भिजलो उन्हात इतका ....
पावसात वाळलो नाही ...
मेलो पुन्हा पुन्हा इतका .....
जगण्यास भाळलो नाही ...
पिकलो कधीच नव्हतो ....
गळलो कसे कळले नाही ...
पेटलो कधीच नव्हतो....
जळलो कसे कळले नाही ...
खेळलोच नाही कधी ....
हरलो कसे कळले नाही ...
विसरली नव्हतीस कधी ....
स्मरलो कसे कळले नाही ...
आणले उसने अवसान ....
गळले कसे कळले नाही ...
दुख्खास ह्या सलत्या ...
गिळले कसे कळले नाही ....
होतो स्वप्नवत निद्रेत ....
जागलो कसे कळले नाही ....
होतीस तू माझा श्वास ....
अजून जगलो कसे कळले नाही ....
होतीस तू माझा श्वास ....
अजून जगलो कसे कळले नाही ....
प्रतिक्रिया
20 Apr 2011 - 12:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
उच्च रचना!!
20 Apr 2011 - 2:01 pm | निनाव
अनुमोदन. उच्च रचना. मस्त लिहिले आहे.
20 Apr 2011 - 5:32 pm | स्वप्निल रत्नाक...
मस्त लिहिले आहे.
20 Apr 2011 - 7:47 pm | गणेशा
पिकलो कधीच नव्हतो ....
गळलो कसे कळले नाही ...
पेटलो कधीच नव्हतो....
जळलो कसे कळले नाही ...
छानच
20 Apr 2011 - 8:06 pm | गणपा
बोहोत खुब..