==भेळ==
तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ,भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥
घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका
कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका
डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ।
गिह्राईक चांगलं हेरुन घ्यावं,मुठभर शेव पेरुन घ्यावं
चव नसली तरी चमचा चकचकीत,म्हणुन थोडं सेलेड द्यावं
डिश देण्याआधी पैसे घेऊन,तक्रारीला ठेऊ नये जागा आणि वेळ।
आता ते दिवस ह्रायले नाही,गिह्राईक कमवायची तर बातच नाही
कांदा अन गिह्राईकं कापायचीच असतात,अशी फिरवावी आपापल्यात वही
फक्त न चुकता लक्ष्मीपुजनाला,पुजेत ठेवावी रोज-मेळ।
चला...आजचा धंदा संपला, पाचशे...तिथं हजारचा गल्ला जमला
भरपुर भरलं ना पोट...?,आत काही का असेना मामला.....
नीतीमत्ता---?सांडलेल्या चुरमुय्रासारखी,लांबुन बघतीये खेळ।
=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=
पराग दिवेकर.......
प्रतिक्रिया
22 May 2011 - 10:01 am | तिमा
कविता आवडली.
नीतीमत्ता---?सांडलेल्या चुरमुय्रासारखी,लांबुन बघतीये खेळ।
हे विशेष आवडले. आणि गिर्हाईकांची नीतिमत्ता वर्णन करायची तर
' मागून घेतलेल्या चुरमुर्यांसारखी ' असेही वर्णन करता येईल.
22 May 2011 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद...पराग दिवेकर...
22 May 2011 - 10:20 am | अरुण मनोहर
तिखट आहे.
डोळे पाणावले
22 May 2011 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद...पराग दिवेकर....
23 May 2011 - 8:15 am | अरुण मनोहर
अजून येऊ द्या.