चालले मी परी विखुरल्यात इतस्ततः
जाणीवभर लहानथोर माझ्या खुणा
पदोपदी जाणवताना मिळेल आठवांना उजाळा
शब्द - नात्या विरहीत आपला भावबंध आगळा
नसणारे मी, एक शाश्वतय, मान्यय मला
मनातला ठाव माझा अशाश्वत ठरणार का ?
होते खरच ना मी इथलाच भाग अविभाज्य ?
पानगळीइतकचं शुल्ल्क होतं माझं अस्तित्व ?
आजर्पंतच्या असण्यावर प्रश्नचिन्ह उमट्लेलं
जमाखर्चाच शेवटचं पान ताळेबंद विसरलेलं
प्रतिक्रिया
31 May 2011 - 11:04 pm | निवेदिता-ताई
छान लिहिलीय