निसर्गरम्य माथेरान

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
7 May 2011 - 10:36 am

मागच्या एका धाग्यात माथेरानमधल्या मर्कट फोटोग्राफीचा प्रयत्न डकवला होता. आता माथेरानची काही निसर्गचित्रे येथे देत आहे.

नेरळ स्थानकावर उभी असलेली माथेरानची राणी

एका अवघड वळणावर

आम्ही उतरलो होतो ते हॉटेल

एको पॉईंटवरून

लुईझा पॉईंटवरून दिसणारे माथेरानचे लांबचलांब पठार

माथेरानच्या सर्वोत्तम पॉर्क्युपाइन पॉईंटवरून दिसणारा कडा. यातूनच लोहमार्ग गेला आहे.

तिथूनच दिसणारा पेबचा किल्ला

एको पॉईंटवरून दिसणारा लुईझा पॉईंट

चंदेरी किल्ल्याची दमदार कातळभिंत, पाठीमागे म्हसमाळ सुळका

शार्लोट तलावाजवळून समोर दिसणारा प्रबळगड व कलावंतीण सुळका

कलावंतीण सुळका झूम इन

शार्लोट तलाव

लॉर्डस पॉईंटवरून दिसणारा इर्शाळ

व्हॅली क्रॉसिंग करताना

अलेक्झांडर पॉईंटकडे जाणारी घनगर्द झाडीतली वाट

सुर्यास्ताअगोदर

सुवर्णझळाळी

सुर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी

अलेक्झांडर पॉईंटवरून परतीची वाट

माथेरानच्या बाजारपेठेत

जाता जाता माथेरान रेल्वे स्थानकावर प्रगटलेला तेजोनिधी

माथेरानच्या राणीतून दिसणारी पेबवर चढत जाणारी वाट, पाठीमागे धुरकट चंदेरी

छायाचित्रण

प्रतिक्रिया

माथेरान आणि तुमची फुटॉग्राफी ... एकदम सुरेख हो वल्ली महाशय. .

लै भारी ..

रामदास's picture

7 May 2011 - 11:10 am | रामदास

सुंदर फोटो.पेबचा फोटो पॅनोरमावरून आणखी चांगला येतो पण थोडे खाली उतरावे लागते. माथेरानला गेल्यावर शार्लोटच्या बागेत डबा खायचा आणि नंतर वन ट्री पर्यंत जाऊन पचवायचा. पिसारनाथाच्या देवळाबाहेर एक मोठा दगडाचा गोळा ठेवलेला असायचा.पुण्य वाढले की आपोआप उचलला जाईल असं सांगीतलं अस्ल्यामुळे दर उन्हाळ्यात एकदा उचलून बघायचो. शेवटच्या फेरीपर्यंत तरी उचलला गेला नाही आणि आता उचलला जाणार नाही याची खात्री आहे. केतकरांचे राम मंदीर हा असाच एक थांबा असायचा.दिवाडकरांपेक्षा त्यांचा वडा स्वस्त म्हणजे तीस पैशात मिळायचा. पण माथेरान फारच बोडके झालेले दिसते आहे. आम्ही जाताना धनगर टप्प्यानी जायचो. मजा यायची.

प्रचेतस's picture

7 May 2011 - 11:26 am | प्रचेतस

पॅनोरामा तर माथेरानचा सर्वोत्कृष्ट पॉईंट म्हणता येईल. पण तीनदा माथेरानला जाउनही तो पाहण्याचा योग आला नाही. पण पेब तिथून अगदी पुढ्यातच आहे. जवळूनच किल्ल्यावर जाणारी वाट उतरते म्हणे. पिसरनाथाचे देउळ तर चुकवू नये असेच. अतिशय गर्द रानात आहे. शिवाय तो दगडाचा गोळाही अजून तिथेच आहे.
माथेरान तसे अगदीच बोडके झालेले नाही पण उन्हाळ्याच्या रखरखटामुळे तसे जाणवत असेल, पण झाडी अजून खूपच टिकून आहे,वाहनांना प्रवेशबंदी असल्यानेच कदाचित.

वल्ली फोटू खतरनाक आलेत , चंदेरी गड पण सुरेख आहे ट्रेकिंग साठी
सुवर्ण झळाळी ;)
मास्टरपीस
सूर्यास्ताचे सगळे फोटू खास.

माथेरान च खरं सौंदर्य खुलत ते मात्र पावसातच

किसन शिंदे's picture

7 May 2011 - 1:46 pm | किसन शिंदे

माथेरानला गेलो नाहीये अजूनपर्यंत...पण तुम्ही तुमच्या फोटोंतून माथेरानचं मस्त दर्शन घडवलतं. :)

धन्यवाद वल्ली!

