माझे असंख्य तुकडे करत
खुशाल ह्याच्या त्याच्या झोळीत टाकत होतास
ते मिरवत होते माझी लक्तर मूर्खांच्या नंदनवनात
आणि तू तुझ देवपण.
तुझ्या पायांशी तेव्हा रास पडली होती
नमस्कारांची, फेडलेल्या नवसांची,
अन थातूर मातुर अर्जांची
आणि त्यांच्या हातात होते
सुखाचे असंख्य अश्रूबंबाळ दुःखी तुकडे
दोन्हीही चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारे…
प्रतिक्रिया
5 May 2011 - 11:45 am | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे..
खुप आवडले ...
सुखाचे दु:खी मनोगत कल्पनाच मस्त
5 May 2011 - 11:50 am | गवि
लवकरात लवकर पुस्तक कवितासंग्रह अशा फॉर्मॅटमधे निघू दे. म्हणजे प्रवासात किंवा कुठेही जाताना सदैव सोबत घेऊन जाता येतील तुझ्या कविता.
सोनलकडून अजून एक अत्यंत वाचनीय क्रिएशन. कविता म्हणतानाही याला काहीसे उणावल्यासारखे वाटते.
कविता हा शब्द सामान्य आहे. तुझ्या रचना त्यापलिकडच्या असतात बर्याचदा. ही पण तशीच.
लगे रहो..
6 May 2011 - 12:16 pm | सोनल कर्णिक वायकुळ
पुस्तक ? अजुन बरीच उन्ची गाठायचि आहे. :)
5 May 2011 - 11:57 am | नगरीनिरंजन
सुंदर.