क्षण
वाहणारे
हातातून निसटणारे
येतील का पुन्हा जुळून
विसरता न येणारे
क्षण
भरणारे
आठवणींतून झरणारे
येतील का पुन्हा दाटून
बु़जवता न येणारे
क्षण
चमकणारे
निराशेस विझवणारे
येतील का पुन्हा उजळून
लपवता न येणारे
कुणास ठाऊक ते येतील कधी
धरतील हातात हात मैत्रीचे कधी
मिठीस घेऊन एक्-मेकांस
विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा
क्षण
लांबणारे
हवे हवेसे ते वाटणारे
येतील का उतरून पुन्हा
आयुष्यास ते हसवणारे
- निनाव २४ अप्रिल २०११
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 3:00 pm | प्रकाश१११
निनाव -
कुणास ठाऊक ते येतील कधी
धरतील हातात हात मैत्रीचे कधी
मिठीस घेऊन एक्-मेकांस
विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा
खूपच छान उतरले आहे हे सर्व ...!!
25 Apr 2011 - 11:18 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर रचना!! यावरुन माझी एक रचना आठवली. देईन लवकरच!!
25 Apr 2011 - 7:47 pm | गणेशा
खुपच छान लिहिले आहे ..
खुप आवडले ..
असेच लिहित रहा... वाचत आहे...
26 Apr 2011 - 12:09 am | पाषाणभेद
एकदम छान रचना आहे. शब्दात विरोध असूनही एकमेकांच्या जवळ आहेत.
"कुणास ठाऊक ते येतील कधी
धरतील हातात हात मैत्रीचे कधी
मिठीस घेऊन एक्-मेकांस
विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा"
हे कडवे शेवटी हवे होते का?
अर्थात तो अधिकार तुमचा आहे कारण ती कविता तुमची आहे.
26 Apr 2011 - 2:20 am | निनाव
पाभे,
आवर्जुन वाचल्या बद्दल, खूप आभार.
तुमचे म्हणणे पटते , पण मुद्दाम हे कडवे शेवटी ठेवले नाहि.. कारण, शेवट पुन्हा त्याच ओळींनं/लयी नं करायचा होता मला.. ! उम्मीद आहे तुम्हास पटेल माझी भुमिका. पुन्हा, लिहिल्या बद्दल आभारी आहे पाभे.
9 May 2011 - 11:06 pm | ajay wankhede
क्षण
वाहणारे
हातातून निसटणारे
येतील का पुन्हा जुळून
विसरता न येणारे
व्वा छान मित्रा ...आवडले
-----------------------------------------------------------------------------------
बर्बादी यो का जष्न मनाता चला गया..
मै जिन्दगि का साथ निभाता चला गया.....