मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भिकबाळीचे महत्व

महेश_कुलकर्णी · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकर, कदाचित जो प्रश्न मी विचारतो आहे तो याआधी कधीतरी चर्चिला असेल. भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे? मी त्या संबंधी माहिती शोधली पण सविस्तर माहिती कुठेच नाही मिळू शकली. आतापर्यंत मिळालेली माहिती अशी. १) भिकबाळी कानात विशिष्ट पद्धतीने टोचल्याने मानसिक स्वास्थ्य राहते. २) पूर्वीच्या काळी याची ओळख उच्चशिक्षित लोकांचा दागिना अशी होती. जर आपणास अजून काही माहिती असेल तर कृपया ती सादर करावी. जर त्या संबंधीचे संदर्भ मिळाले तर दुधात साखर. धन्यवाद, महेश कुलकर्णी

वाचन 34233 प्रतिक्रिया 0