भिकबाळीचे महत्व

महेश_कुलकर्णी's picture
महेश_कुलकर्णी in काथ्याकूट
19 Apr 2011 - 6:15 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर,
कदाचित जो प्रश्न मी विचारतो आहे तो याआधी कधीतरी चर्चिला असेल.
भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे?

मी त्या संबंधी माहिती शोधली पण सविस्तर माहिती कुठेच नाही मिळू शकली.
आतापर्यंत मिळालेली माहिती अशी.
१) भिकबाळी कानात विशिष्ट पद्धतीने टोचल्याने मानसिक स्वास्थ्य राहते.
२) पूर्वीच्या काळी याची ओळख उच्चशिक्षित लोकांचा दागिना अशी होती.

जर आपणास अजून काही माहिती असेल तर कृपया ती सादर करावी. जर त्या संबंधीचे संदर्भ मिळाले तर दुधात साखर.

धन्यवाद,
महेश कुलकर्णी

प्रतिक्रिया

पक्का इडियट's picture

19 Apr 2011 - 6:16 pm | पक्का इडियट

बापरे किती महत्व ते....

महेश_कुलकर्णी's picture

19 Apr 2011 - 6:58 pm | महेश_कुलकर्णी

मिपाकर मंडळी,
मला जाणून घायचे आहे की भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्व काय आहे?
मला आत्तापर्यंत मिळालेली माहिती
१) भिकबाळी कानात विशिष्ट पद्धतीने टोचलेली असते म्हणून मानासिक स्वास्थ्य चांगले राहते.
२) पूर्वीच्या काळी उच्चशिक्षित लोकांचा दागिना अशी ओळख होती.

या व्यतिरिक्त आपणास काही माहिती असल्यास कृपया त्याची माहिती सादर करावी.

धन्यवाद,
महेश कुलकर्णी

ता.क. हा धागा संपादित किंवा DELETE करण्याचे पर्याय सापडले नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 7:10 pm | परिकथेतील राजकुमार

भिकबाळीमुळे विशिष्ठ प्रकारची नस टोचली जाऊन एकाग्रता वाढते, संततीदोष दूर होतात, मनःशांती वाढते असे ऐकुन आहे.

जाणकार पुपे यावर अधील प्रकाश टाकु शतील अस वाटत.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2011 - 11:13 am | llपुण्याचे पेशवेll

भिकबाळीचा संबंध संततीदोषाशी नसला तरी लघवीशी संबंधीत दोषांशी आहे. लघवीशी संबंधीत नसा या कानाच्या पाळीमधून जातात असे मानले जाते. म्हणून भिकबाळी कानात टोचली जाते ज्यामुळे त्या संबंधीत नसा अथवा शिरा कायम स्पर्षिल्या जाऊन लघवीस साफ होते. पूर्वी जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य असे तेव्हा त्यावर हा उपाय गुणकारी मानला जायचा. कारण भिकबाळी सारखीच नुसती बाळी (लोंबणारा मोती नसलेली), अथवा सुंकली (नुसती बारीक तार आणि त्यात एखादा खडा) असेही प्रकार सर्व लोकांमधे वापरले जात.
अवांतरः लहानपणी म्हणजे अगदी १-२ महीन्याचे असतानाच बालकांचे कान टोचून त्यात सोने घालण्याची पद्धत महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यामुळे (विषेशतः सोने कानामधे घातल्यामुळे) बालकांना होणारा धनुर्वाताचा धोका कमी होतो असे मानले जाते.

नरेशकुमार's picture

19 Apr 2011 - 6:19 pm | नरेशकुमार

महत्व समजले.
थँक्स !
वाचुन वाचुन जिव गेला.

महेश_कुलकर्णी's picture

19 Apr 2011 - 6:19 pm | महेश_कुलकर्णी

काही तांत्रिक कारणामुळे मुळ मुद्दा या मध्ये येवू शकला नाही...

मी परत तो छापतो.

