तुझी आठवण येते....
कितीही विसराव अस म्हणालो तरी,
का..? कुणास ठाऊक पण...।
तुझी आठवण येते....
एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,
तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर,
आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
कुठून तरी एखादा आवाज कानी येतो
खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो,
आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
धावता-धावता ही नजर कुठेतरी खिळते
कुणालातरी पाहून ती क्षणभर थांबते,
तु नसल्याची खूण पटेसतोवर ती-त्या कुणाचा पाठलाग करत जाते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
नव्या-नव्या वाटसरुंशी गाठ-भेट होते
त्यांच्यात माझी नजर तुलाच शोधू पाहते,
आणि कुणात तरी मला तुझी झलक दिसून जाते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
कुणाशी तरी बोलता-बोलता गाडी रुळावरून घसरते
जुन्याच स्टेशनांवर जाऊन ती..पुन्हा एकदा बिघडते,
गप्पा-टप्पांच्या मैफिलीत मग आठवणींची उजळणी होते आणि मग...।
का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....
हर्षद अ. प्रभुदेसाई.....