तू तिथे डोंगरांच्या कुशीत ढगांच्या गोधडीत स्वतःला लपेटून पहुडलेला
आणि मी इथे कासावीस , उघड्या मोकाट वा-याने गुदमरलेला.
तू तिथे झाडा फुलांच्या कानाशी अलगद हुळहुळत त्यांना खेळवणारा
आणि मी इथे वैशाखाच्या उष्ण झळांशी भर दुपारी झटपटणारा
तू तिथे एकेक गुपित उलगडत पालटून टाकतोस रंग सारा
मी इथे जपत राहतो लपत राहतो बंद कुपीत झाकत स्वतःला
मला भिजवण्याचा जीवापाड आटापिटा व्यर्थ जातोच हे माहित असताना
का असा वागतोस माहित नाही.
हे तुझ चिडवण खिजवण कि अजून काही?
माहित नाही
की पोटच्या सगळ्या मायेनिशी माझ्यावर बरसल्या नंतर
माझ्या शुष्क डोळ्यातलं आटलेल पाणी स्वतःच्या डोळ्यात शोधतोस?
माहित नाही
प्रतिक्रिया
15 Jun 2011 - 12:00 am | आत्मशून्य
छान.
15 Jun 2011 - 1:56 pm | गवि
नि:शब्द..
अप्रतिम.. सुंदर. आणि काय काय म्हणू..?
क्या बात.
15 Jun 2011 - 2:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो!!
15 Jun 2011 - 5:32 pm | गणेशा
निशब्द