भातुकलीचा खेळ ...

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
20 Apr 2011 - 12:31 pm

बर्याच वर्षांची आपली निस्सीम मैत्री "संपवून"
ठरवले करूयात दोनाचे चार हात ...
वरवरून सगळे छान होते सगळा आनंद होता ...
पण काहीतरी सलत होते आत

आता काय उद्या पासून मी नवरा नवरा खेळायचे
अन तू बायको बायको खेळायचे ...
अन ह्या so called संसाराच्या गाडग्याला
तू मागून ढकलायचे अन मी पुढून ओढायचे

दिले आपल्या नात्याला आपण अधिकृत नाव
वाढला ह्या समाजात आपला भाव
वाटले सुखी संसाराचे हेच खरे सूत्र
माझ्या हाती अंगठी अन तुझ्या गळी मंगळसूत्र ....

खूप प्रयत्न केला पण जमला नाही कशाचा कशाला मेळ ....
चार चौघांसमोर नुसतेच आपण मारून नेताहोत वेळ
खर, फ़क़्त आपल्यालाच माहिती आहे सखे ...
हा दोन मित्रांनी मांडलेला ....
भातुकलीचा खेळ ...
हा भातुकलीचा खेळ ...

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Apr 2011 - 12:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त जमलीये...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Apr 2011 - 12:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त जमलीये...

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 1:58 pm | स्पंदना

अतिशय छान .

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 1:59 pm | स्पंदना

अतिशय छान .

निवेदिता-ताई's picture

20 Apr 2011 - 2:52 pm | निवेदिता-ताई

छान आहे.

गवि's picture

20 Apr 2011 - 3:41 pm | गवि

सत्य आणि स्तुत्य..

मुलूखावेगळी's picture

21 Apr 2011 - 1:08 pm | मुलूखावेगळी

आवडली
पन पटली नाही