कळल्या तर बरं असं वाटलं.
2 Jul 2011 - 2:04 pm | अजातशत्रु
पण जर घटनेची(बातमी) माहिती इत्यंभूत नसेल तर, त्यातून नको तेवढे गैरसमज पसरणार ना.
अर्धवट अपुर्या माहितिने नुकसानच जास्त होते.
म्हणून लोकांना अतोनात गोष्टिची माहिती दिली तर योग्य असावे,
अवांतरः सत्य हे लोकांसमोर यावे इतकाच आमचा नेहमि हट्ट असतो,
घटना/बातमितील दुसरी बाजू समोर यायलाच हवी,
1 Jul 2011 - 12:16 am | अप्पा जोगळेकर
मॄतदेहाला दोन हार घातले तर उद्या पाच हार का घातले नाहीत बरं ? शहीदांचा अपमान झाला असे म्हणून देखील गळे काढले जातील.
जाता जाता -
एक पाद्री युरोपातील एका शहरात गेला जे वेश्याव्यवसायासाटी प्रसिद्ध होते. त्याने पत्रकारांना विचारले ,"हाऊ मेनी ब्रॉथेल्स आर देअर इन अ सिटी ?" दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात मथळा होता,"फादर आस्क्ड फॉर अ ब्रॉथेल". या घटनेची आठवण झाली.
3 Jul 2011 - 4:35 pm | चिगो
हाच किस्सा मी असा ऐकलाय...
एक पाद्री एका शहरात गेल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं, " आर यु प्लानिंग टू विसीट द रेड लाईट एरीया हिअर?" पाद्रीने विचारले, " आर देअर ब्रॉथेल्स हीअर?" दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात मथळा होता,"फादर आस्क्ड फॉर अ ब्रॉथेल"... चालायचंच..
1 Jul 2011 - 2:00 am | नर्मदेतला गोटा
एक रजत कपूर, प्रणय राय, मराठीत विजय कुवळेकर, अरुण टिकेकर
मेडीयामधे बाकी सगळा गाळच असायचा
एवढे चॅनेल २४/७ चालतात
सगळ्यांना कुठले हे आघाडीचे लोक मिळणार ?
मग ३५ % पास वाले घ्यावे लागतात
काही महाभागांना तर विषय काय आहे हेही कळत नाही
एखादी चर्चा चालू असते, टी व्ही वरचा एखादा सूत्रसंचालक मधेच एक वाक्य टाकतो
"हो पण मग त्यातून आम आदमीचा काय फायदा"
दादोजी कोंडदेव प्रकरणाच्यावेळी टी व्ही वाले काय पण बडबडत होते
असतात अशे
नर्मदेतले गोटे काय करणार ?
1 Jul 2011 - 8:10 am | राजेश घासकडवी
भारतीय समाजमनातून विटाळाची संकल्पना काही जात नाही हेच खरं. अस्पृश्यता इतका काळ का टिकली हे काही प्रतिक्रिया वाचून लक्षात येतं. सोनखतात पिकलेलं धान्य चालतं, पण मैला वाहून नेणाऱ्या मनुष्याने कितीही आंघोळ केली तरी त्याची सावलीदेखील पडू द्यायची नाही हा दुटप्पीपणाही आहेच.
म्हटलं आपणही थोडी भडक विधानं करून बघू....
1 Jul 2011 - 1:19 pm | बिपिन कार्यकर्ते
शेवटी तुम्हीही विटाळलातच ना? पुढच्या वेळी तुम्हाला भेटायचं की नाही ते ठरवायाला हवं आता. कमीत कमी घरी तरी नाहीच बोलावणार तुम्हाला.
1 Jul 2011 - 6:53 pm | राजेश घासकडवी
संपादकांकडून असे धमकीवजा प्रतिसाद आले की भीती वाटते. माझा मिसळपाववरचा आयडी शहीद होईल याची. आयडी मेल्यावर त्याला मिपाबाहेर काढताना कचऱ्याची गाडी तरी मिळेल की नाही या शंकेने काळीज थरकतं.
तरी संपादकसाहेब, एक ध्यानात घ्या मला खरोखरच भडकाऊपणा करायचा असता तर मी प्रतिसादकांची जात काढून आत्मपरीक्षण करा वगैरे नसतं का लिहिलं?
5 Jul 2011 - 6:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>एक ध्यानात घ्या मला खरोखरच भडकाऊपणा करायचा असता तर मी प्रतिसादकांची जात काढून आत्मपरीक्षण करा वगैरे नसतं का लिहिलं?
जमणारच नाही तुम्हाला. त्यासाठी मूर्खपणाची जी पातळी लागते ती तुम्हाला या जन्मात गाठणे शक्य होणार नाही.
5 Jul 2011 - 6:48 pm | श्रावण मोडक
पातळी नाही, खोली... खोली म्हणा त्याला. ;)
1 Jul 2011 - 5:09 pm | नर्मदेतला गोटा
मिडीया मुर्ख आहे यात वाद नाही. घटना गरजेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जास्त टीकेची धनी झालेली आहे हे मान्य. पण मुळात हा प्रकार टाळता यायला हवा होता. टाळता आला असताच असे म्हणत नाही.
---
काय गोलमाल लिवताय
1 Jul 2011 - 6:10 pm | विसुनाना
कायच्या काय छापतात. आता हेच पहा ना - टाईम्स ऑफ इंडियाला पण असली पीतपत्रकारिता करण्याचा मोह आवरत नाही. -
गव्हर्नरबरोबर फोटो काढायचा म्हणजे काय खाऊ वाटला काय? लागली थोडावेळ वाट पहायला तर काय झालं? बाई अडाणीच दिसते. असं भिकार्यासारखं दारात कशाला उभं रहायचं? निदान खुर्चीवर तरी बसायचं की नाही?
(फेसबुकावर हल्ली काहीही येतं.) :)
3 Jul 2011 - 9:32 pm | यकु
>>>>गव्हर्नरबरोबर फोटो काढायचा म्हणजे काय खाऊ वाटला काय? लागली थोडावेळ वाट पहायला तर काय झालं? बाई अडाणीच दिसते. असं भिकार्यासारखं दारात कशाला उभं रहायचं? निदान खुर्चीवर तरी बसायचं की नाही?
ही वाक्ये तुम्ही उपरोधिकपणे लिहीली असावीत..
4 Jul 2011 - 11:30 am | विसुनाना
- ती वाक्ये आपल्याला उपरोधिक वाटली यातच सारे आले. ;)
3 Jul 2011 - 5:22 pm | नंदू
हे (वक्तव्य) पण त्यातलेच!