पियुशा's picture

8 May 2011 - 3:57 pm | पियुशा

+१ हेच म्हनते :)

लई भारी फोटो वल्ली, जाम मजा केली म्हणजे तुम्ही. (म्हणजे बरोबर कोण होतं ते माहित नाही), पण तुझा फोटो आहे म्हणजे बरोबर कुणीतरी असेलच ना.काय आहे, नाहीतर एरवी डोंगर द-यात फिरणारे तुम्ही कशाला गर्द हिरव्या झाडीत आणि तळ्याच्या काठाला जाल नाही का ?

माझीही शॅम्पेन's picture

7 May 2011 - 8:17 pm | माझीही शॅम्पेन

छान फोटो !

होटेलच नाव काय होत ?

प्रचेतस's picture

8 May 2011 - 9:15 am | प्रचेतस

हॉर्सलँड रिसोर्ट मध्ये राहिलो होतो.
इथे अधिक माहिती पहा.
http://www.horselandhotel.com/

माथेरान खरच उत्क्रूश्ट वीकेंड स्पॉट आहे. मस्त राहण्याच्या सूवीधे सोबत मनसोक्त खाणे पीणे ही स्वस्त आहे आणी सोबत नीसर्ग ही अप्रतीम. १ रात्र मूक्काम ठरवूनच जायच मस्त मजा येते रात्री जंगलात पाणवठ्या जवळ भटकायला. गाड्यांना वाटेतच बंदीकरून त्यांनी खरोखर पर्यावरण छान ठेवलेय. सगळी वाहतूक घोड्या वरूनच अथवा रेल्वेने त्यामूळे वरचं गाव तसं जगापासून बरच अंतर राखून आहे. त्यामूळे रात्री मार्केट मधे फीरताना तर सूंदर चेहरे*, घोडा गाड्या, व इतर गोश्टी गंमत जंमत बघत रमत गमत फीरताना काही क्षण असं वाटत जणू एखाद्या परीकथेतील गावातच आलोय... मस्त वाटतं. वल्ली साहेब लोकं माथेरान ला ट्रेक म्हणून जंगलातून खालपासून वर चढत सूध्दा जातात.

(* बहूतांश सूटीच्या कालावधीत.)

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2011 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

सुंदर, अप्रतिम छायाचित्रे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....

सत्तरच्या दशकापर्यंत माथेरान म्हणजे मध्यमवर्गीय मराठी माणसाचे पर्यटनाचे स्वर्गीय स्थळ होते. ती झुकझुक गाडी, ओसंडून वाहणारा निसर्ग, शुद्ध आणि थंड रोमांचकारी हवा तसेच शनिवार-रविवार जोडून सुट्टी आली कि 'आवाक्यातील थंड हवेचे ठिकाण' म्हणून माथेरानकडे पाहिले जायचे. पुढे ऐंशीच्या दशकापासून मराठी माणसाच्या खिशातही जरा पैसा खुळखुळू लागला आणि आंतरजाल तसेच जाहिरातींच्या माध्यमातून त्याची पर्यटनविषयक नजर विस्तृत होत गेली. आज मराठी माणूस पर्यटानासाठी परदेशगमनातही मागे नाही.
तरीपण, एकेकाळच्या माथेरानच्या प्रामाणिक साथीच्या आठवणीने तो अजूनही हळवा होतो.
आणि म्हणतो, 'चला माथेरानला जाऊया......' .

फोटू चांगले आलेत.
मी अजून गेले नाहीये माथेरानला.
पूर्वी थंडी खूप असायची असे म्हणतात.........फोटोत फारशी झाडेही आहेत असे वाटले नाही.

प्रचेतस's picture

9 May 2011 - 9:33 am | प्रचेतस

झाडी भरपूर आहेत आणि अगदी घनदाट आहेत. फोटोंमध्ये माथेरान वरून दिसणार्‍या निसर्गदृश्यांचे बरेच फोटो असल्याने तसेच उन्हाळ्याच्या रखरखाटामुळेही झाडी कमी झाल्यासारखे दिसतेय.
माथेरानमध्ये फिरतांना आजही भर दुपारी कुठेही उन लागत नाही.

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 6:41 am | नरेशकुमार

कधी जमलेच नाही जायला,
आता मज्जा येइल.
छान लेख आहे.

प्यारे१'s picture

9 May 2011 - 10:06 am | प्यारे१

मस्त फटु वल्ली.....!!!