मनाचिया अंगणात.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
18 May 2008 - 6:13 pm

मनाचिया अंगणात

मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत
संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत !

गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या
तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?

भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत
जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत !

संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय
होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ?

-----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------

आम्हांस इथे ही भेटा.....

कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
कवितांजली :http://uday-sapre.blogspot.com/

गझल

प्रतिक्रिया

शितल's picture

18 May 2008 - 6:24 pm | शितल

सुद॑र काव्य रचना.

धमाल मुलगा's picture

18 May 2008 - 9:36 pm | धमाल मुलगा

गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या
तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?

हे खास आवडलं. :)

उदयराव,
स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल.
आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :)

उदय सप्रे's picture

18 May 2008 - 10:46 pm | उदय सप्रे

दोस्त,

तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही !

असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

उदय सप्रे