मिलिंद फणसें पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.पाहिले मी काल, आवडलीस तूकाय नखरा, काय रुपडे, 'पीस' तूअर्थ भलते लावले शब्दांतलेचंडिका होउन मग थरथरलीस तूलोक जमले ऐकुनी आरोह तोयेव्हढे जोरात ओरडलीस तू!!विस्कटूनी लावली माझी कुडीह्या 'घडी'साठीच ना टपलीस तू?काल लाथांनी मला कुटला वरीगूढ वर तू का पुन्हा हसलीस तू?शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?ठेवला आहेस मज ओलीस तू!मी असे लाचार नवरा शेवटीशेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
प्रतिक्रिया
20 May 2008 - 8:05 pm | प्राजु
लय भारी..
अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
सह्ह्ह्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 May 2008 - 8:08 pm | आंबोळी
मानले बॉ तुला....
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे......
लाख दंडवत रे तुला.
20 May 2008 - 8:45 pm | चतुरंग
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
एकदम दे दणादण! ;)
चतुरंग
21 May 2008 - 5:49 am | मदनबाण
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
जबरदस्त.....
मदनबाण.....
21 May 2008 - 7:15 am | वरदा
एकदम ग्रेट.......
21 May 2008 - 9:29 am | विसोबा खेचर
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
वा वा! सुंदर रे केशवा....
आपला,
(मिपाकर) तात्या.
21 May 2008 - 10:17 am | बेसनलाडू
पाहिले मी काल, आवडलीस तू
काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू
अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
हाहाहा
(वाचक)बेसनलाडू
21 May 2008 - 10:30 am | ऋचा
एकदम ढींचॅक......
23 May 2008 - 10:09 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) केशवसुमार
27 May 2008 - 12:45 pm | अजिंक्य
लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!
क्या बात है!!
मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...
मार डाला!!!
मस्त!