त्या दिवशी संध्याकाळी
पाऊस भुरभुरत होता,
भान विसरून मी
मनानं पावसात भिजत होते
तेवढ्यात तू आलास.
" छे, काय हा पाऊस!
वैताग नुस्ता
चिकचिक, चिखल, बाप रे"
मी पाहीलं तुझ्याकडे,
नवलाने.
"तुला नाही आवडत पाऊस?
झिमझिमणारा पाऊस,
भुरभुरणारा पाऊस,
कोसळ्णारा पाऊस.....
"हं, त्यात काय आवडायचं?
समुद्राच्या पाण्याची वाफ होते,
ती आकाशात जाते,
तिथे त्याचं हे होतं, ते होतं,
आणि पाऊस पडतो.
मी हसले, दुखावून
"तुझी नावड ही ठीक आहे,
मला तरी कुठे आवडतात,
पावसाची शास्त्रिय कारणे?
तू एकदम गप्प झालास.
जाताना टेबलावरचा चाफा
उचलून म्हणालास,
"ही नेऊ?"
मी पाहीलं तुझ्या डोळ्यात,
तुला पाऊस आवडायला लागला होता.
..........................
प्रतिक्रिया
15 Jun 2011 - 4:06 pm | विदेश
समुद्राच्या पाण्याची वाफ होते,
ती आकाशात जाते,
तिथे त्याचं हे होतं, ते होतं,
आणि पाऊस पडतो.
..........
मी पाहीलं तुझ्या डोळ्यात,
तुला पाऊस आवडायला लागला होता.
रचना आवडली.
16 Jun 2011 - 6:04 pm | सामान्य वाचक
!
16 Jun 2011 - 6:10 pm | नगरीनिरंजन
अरे, मस्त कविता! वाचायची राहिली होती.
16 Jun 2011 - 9:12 pm | सामान्य वाचक
माझ्यासाठी जुनी असली तरी बाकीच्याना नवीन, म्हणून टाकली.
16 Jun 2011 - 11:55 pm | धनंजय
त्याला चिकचिक वाटत होती, चिखलाने बरबटायला झाले होते, तर त्याच्या वेदनेसाठी आणि गैरसोयीसाठी तुमच्या मनात सहानुभूती नाही?
- - -
त्या दिवशी संध्याकाळी
डास भिरभिरत होता,
भान विसरून मी
मनानं गाण्यात गुंगत होतो
तेवढ्यात तू आलास.
" छे, काय हे डास!
वैताग नुस्ता
खाजखाज, सूज, बाप रे"
मी पाहीलं तुझ्याकडे,
नवलाने.
"तुला नाही आवडत डास?
गुणगुणणारे डास,
भिरभिरणारे डास,
घोंघावणारे डास.....
"हं, त्यात काय आवडायचं?
डबक्याच्या पाण्यात अंडी घालतात,
त्यांच्या अळ्या होतात,
तिथे त्याचं हे होतं, ते होतं,
आणि डास उडतात.
मी हसलो, दुखावून
"तुझी नावड ही ठीक आहे,
मला तरी कुठे आवडतात,
डासाची शास्त्रिय कारणे?
तू एकदम गप्प झालास.
जाताना पिशवीतून
कासवछाप काढलीस,
"टाकून देऊ?"
मी पाहीलं तुझ्या डोळ्यात,
तुला डास आवडायला लागले होते.
- - -
आता चट्टेरीपट्टेरी, किंवा काळेपांढरे ठिपके असलेले डास खूप देखणे असतात. त्यांचे गाणे खूप सुरेल असते. हे सगळे मान्य आहे. पण डास चावून-चावून बेजार झालेल्या मित्राला मी म्हटले : "तुला डास आवडले पाहिजेत", तर ते अप्रस्तुत वाटते.
26 Jun 2011 - 7:01 pm | सामान्य वाचक
काय बोलावे?
17 Jun 2011 - 7:58 pm | स्वाती दिनेश
कविता छान आहे, आवडली.
स्वाती
17 Jun 2011 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.
-दिलीप बिरुटे
28 Jun 2011 - 9:24 pm | इंटरनेटस्नेही
सुंदर कविता.
28 Jun 2011 - 9:27 pm | इंटरनेटस्नेही
सुंदर!