रेवती's picture

19 Apr 2011 - 10:43 pm | रेवती

भिकबाळीचे अनेक फायदे असणार.
मला माहित असलेली गोष्ट अशी आहे की, तान्ह्या बाळांचे कान सोन्याच्या तारेनी टोचतात त्यावेळी त्यात खरा मोतीही ओवतात. रोज अंघोळीच्यावेळेस बाळाच्या अंगावर पडणारे पाणी हे सोन्यामोत्यावरून पडते आणि त्यात त्यांचे गुणघर्म असतात. त्याने बाळाची अंगकांती सतेज होते. नंतर (कोणत्या वयात ते माहीत नाही) कानातल्या तारा काढून त्याजागी एकच भिकबाळी मुलांना आणि सोन्याच्या रिंगा मुलींना घालून त्या बोळवतात (बंद करतात) म्हणजे हरवत नाहीत. बाळाची पाचवी पुजण्याच्या दिवशी काळ्या गंड्यात ओवलेला सोन्याचा बदाम हृदयाजवळ येइल असा बांधतात. मनुष्याने सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोन्याच्या सानिध्यात रहावे म्हणून हे आहे. मुले मोठी झाली की त्यांना सोन्याच्या चेनाही घालायला देतात ते यामुळेच! आजकाल हे सगळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य होत नाही तसेच सगळ्यांना परवडण्यासारखे असेलच असे नाही. यासाठी लहानांना अंगावर काही घातले नाही तरी चांदीच्या ताटलीतून रोज जेवण असते. ती ताटली उष्टावणाला घेतली जाते. मुंजीत मोठे चांदीचे ताट घेतले जाते. हे सगळे संकेत आहेत. शक्य नसेल तर काचेच्या/ चिनीमातीच्या ताटलीतून लहान मुलाला भरवावे पण स्टीलचे ताट नको असे म्हटले जाते.
माझे आजोबा भिकबाळी घालत असत. संसाराच्या पडत्या काळात त्यांना त्यांची भिकबाळी आणि घोडा विकून मार्ग काढावा लागला असल्याचे आजीच्या बोलण्यात आले होते. त्यासाठी अंगावर खूप सोने नाही तरी एखादी अंगठी तरी ठेवावी असे म्हणतात. अडीनडीला विकून संकटातून मार्ग काढता येतो. दुर्दैवाने आजकाल सोन्यामुळेच संकटात सापडल्यासारखे वाटण्याजोगी परिस्थिती आहे.

प्यारे१'s picture

20 Apr 2011 - 9:53 am | प्यारे१

>>>>रोज अंघोळीच्यावेळेस बाळाच्या अंगावर पडणारे पाणी हे सोन्यामोत्यावरून पडते आणि त्यात त्यांचे गुणघर्म असतात. त्याने बाळाची अंगकांती सतेज होते. नंतर (कोणत्या वयात ते माहीत नाही) कानातल्या तारा काढून त्याजागी एकच भिकबाळी मुलांना आणि सोन्याच्या रिंगा मुलींना घालून त्या बोळवतात (बंद करतात) म्हणजे हरवत नाहीत. बाळाची पाचवी पुजण्याच्या दिवशी काळ्या गंड्यात ओवलेला सोन्याचा बदाम हृदयाजवळ येइल असा बांधतात. मुले मोठी झाली की त्यांना सोन्याच्या चेनाही घालायला देतात ते यामुळेच! आजकाल हे सगळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य होत नाही तसेच सगळ्यांना परवडण्यासारखे असेलच असे नाही.

वांजळेंचे सोने घालण्याचे कारण कळाले. ;)

आजानुकर्ण's picture

20 Apr 2011 - 11:30 am | आजानुकर्ण

मला माहित असलेली गोष्ट अशी आहे की, तान्ह्या बाळांचे कान सोन्याच्या तारेनी टोचतात त्यावेळी त्यात खरा मोतीही ओवतात. रोज अंघोळीच्यावेळेस बाळाच्या अंगावर पडणारे पाणी हे सोन्यामोत्यावरून पडते आणि त्यात त्यांचे गुणघर्म असतात. त्याने बाळाची अंगकांती सतेज होते.
आंघोळीच्यावेळी बाळाच्या अंगावर पडणारे पाणी सोन्यामोत्यावरून पडावे यासाठी आंघोळ घालायचा मग किंवा बादलीच सोन्याची करणे जास्त सोयीचे नाही का? जेणे करून बाळाच्या डोक्याऐवजी इतर भागांवर पडणारे पाणीही सोन्यामोत्यावरून पडल्यासारखे होईल. बऱ्याचदा आंघोळ घालणाऱ्या बाईमाणसाच्या हातातील बांगड्या-पाटल्या किंवा हातातील अंगठी सोन्याची असते व ती अनेकदा बादलीत बुचकळून निघते, तेव्हा सोन्यामोत्याचे गुण पाण्यात उतरण्यास हरकत नसावी. असो.
माझ्या मते पुणे महानगरातील सर्वच बाळांच्या व बाळींच्या अंगावरून पडणारे पाणी हे सोन्यामोत्यावरून पडावे यासाठी पुणे महानगरपालिकेने पाण्याच्या टाक्यांमध्येच सोन्यामोत्याच्या वाळ्या टाकून ठेवल्या तर कसें? शक्य असल्यास घरातील सर्व नळ सोन्याचे करून घेतल्यास केवळ अंगाखांद्यावर पडणारे पाणीच नव्हे तर स्वयंपाकासाठी व धुण्याभांड्यांसाठीचे पाणीही सोन्यामोत्यावरून पडून त्याचे काही गुणधर्म खाद्यपदार्थांमार्फत शरीरांतर्गत जाऊन मोठा फायदा होईल असे वाटते.

पुणे महानगरपालिका याबाबत काही करू शकेल का? पुणे महानगरपालिकेने काहीतरी केल्यास त्यापासून प्रेरणा घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाही काहीतरी नक्कीच करेल असे वाटते.

नंतर (कोणत्या वयात ते माहीत नाही) कानातल्या तारा काढून त्याजागी एकच भिकबाळी मुलांना आणि सोन्याच्या रिंगा मुलींना घालून त्या बोळवतात (बंद करतात) म्हणजे हरवत नाहीत. बाळाची पाचवी पुजण्याच्या दिवशी काळ्या गंड्यात ओवलेला सोन्याचा बदाम हृदयाजवळ येइल असा बांधतात. मनुष्याने सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोन्याच्या सानिध्यात रहावे म्हणून हे आहे.

सोन्याच्याच सानिध्यात राहायचे असेल तर एखाद्या पेढीजवळ घर घेणे उत्तम. मुलाचेही नाव सोन्या ठेवावे म्हणजे जोवर तो घरात असेल तोवर सर्वच जण सोन्याच्या सानिध्यात राहतील.

वेळेच्या अभावी तूर्तास इतकेच.

महेश काळे's picture

20 Apr 2011 - 1:58 pm | महेश काळे

खुप छान लीहीले आहे..
धन्यवाद..!!

मला वाटलं पुपेंनी धागा काढला की काय भिकबाळीचं महत्व पटवुन द्यायला.

मी-सौरभ's picture

19 Apr 2011 - 11:32 pm | मी-सौरभ

तुमच्या प्रतिसादाची आत्यंतिक गरज असलेला धागा... :)

पु प्या , पदवी मिळाली काय रे अलिकडेच ?

सागर's picture

19 Apr 2011 - 11:27 pm | सागर

लोकसत्तामधील या लेखात थोडी माहिती मिळेल

या लेखात भिकबाळी कशी केली जाते आणि का परिधान केली जाते याचे पटणारे सोपे कारण दिले आहे
नजर लागू नये म्हणून :)

पण एकंदरीत या लेखात पुरुषी थाट बघावयास मिळतील

धोक्याची सूचना : गूगल क्रोम मधून हा लेख मराठीत दिसणार नाही तेव्हा 'आई' च्या सावलीत पहावा ही विनंती ;)

भिकबाळीबद्दल माहीत नाही पण जोडवीमुळे अमकं न टमकं होतं, हा फायदा होतो न ती नस दाबली जाऊन मेंदूपर्यंत रक्तप्रवाह वाढतो वगैरे ऐकलं आणि कधी नव्हे ती चांदीची जोडवी घातली. फायदा काही झाला नाही. त्या जोडवीची (टो रिंग) टोकं चादरीत अडकून चादर उसवली.
काही महीने पाय सुंदर दिसत होते तेवढाच काय तो फायदा. तो देखील आहेच म्हणा.

रेवती's picture

20 Apr 2011 - 2:08 am | रेवती

हा हा हा!
नवी नवरी असताना साडीच्या फॉलमध्ये अडकून वैताग यायचा.
एका फ्यामिलीनं नवं जोडपं म्हणून जेवायला नव्या घरी बोलावलं तर त्यांच्या जिन्यात कुठेतरी जोडवी पडली.
नंतर अधिकमासात आईनं ओटी भरताना दिली ती जी पायात घातलीत ती अजूनही आहेत. आता लक्षातही येत नाही.
जोडवी घातली असता 'पटापट आणि बरीच' मुलं होतात म्हटल्यावर माझ्या मामेबहिणीनं एका मुलानंतर जोडवी वापरणं बंद केलं.;)

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 2:54 am | विनायक बेलापुरे

हो.
मी सुद्धा ऐकले आहे असे. अक्युप्रेशर का काय म्हणतात त्याचा जोडव्यांशी संबंध आहे असे म्हणतात.
खरे खोटे माहित नाही.

निवेदिता-ताई's picture

20 Apr 2011 - 9:25 am | निवेदिता-ताई

जोडवी घातली असता 'पटापट आणि बरीच' मुलं होतात म्हटल्यावर माझ्या मामेबहिणीनं एका मुलानंतर जोडवी वापरणं बंद केलं.

हा हा हा ..............ही नविनच माहिती समजतेय....धन्यवाद..

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 10:23 am | विनायक बेलापुरे

हा हा हा

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Feb 2014 - 3:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

मग आता फर्टीलिटी टेक्निकस मध्ये याचा अंतर्भाव करायला पाहीजे ...१००/२०० रुपयात काम (जोडवीबद्दल म्हणतोय,नंतर होणार्या "पटापट आणि बरीच" बद्दल नव्हे :) )
ह.घ्या.

निनाद's picture

20 Apr 2011 - 9:43 am | निनाद

जोडवी घातली असता 'पटापट आणि बरीच' मुलं होतात

जोडवी म्हणून जुळी होतात म्हणून 'पटापट' आणि 'बरीच' असं? :)

स्मिता.'s picture

20 Apr 2011 - 2:18 pm | स्मिता.

जोडवी घातली असता 'पटापट आणि बरीच' मुलं होतात म्हटल्यावर माझ्या मामेबहिणीनं एका मुलानंतर जोडवी वापरणं बंद केलं.

हे एकदम मजेदार :))

माझे लग्नातले जोडवे साधे, गोल असल्यामुळे ते कुठे अडकल्याचा त्रास नाही झाला. नवी नवरी असताना सवय नसल्याने थोडं बोटाला बोचायचं पण आता जाणवतही नाही.

फॅन्सी डिझाईनच्या जोडव्यांपेक्षा साधे जोडवे सुरक्षित असतात. ते आपल्यालाही टोचत नाहीत आणि कुठे कापडात अडकतही नाहीत.- एक निरिक्षण.

एक राहिले का बाई...

कुणी कसे जोडवे वापरावेत हा जिचा-तिचा प्रश्न. मी तर बाई आप्लं निरीक्षण नोंदवलं...

स्मिता.'s picture

20 Apr 2011 - 7:53 pm | स्मिता.

अर्थातच वपाडावबुवा! माझी प्रतिक्रिया पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद ;)

मी केवळ माझं मत मांडलं आहे. बाकी कोणी कसे जोडवे वापरावे, जोडवे वापरावेत की नाही हा जिचा-तिचाच प्रश्न आहे.
१-२ जणिंनी जोडवे अडकण्याचा उल्लेख केला म्हणून मी आपला फुकटचा सल्ला दिला.

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2014 - 5:18 pm | प्रसाद गोडबोले

जोडवी घातली असता 'पटापट आणि बरीच' मुलं होतात

=))

विनायक बेलापुरे's picture

20 Apr 2011 - 2:51 am | विनायक बेलापुरे

भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्व माहीती नाही पण शालेय शिक्षांच्या इतिहासात मानाचे स्थान होते.

रणजित चितळे's picture

20 Apr 2011 - 10:24 am | रणजित चितळे

हल्ली तरुण मुल पण घालतात. पंक आणि बरेच काही लोकं. आता असल्या आभुषणांचा अर्थ बदलला आहे त्या मुळे हे आता इतिहासातच राहिलेले बरे. नाहितर उगीच कोणाचा गैरसमज व्हायचा.

योगप्रभू's picture

20 Apr 2011 - 11:51 am | योगप्रभू

ऐतिहासिक महत्त्व म्हणजे काय, हे मला समजले नाही. दुसरे म्हणजे या दागिन्याला भिकबाळी म्हणतात की बिगबाळी?
पेशवेकाळात हा दागिना अधिककरुन ब्राह्मण पुरुषांत वापरात होता. मोठ्या घरचे लोक भिकबाळी घालत. त्यातील तेजस्वी मोत्यामुळे व्यक्तीच्या चेहर्‍याकडे पाहणार्‍याचे लक्ष खिळून राही.
भिकबाळीवरुन इतिहासात एक प्रसिद्ध गोष्ट आहे.

सातार्‍याजवळ क्षेत्रमाहुली येथे प्रभुणे घराण्यात राम नावाचा मुलगा होता. वडील लहानपणीच निवर्तल्याने आईच रामचे पालनपोषण करत होती. वडिलांचा धाक नसल्याने राम आईला जुमानत नसे. तो अतिशय खोडकर आणि वांड होता. इतर ब्राह्मणांची मुले वेदाध्ययन करत असताना राम मात्र सगळा वेळ हुंदडण्यात आणि टिवल्याबावल्या करण्यात घालवत असे. मुलगा उनाड आहे, हे जाणून आईने त्याला कामाला लावायचे ठरवले. सातार्‍याला अनगळ सावकारांच्या घरी राम शागीर्द (हरकाम्या) म्हणून काम करु लागला. एक दिवस अनगळ सावकार दुपारचे बाहेरुन आल्यावर त्यांनी रामला पायावर पाणी ओतण्यास सांगितले. सावकारांच्या पायावर पाणी घालत असताना रामची नजर सावकारांच्या कानातील भिकबाळीकडे गेले. त्या तेजस्वी मोत्याच्या प्रभेने त्याची नजर खिळून राहिली. त्या नादात पाण्याची धार पायावर पडण्याऐवजी जमिनीवर सांडत होती. अनगळ सावकार रामवर ओरडले. 'लक्ष कुठे आहे?' असे विचारताच रामने खरे ते सांगून टाकले. त्यावर अनगळ सावकार तुच्छतेने म्हणाले, 'काही कर्तबगारी गाजवली तर हा दागिना शोभतो. पाणक्याने त्याची स्वप्ने बघू नयेत.' स्वाभिमानी रामला ते शब्द झोंबले. त्याने अनगळ सावकारांचे घर सोडले आणि तडक काशी गाठली. तेथे वेदशास्त्रांचे अध्ययन करुन धर्म, न्याय व मीमांसा या शास्त्रांत प्राविण्य मिळवले. उनाड रामचा विद्वान रामशास्त्री झाला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या अंगचे गुण व विद्वत्ता ओळखून त्यांना दरबारात धर्मशास्त्रानुसार निर्णय देण्याचे काम सोपवले. तेव्हा कुठे रामशास्त्रींनी कानात भिकबाळी घातली. हेच रामशास्त्री प्रभुणे पुढे पेशवे दरबारातील 'निस्पृह न्यायमूर्ती' म्हणून प्रसिद्ध झाले.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2011 - 11:54 am | llपुण्याचे पेशवेll

सदर दागिन्याला भिकबाळी असेच म्हणतात. त्यावर पुलंचा "एवढ्या सोन्यामोत्याने मढलेल्या दागिन्याला भिकबाळी हे नावदेण्याचा करंटेपणा कोणी केला?" अशा आशयाचा विनोदही आहे.

मी-सौरभ's picture

20 Apr 2011 - 7:37 pm | मी-सौरभ

पु. पे. अजून माहिती पण अपेक्षित आहे तुझ्याकडून.

दिव्यश्री's picture

26 Feb 2014 - 5:51 pm | दिव्यश्री

सुंदर माहिती मिळाली .
धन्यवाद . :)

पण लहानपणापासून हिच गोष्ट ऐकत आलो असल्यामुळे भिकबाळी हा दागिना नसून एक पदक असल्याबद्दल माझी पक्की खात्री झाली होती. कुणी भिकबाळी घातलेली दिसली की, त्याला विचारावेसे वाटायचे- काय करावे लागते हि मिळवण्यासाठी!!

(आणि खरंच मी थक्क झालो होतो जेव्हा मला कळलं की ही बाजारात विकत मिळते, आणि कोणिही घालू शकतं.)

पक्का इडियट's picture

20 Apr 2011 - 2:57 pm | पक्का इडियट

गंमतीशीर माहिती.

च्यायला, असे एखादी नस टोचुन इतके आजार बरे व्हायला लागले तर डागदरांचा धंदाच नाय बसनार? येडे कुठले! कुठल्यातरी सोन्या मोत्याच्या व्यापार्‍याने कायतरी अफवा पसरवली अन सगळे शिंचे लागले पदरचे माड्या अन जीने चढचढून गोळा केलेले पैसे खर्चुन सोनं अन मोती घालायला.

पक्का इडियट's picture

21 Apr 2011 - 11:43 am | पक्का इडियट

>>>एखादी नस टोचुन इतके आजार बरे व्हायला लागले तर डागदरांचा धंदाच नाय बसनार? येडे कुठले!

सहमत आहे.

माझ्या आजीच्या पायाला मुंग्या आल्या असल्या की ती मला पायाच्या अंगठ्याच्या नखाजवळ एका ठिकाणी दाब द्यायला सांगायची तिच्या मुंग्या लगेच जायच्या आणि पाय मोकळा व्हायचा. माझ्या मते तिला म्हातारपणामुळे भ्रम होत असावा तुमचे काय मत?

माझे आजोबा सतत लेखनात किंवा वाचनात व्यग्र असतांना एक दिड तास झाला की डोळे मिटून दोन्ही भिवयांच्या मधे दाब द्यायचे आणि डोळ्यांचा ताण कमी झाल्याचा अनुभव सांगायचे. भ्रमच ! दुसरे काय ?

अ‍ॅक्युप्रेशरवाल्यांबद्दल आपले मोलाचे दोन शब्द सांगावे अशी मी श्री. नाईल यांना विनंती करतो.

आपल्याकडे बर्‍याच प्रकारचे टोचण दिले जाते असे दिसत आहे....

माझ्या आजीच्या पायाला मुंग्या आल्या असल्या की ती मला पायाच्या अंगठ्याच्या नखाजवळ एका ठिकाणी दाब द्यायला सांगायची तिच्या मुंग्या लगेच जायच्या आणि पाय मोकळा व्हायचा. माझ्या मते तिला म्हातारपणामुळे भ्रम होत असावा तुमचे काय मत?

अभ्यास करा म्हणजे कळेल. बाकी नखाजवळ कुठल्या एका ठिकाणी दाब द्यायची गरज नाही. अंगठ्याच्याच नखाजवळही दाब द्यायची गरज नाही. नख खाजवून पहा उपयोग होईलच.

एखादी नस टोचुन इतके आजार बरे व्हायला लागले तर डागदरांचा धंदाच नाय बसनार? येडे कुठले!

१. पायाला मुंग्या येणे हा आजार नाही. २. पायाला मुंग्या का येतात ते कारण तसेच ठेवून तुमच्या अंगठ्याची जी कोणती जागा आहे तिथे दाबून पहा. त्यासाठी ते कारण काय हे कळाले की तुम्हाला उत्तर सापडेल.

माझे आजोबा सतत लेखनात किंवा वाचनात व्यग्र असतांना एक दिड तास झाला की डोळे मिटून दोन्ही भिवयांच्या मधे दाब द्यायचे आणि डोळ्यांचा ताण कमी झाल्याचा अनुभव सांगायचे. भ्रमच ! दुसरे काय ?

आयला काय सांगता. आम्हाला तर ब्वॉ नुसत्या डोळे मिटण्यानेच ताण कमी झाल्याचा अनुभव येतो म्हंजी काय आमचे डोळे असामान्य योगबलाने युक्त वगैरे आहेत का?

मंदार दिलीप जोशी's picture

27 Feb 2014 - 3:36 pm | मंदार दिलीप जोशी

थापा मारु नका नाइल (की नाला?)

मलाही अनुभव आहे.

त्यामुळे काय होते?
त्या सोन्याच्या असतात काय?

१. भलत्या चित्रपटांतल्या लोकांच्या पियर्सिंग कडे तुमचे भलतेच लक्ष दिसते ;)
२. त्या लोकांचा तुमच्यावर प्रभाव तर नाही ना ?

वेताळ's picture

21 Apr 2011 - 7:34 pm | वेताळ

पण तश्या ठिकाणी पण लोक का टोचुन घेतात त्या बद्दल कुतुहल आहे म्हणुन विचारले.

नरेशकुमार's picture

22 Apr 2011 - 9:31 am | नरेशकुमार

आच्रत बाव्ल्त

अजातशत्रु's picture

22 Apr 2011 - 7:23 pm | अजातशत्रु

@रोज अंघोळीच्यावेळेस बाळाच्या अंगावर पडणारे पाणी हे सोन्यामोत्यावरून पडते आणि त्यात त्यांचे गुणघर्म असतात. त्याने बाळाची अंगकांती सतेज होते.
आजकाल हे सगळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य होत नाही तसेच सगळ्यांना परवडण्यासारखे असेलच असे नाही.

त्यामुळे मि.पा.वरिल प्रतिसादा वरुन प्रेरणा घेऊन पुणे महानगरपालिके ने
खडकवासला / पानशेत / वरसगांव / टेमघर हि धरणे नव्याने सोन्याची बांधण्या चा ठराव घाइघाइने संमत करण्यात आला आहे धरणातून पाणी पुरवठा करणारे पाईप हि २४ केरेट सोन्या चे करण्यात येणार आहेत म्हणे......;-)
सोने कानामधे घातल्यामुळे बालकांना होणारा धनुर्वाताचा धोका कमी होतो असे मानले जात असल्यामुळे. व पुण्यातिल बाळांची अंगकांती सतेज होण्यासाठि वरिल महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे..
( यावर विरोधी पक्षातिल काहि नेत्यांनी धनुर्वाताची लसच बंद करण्याची मागणी केली..=)

बाकी आमच्या माहितीत वरील गोष्टिंची भर टाकल्या बद्दल मंडळ आभारी आहे.

मि म.टा. वर हि माहिती वाचलीय बुवा
इअरिंग्जच्या प्रवासाची कहाणी फार रंजक आहे. इ.स. 1880 मध्ये जर्मनीतील काही ' गे ' पॉप सिंगर्सनी आपल्या उजव्या कानात छोट्या आकाराचे सोन्याचे ' डूल ' वापरणं सुरू केलं. या मागे ' गे ' कम्युनिटीला एकत्र आणण्याचा हेतू होता. उजव्या कानामध्ये रिंग असली की तो ' गे ' आहे आणि डाव्या कानात असेल तर तो ' गे ' नाही अशी सांकेतिक खूण त्यामागे होती. ' गे ' नी सुरू केलेली ही फॅशन नंतर अवघ्या जगात पसरली. मात्र तिचा सर्वात जास्त प्रसार अमेरिकेत झाला.

अवांतर: पुर्वी लोक पुणेरी पगडी वापरीत असत त्यामुळे केस गळणे/ अकाली पांढरे होणे अशा तक्रारि होत नसत;-)
हल्ली १२ वर्ष वयाच्या मुलांचे केस हि पांढरे होउ लागले आहेत...
(म्हणजे खरं असावं)

जाता जाता : वरिल महत्वाकांक्षी प्रकल्प अमलांत येण्यासाठि मान.खासदार श्री. सुरेश कलमाडि यांनीच प्रथम सुचना केल्याचे समजतेय..:p (हा तेच ते कोमनवेल्थ वाले)

सूड's picture

26 Feb 2014 - 5:42 pm | सूड

अजूनपर्यंत लक्षात आलेल्या गोष्टी; की ज्यांना हा प्रकार माहिती आहे आणि अभिमान वाटतो ते कौतुकाने, ज्यांना टोचायची आहे पण धाडस होत नाही ते हेवा वाटून, ज्यांच्या दृष्टीने ही 'असले फालतु प्रकार' मध्ये मोडते ते तिरस्काराने बघतात.

ज्यांना माहित नाही ते हे नक्की काय आहे ते/त्या आता विचारु का नंतर अशा प्रश्नार्थक चेहर्‍याने गप्पा मारत बसतात. उरलेले/ल्या एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे जितक्या म्हणून नजरेने बघू शकते तितक्या नजरेने बघतात.

आतापर्यंत मोजून तीन मुलींनी/ बायकांनी (यातल्या दोन हिरव्या देशातल्या आणि एक सौदिंडियन) हे काय आहे ते समजून घ्यायची उत्सुकता दाखवली. ;)

मिपावर मनोरंजक धाग्यांची कमी नाही हे बाकी खरे. भिकबाळी काय, मंत्र काय, मज्जाच मज्जा.

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2014 - 3:10 pm | प्रसाद गोडबोले

इतली माझी कॉमेन्ट डीलीट झाली .... काय चुकीचे लिहिले होते ? जोडवी घातल्याने मुले होतात ह्या वाक्याचे दुसरे इन्टर्प्रिटेशन दिले होते फक्त ...

काही लॉजिक कळाले नाही बुवा ... अर्थात सगळ्याच गोष्टींमागे लॉजिक असले पाहिजे असा काही हट्ट नाही ...

असो. आता प्रायश्चित्त म्हणुन एक आठवडाभर नो प्रतिसाद मोड मधे गेले पाहिजे !

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2014 - 3:28 pm | टवाळ कार्टा

आता प्रायश्चित्त म्हणुन एक आठवडाभर नो प्रतिसाद मोड मधे गेले पाहिजे !

जमेल??? :)

बॅटमॅन's picture

28 Feb 2014 - 5:25 pm | बॅटमॅन

औघड आहे खरेच!

आयुर्हित's picture

28 Feb 2014 - 2:07 am | आयुर्हित

सोने - आयुर्वेदातील! ह्या लेखात सोन्याच्या वापरावर आणि दागिन्यांच्या वापरावर दिलेली माहिती:

आयुर्वेदशास्त्रात सुवर्णाचे गुण सांगताना त्यांनी खासकरून आयुष्यवर्धन याला महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर सुवर्णाच्या सुयोग्य वापराने समस्त मनुष्यमात्राची कान्ती, बुद्धी, स्मरणशक्ती सुधारते. शारीरिक व मानसिक व्याधी सुवर्णाच्या वापराने बऱ्या होतात. सुवर्णभस्मयुक्त औषधांच्या योजनेमुळे उन्माद, अपस्मार, भूतबाधा अशा मानसिक विकारांत निश्चयाने आराम मिळतो. समस्त प्राणिमात्राला कमी-जास्त कामेच्छा असतेच. अशा कामेच्छांपासून मिळणारा आनंद वाढविणे, शरीराला सुख देणे व त्याचबरोबर शरीर पुष्ट करण्याचे काम सुवर्ण अग्रक्रमाने करत असते. मानवी शरीरात वेगवेगळ्या कारणांनी विविध प्रकारची विषबाधा होत असते. अशा विषबाधा समस्या दूर करण्याकरिता सुवर्णभस्मयुक्त औषधांचा निश्चयाने उपयोग होतो. योग्य तऱ्हेने सुवर्णभस्म बनविले गेले व ते ग्रंथोक्त पद्धतीने वापरले गेले तर संबंधित रुग्णामध्ये उत्तम रुची उत्पन्न करते, पाचक अग्नीचे बल वाढविते.

कर्णफुले किंवा भिकबाळी
कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुले किंवा भिकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेपरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असे मानले जाते.

पण माझ्या वाचनात आल्याप्रमाणे भिकबाळीचा आणि प्रमेह, मधुमेह आणि अर्थातच स्वादुपिंडाच्या उद्दिपनाशी जवळचा संबंध आहे.

कोणी अजून मदत करेल का या विषयावर?

माझीही शॅम्पेन's picture

24 Oct 2014 - 10:53 pm | माझीही शॅम्पेन

एका "जिव्हळ्याच्या" What's Up group वर भिकबाळीवर जोरदार चर्चा झाल्याने :) हा धागा वर आणत आहे ...

सूड's picture

24 Oct 2014 - 11:33 pm | सूड

जोरदार धन्यवाद !! ;)

माझीही शॅम्पेन's picture

26 Oct 2014 - 9:08 pm | माझीही शॅम्पेन

:)
....
:)