प्रेम आणि मरण

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
9 May 2011 - 10:44 pm

निघालो क्षितिजा स गवसणी घालायला
अश्वमेघ सोडला दिग्विजयी व्हायला
सळसळते रक्त, धगधगते मन,
चौफेर उधळले वारू मनाचे
सर केले अवघड मनोरे स्वन्प्नांचे
रणधुमाळीत या सार्‍या विसरलो सखे
“प्रेम” काय चीज असते ते
इतका बे दर्दी कसा झालो कळलेच नाही
कळलेच नाही तुझ्या डोळ्यातील भाव
नकळतच झेलत राहिलो प्राक्तनाचे घाव
जगण्याचे संदर्भ हि विसरलो
मरणा च्या वाटेवर
नि आज ...जीवनाच्या वळणावर
एकटाच अजेय परतीचा प्रवासी
दमलेले थकलेले प्रारब्ध..
जीवन कुठेच थांबत नाही हे हि खरेच
थांबलास तर संपलास हे हि खरेच
पण चुकणार नाही आता
जीवंतपणीच घेणार अनुभव मरणाचा
करणार “प्रेम” तुटून आता
परतीच्या वाटेवरील लेऊन घेणार सौदर्य सारे
हला हला सम पिऊन घेणार
गवत फुलांवरील दव ही सारे
करणार “प्रेम” तुटून आता
कारण प्रेमात आणि मरणात नसतोच ...
“अहं “

कविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

10 May 2011 - 5:23 am | नरेशकुमार

छान आहे.