सावकारी ही अशी की...

बन्या बापु's picture
बन्या बापु in जे न देखे रवी...
20 Apr 2011 - 3:52 am

सावकारी ही अशी की, कुणी कुणाचा नाही,
हसलो जरी मी, ते हसू मात्र माझे नाही.

खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही,
चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही..

तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा..
जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही ..

तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे,
बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही..

इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही,
आहेत हिंदू मुस्लीम सगळे, माणूस मात्र कोणी नाही ..

राहुन वाटते हे, का जगलो असा मी ?
आयुश्यात मला, सावकारी जमलीच नाही.

घेऊन जा आता, मज तुझ्या संगे म्रुत्यु ,
ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.

करुणकविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

20 Apr 2011 - 5:02 am | नरेशकुमार

कविता छान आहे.

इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही,

माझी ओळख करुन देउ का ?

निनाव's picture

20 Apr 2011 - 9:11 am | निनाव

छानच. मस्त कविता.

<<
तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा..
जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही ..

तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे,
बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही..
>>

- हे खूप आवडले. :)

प्रकाश१११'s picture

20 Apr 2011 - 10:02 am | प्रकाश१११

बन्या बापू -
खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही,
चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही..

तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा..
जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही ..

छान नि छान कविता !!

स्वप्निल रत्नाकर भायदे.'s picture

20 Apr 2011 - 10:12 am | स्वप्निल रत्नाक...

ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Apr 2011 - 10:50 am | मिसळलेला काव्यप्रेमी

तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे,
बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही..

सुंदर रचना!!

किसन शिंदे's picture

20 Apr 2011 - 11:27 am | किसन शिंदे

तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे,
बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही..

हे कडवं अतिशय सुंदर