जगरीती

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
17 Jun 2011 - 1:57 pm

हळुच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळुच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...

विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधु पिशी..

मनास ओढ लावते, एक खिन्नशी भिती,
झरत झरत जातसे, अस्फुट्शी कालगती,
फिरुन परत येतसे, भ्रमीत मुग्ध नेणीवशी..

आहेस जरी मजसवे, तिच तुच, तव प्रीती
नाहीच का राहीलो, मीही तोच, जगरीती?
धुसर का होतसे, हे सत्य स्वप्न शुक्राशी..

कविता

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

17 Jun 2011 - 2:06 pm | दत्ता काळे

पहिल्या दोन ओळी ( धृपद ) आणि पहिलेच कडवे एकदम छान जमले आहे. म्हणजे फारच सुंदर. नंतरच्या दोन कडव्यातल्या शेवटच्या ओळी, कविता पटकन संपवावी ह्या ईर्षेने, तर टाकल्या नाहीत ना ? अशी शंका येतेय.

शैलेन्द्र's picture

17 Jun 2011 - 2:33 pm | शैलेन्द्र

मान्य, थोडासा प्रयत्न केलाय..

गणेशा's picture

17 Jun 2011 - 2:15 pm | गणेशा

हळुच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळुच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...

अप्रतिम ...

लिहित रहा.. वाचत आहे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Jun 2011 - 2:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त!!
शेवटच्या कडव्यात मीटर गडबडले आहे काय?

शैलेन्द्र's picture

17 Jun 2011 - 8:20 pm | शैलेन्द्र

.

शैलेन्द्र's picture

17 Jun 2011 - 8:22 pm | शैलेन्द्र

थोडासा प्रयत्न केलाय सुधरायचा

राजेश घासकडवी's picture

17 Jun 2011 - 9:05 pm | राजेश घासकडवी

जगरीतीशी नातं सांगणारी कविता आवडली. वेगळा विषय भावला. कालचा मी संपलो आणि तरी स्मृती आहेत - हे सांगण्यासाठी नव्या दिवसाच्या नव्या पहाटेची पार्श्वभूमीदेखील अनुरूपच.

विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,

मध्ये अनुप्रास छान साधला आहे. पुढच्या कडव्यांत झरत झरत आणि फिरुनि परत ने तो अधोरेखित होतो. शेवटच्या कडव्यात अजून तांत्रिक सुधारणा करता येतील...

अजून लिहा.

शैलेन्द्र's picture

18 Jun 2011 - 6:34 pm | शैलेन्द्र

बरोबर, पुढच्या वेळी सुधरायचा प्रयत्न करतो, तुमची प्रतिक्रिया नेहमीच समाधान देते.. धन्यवाद..

नगरीनिरंजन's picture

18 Jun 2011 - 6:46 am | नगरीनिरंजन

आवडली!

शैलेन्द्र's picture

20 Jun 2011 - 11:32 am | शैलेन्द्र

दखल घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार...