सध्या कंपनीत सगळीकडे अपरेझलच्या चर्चा आणि काथ्याकुट चालू आहे, त्यातच काल कविवर्य सुरेश भटांची अप्रतिम गझल आकाश उजळले होते वाचनात आली आणि आमच्या लेखणीला बर्याच दिवसांनी प्रेरणा मिळाली..
इतकेच मला भरताना अपरेझल कळले होते
सगळ्यांचे रेटिंग 'त्यांनी' आधीच ठरवले होते
ही सिस्टिम अपरेझलची बोलून बदलली नाही
मी ऍप्रिशिएशन लेटर नुसतेच जमवले होते
मी ऐकवली साहेबाला माझी 'कर्म' कहाणी
'यादी'तून त्यांने माझे पण नाव वगळले होते
झालेल्या अपरेझलचा उपहास चला विसरू या
(रेटिंग कधी दिधलेले माघारी वळले होते? )
याचेच हसू आले की जमले न मला रडणेही
मी रंग पुन्हा रेटिंगचे मद्यात मिसळले होते
मी इंटरव्हू देण्याला जालावर वणवण केली
जे जॉब खुले दिसले ते आधीच हडपले होते
नुकतीच मुलाखत माझी ऑनसाईट साठी झाली
नुसते न असे एच्वन चे मी भास कवळले होते
मी एकटाच त्या दिवशी त्वेशाने बोलत होतो
मी रेझिग्नेशन माझे नुकतेच खरडले होते
-केशवसुमार
प्रतिक्रिया
31 May 2011 - 6:22 pm | भडकमकर मास्तर
अपरेजल टाईम .... :) मस्त...
31 May 2011 - 7:13 pm | llपुण्याचे पेशवेll
खल्लास...
31 May 2011 - 7:19 pm | रेवती
छानच!
फारच उदासवाणा प्रकार आहे.;)
31 May 2011 - 8:17 pm | चतुरंग
गुर्जींचे दमदार आगमन झाले! वा वा मस्त विडंबन! :)
मी ऐकवली साहेबाला माझी 'कर्म' कहाणी
'यादी'तून त्यांने माझे पण नाव वगळले होते
पहिल्या ओळीत जाणवणारा यतिभंग सोडला तर बाकी एकदम खणखणीत अप्रेजल! ;)
31 May 2011 - 8:23 pm | प्रियाली
लय भारी! दुखत्या नसेवर बोट ठेवले आहे.
8 Jun 2011 - 11:49 pm | प्राजु
लै लै भारी!
9 Jun 2011 - 4:29 am | अभिज्ञ
कडक विडंबन.
अभिज्ञ.