नि:संशय

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
20 May 2011 - 7:12 am

नि:संशय.........
खरं तर,
ती होती; म्हणून कविता जन्माला आली...........

तिच्या अस्तित्वाने ओढ निर्माण झाली
आणि अप्राप्यातून ईर्षा.......................

सुदैव........... !!
मुळातील सत्विकतेच्या अंशामुळे दंभाचा दंश झाला नाही
म्हणून भिनलेल्या अस्मितेचा विध्वंसही झाला नाही....................

सहयोगाने तृप्तीच्या संकल्पनांचा शब्द झाला आणि
तुंबलेल्या दबावाचा प्रवाह.....................

आता स्वप्नामधला निसर्ग
अंकुरलेल्या भावभावनांना कवटाळून
वास्तवापलिकडे;
एकांतात; तरंगू लागला, रमू लागला, खेळवू लागला.............

मग काय,
मीच आभाळ नी मीच आकाश.............
नजर पोहोचेल तिथपर्यंत सर्वभौम माझंच सम्राज्य................!!
नि:संकोच; निराकारातून साकारत गेल्या वृत्ती.........
संस्कृतीत बद्ध झाली प्रकृती....

निकराची झुंज आणि तिच्या प्रवासाची सुप्त व्यथा अनावृत झाली प्रत्यक्षात
आणि आकाराला आली कवितेची अबलखशी आकृती........

आभार तिचे
आणि नियतीच्या नकाराचेही......
करण
त्यातूनच ती माझ्याशी
खरी एकरूप एकात्म तदात्म्य पावली.......
नकळत........
अस्पर्श..........
आजन्म........
अभंग.........
चिरंजीव.................

................अज्ञात

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 May 2011 - 7:23 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!!
खुपच सुंदर!!

मुळातील सत्विकतेच्या अंशामुळे गंडाचा दंश झाला नाही
म्हणून भिनलेल्या अस्मितेचा विध्वंसही झाला नाही

हे तर केवळ अप्रतिम!!!

लिहीत रहा, वाचत आहोत :)

अज्ञातकुल's picture

20 May 2011 - 7:33 am | अज्ञातकुल

धन्यवाद देवा असेच भेटत रहा. :)

अरुण मनोहर's picture

22 May 2011 - 10:29 am | अरुण मनोहर

तुंबलेल्या दबावाचा प्रवाह.....................