मित्रहो,
आवडले तर बेला्शक वापरा, पण वापरलेत तर माझी आठवण ठेवा ....................:-)
जयंत कुलकर्णी.
त्या भागातले कोणी असेल तर तेथे त्या पात्रातली बेसूमार वाळू उपसा चालला आहे त्या बद्दल काही करता येईल का हे बघाणार का ? मला वाटते या पात्रातून दररोज २५० ट्रक वाळू उपसली जाते. त्यासाठी जोरदार यांत्रिकीकरण झालेले आपल्याला दिसेल. अर्थात तेथील स्थानिक याच्या विरुध्द काही करणार नाहीत कारण तेही यात पैसे खातच असतीलच. (बहुदा हे बेकायदा आहे. असे तेथे कुजबुजत बोलले जाते) पण त्यांना हे माहीत नाही की ते स्वत:च्या पायावरच कुर्हाड मारून घेत आहेत. तेथे काहीच दिवसात पर्यावरणाचा तोल पूर्णपणे ढासळलेला दिसणार आहे या बाबत आमच्या मनात बिलकूल शंका नाही.
मला वाटते पुढच्या वेळी पक्षी तेथे येतील की नाही ही शंकाच आहे. आपल्याला माहीत नसेल तर सांगतो फक्त याच ठिकाणी हे पक्षी इतक्या जवळून बघता येतात. बघता आले तर बघून घ्या.
हताश जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
9 May 2011 - 6:57 am | नरेशकुमार
'करावे तसे भरावे'
या नात्याने 'उपसावे तितके भरावे' असे भविश्यात होईल.
Can't do anything.
लिहिलेले वाचुन फोटों बद्दल काही बोलन्याची इच्छा झाली नाहि. क्षमस्व :
10 May 2011 - 2:07 am | प्राजु
सुरेख फोटो.
भिगवणला खरंच एकदा जायला हवं.