काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे. घ्या!
ती गझल तुम्हाला जमेना
शोधीता केसुही दिसेना,
यमकांचे मिटर हरवता
त्यात नाट्य सापडेना ||
जमवा की चार जोड्या
यमकेही दोन पाडा,
अन पाठवा पाठोपाठ
शब्दांच्या मालगाड्या ||
काव्यात मिकाची थोरवी
तरी प्रतिसादांची गरीबी,
जणु दूधवाला तो गवळी
पाण्याची दडवतो चरवी ||
तो एक घासू येता
पन्नास कविता पुढती,
पालीसमान टपाटप
कसे ते प्रतिसाद पडती ||
त्यातही तुम्ही पाडला
पाऊस असा अवेळी,
वणव्यात आमचीही
एक गारपीटीची खेळी ||
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 8:11 am | प्रकाश१११
निनाव -
ती गझल तुम्हाला जमेना
शोधीता केसुही दिसेना,
यमकांचे मिटर हरवता
त्यात नाट्य सापडेना ||
वा ..वा एकदम टोलवलाकी बॉल
मस्त.भन्नाट !!
25 Apr 2011 - 11:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हा अगदी वर्मी घाव घातलात. असो.
याद रख्खुंगा!! तुझे याद रख्खुंगा!!! ;)
25 Apr 2011 - 11:17 am | यशोधरा
मी म्हटलं मिका कोण! कळालं, कळालं! :D
27 Apr 2011 - 5:14 pm | निनाद
हा हा हा आता इथे राखीची गरज आहे. ;)
25 Apr 2011 - 7:56 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे मस्त वाटाले एकदम .. मालगाड्या ... पाण्याची चरवी .. भारीच एकदम
बाकी तमाम वाचकांच्या दु:खात सामिल झाल्याचा आनंद वाटला ...
हि सुरुवात आहे ...लिहित रहा... शेवट पर्यंत वाचण्यास उत्सुक...
-
25 Apr 2011 - 8:34 pm | ऋषिकेश
हा हा हा!! मस्तच रे
26 Apr 2011 - 12:12 am | पाषाणभेद
आम्हालाही थोडे दु:ख मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. लक्षात ठेवा आमच्याही अधिकाराचा मान प्रत्येकवेळी राखत चला.
27 Apr 2011 - 5:18 pm | निनाद
आम्हालाही थोडे दु:ख मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत.
वाचकांचा संतोष हेच आमचे भांडवल. - टीपः आमची कोठेही शाखा नाही!
लक्षात ठेवा आमच्याही अधिकाराचा मान प्रत्येकवेळी राखत चला. काही प्रोशिजर प्रोटोकाल असेल तर सांगून ठेवा साहेब, फालो करणेत येईल. - हुकुमावरहून.
29 Apr 2011 - 8:21 am | मदनबाण
त्यातही तुम्ही पाडला
पाऊस असा अवेळी,
वणव्यात आमचीही
एक गारपीटीची खेळी ||
झकास्स्स्स... :)
29 Apr 2011 - 11:29 am | नरेशकुमार
कुत्रिम पाउस पडला काय? आजकाल modern science मूळे हे possible आहे.
29 Apr 2011 - 11:34 am | निनाद
आता काय सांगायचे?
हे पाहा येथे http://www.misalpav.com/node/17760
मिका ने पाऊस पाडला तर त्यात वणवा पेटला. मग काय होणार?
29 Apr 2011 - 12:21 pm | नरेशकुमार
ohh असे आहे काय. माझी Tube light उशिरा लागली.
अवांतर : आम्हि मित्रमित्र मालगाड्या हा शब्द वेगळ्या contest मध्ये वापरतो.