खरच...?मी आहे स्वतंत्र?...
की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥
आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या...
आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच...
प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा।
आत राहायचे,निवारा हवा म्हणुन...
आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही...
पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?।
कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी...
पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?...
काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा।
आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे...
आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे...
खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा।
पराग दिवेकर...
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 11:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी
छान मुक्तक आहे.
फक्त एक प्रश्नः
यात हुं आणि दडण्यासाठी हे वेगळ का केले?
नाही यात काही कोटी असेल तर त्याचे प्रयोजन कळले नाही.
माफ करा पण बहुतेक माझी आकलन शक्ती कमी पडत असेल.
13 Jun 2011 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा
''हुं-दडण्यासाठी" असं लिहिलं,कारण...आपण बय्राच वेळा,परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी वेगळी वाट हुडकतो.पण नंतर कळतं,की आपला पर्याय फक्त दडुन बसायच्याच उपयोगाचा आहे,आपण शोधलं ते उत्तर खंरं नव्हे...
13 Jun 2011 - 11:53 am | पाषाणभेद
खोलीचे पर्सनल अकांउंट असणं चांगली कल्पना आहे, पण त्यात ब्रांचमॅनेजरही असावा अशीही आमची मागणी आहे. म्हणजे दररोज सेव्हींग करता येतं.
13 Jun 2011 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा
ग्रेट सजेशन...मी प्रयत्नात आहे...थांकू...
13 Jun 2011 - 2:38 pm | पाषाणभेद
अर्थात किती ब्रांचेस असाव्यात याला मात्र आडकाठी नाही. आपापल्या जबाबदारीवर नवनवीन ब्रांचेस उघडाव्यात.
13 Jun 2011 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा
एकच बरी....एवढ्या उघडुन त्या चालवायच्या कुणी...आपली नाही बुवा तेवढी ताकद...