क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 May 2011 - 6:05 am

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
माझे काळीज मोडून

खडकावरल्या फेसाळ लाटा
पाय धुवूनी जात होत्या
त्याही मागे सरल्या आता
आली ओहोटी म्हणून

शुभ्र पांढरी मऊ रेती
पायाखाली येत होती
ढिगारा त्या रेतीचा
आताच गेला कोसळून

कोण, कोणाचा,कुठला, मी, तो?
कशास धरूनी चालत होतो?
समोर आता तांबड काळसर
आकाश नुरले सारे व्यापून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०४/२०११

कविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

12 May 2011 - 8:56 am | नरेशकुमार

क्षितीजावर सुर्य ढळतो ते नव्या दमाने, नव्या दिवशी उगविन्यासाठिच.
अशी आशा बाळगुयात.

निनाव's picture

13 May 2011 - 8:11 pm | निनाव

पा भे,

शुभ्र पांढरी मऊ रेती
पायाखाली येत होती
ढिगारा त्या रेतीचा
आताच गेला कोसळून

-- साष्टांग!