रेखाटन

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
14 May 2008 - 1:55 am

माझ्या काही रेखाटनांमधील हे एक आवडते रेखाटन.हे रेखाटन फार जुने आहे.(दि. ८ नोव्हेंबर २००२).यापुढील काही रेखाटने लवकरच देण्याचा प्रयत्न करीन.

माध्यमः एच. बी. पेन्सिल, नोटपॅडचा साधा कागद

कला

प्रतिक्रिया

मन's picture

14 May 2008 - 2:33 am | मन

भारी रे!
अगदिच ग्रेट!
मुख्य म्हंजे चित्र नुसतच सुंदर नाही , तर जिवंत वाटतयं.
चेहर्‍यावर एक वेगळिच ह्याला?(सात्विकतेची छटा म्हणावं काय ह्याला?)

a picture is worth thousand words.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

वरदा's picture

14 May 2008 - 2:50 am | वरदा

दुसरे शब्दच नाहीत...
किती बोलके डोळे...बोटं अगदी हुबेहुब आलेयत जशी कानातले घालताना असतात तशी...
मस्तच, अप्रतिम!!!
बाकीच्या रेखाटनांची आतुरतेने वाट पहाते....

भाग्यश्री's picture

14 May 2008 - 3:24 am | भाग्यश्री

खूप भारी आलंय रे इनोबा! मला पण स्केचींग आवडतं.. पण पेशन्स च नाहीय.. आणि इत्कं छान नाही जमत! :(

मुक्तसुनीत's picture

14 May 2008 - 3:36 am | मुक्तसुनीत

सुरेख चित्र ! अजून येऊ द्या !

केशवसुमार's picture

14 May 2008 - 3:53 am | केशवसुमार

इनोबा,
एकदम झकास रेखाटण केले आहे.. =D> अभिनंदन..
येउदेत अजून..
अवांतर...चित्रकला हे आमचे पहिले प्रेम..जुन्या आठवणी जाग्या झाल्या 8> ... आता जूनी चित्रे शोधली पाहिजेत....वयाची ४५ वर्ष झाली की पूर्णवेळ हाच छंद जोपासायचा मानस आहे ;;) ... बघू कसे जमते आहे ते.. :W
(जूना चित्रकार) केशवसुमार
(स्वगतः रेखाटनाचे विडंबन करता येते का? :? )

वरदा's picture

14 May 2008 - 4:00 am | वरदा

स्वगतः रेखाटनाचे विडंबन करता येते का? :)))
टाका ना तुमची पण रेखाटनं इथे आवडेल आम्हाला पहायला...:)

गणपा's picture

14 May 2008 - 4:24 am | गणपा

इनोबाशेठ, झक्कास की हो रेखाटन.
स्वगतः रेखाटनाचे विडंबन करता येते का?
वरदा ताई सिक्सर, एकदम स्टेडियमच्या पार.. =)) =)) =))
--गणपा

पक्या's picture

14 May 2008 - 4:26 am | पक्या

(स्वगतः रेखाटनाचे विडंबन करता येते का? -- इति: केशवसुमार)

-- हो..कार्टून येते ना करता. आपणास जमेल बहुतेक :)

इनोबा -- सुरेख चित्र...येऊ द्या अजून्...आवडेल बघायला.
-- पक्या

वरदा's picture

14 May 2008 - 5:36 am | वरदा

अहो मी नाही त्यांनीच लिहिलय ते स्वगत्.....मी फक्त हसून दाखवलं......

नंदा प्रधान's picture

14 May 2008 - 7:43 am | नंदा प्रधान

इनोबा,
चांगलं जमलं आहे पण डोळे जरा निट काढ. एक डोळा सुजल्या सारखा वाटतो आहे बारकाव्यांकडे लक्ष दे. केसांचे शेडिंग मस्त झाले आहे.

-नंदा

चतुरंग's picture

14 May 2008 - 8:23 am | चतुरंग

साधा कागद आणि एच्.बीं. ने चांगली किमया साधली आहेस. ड्रॉईंग पेपर आणि चारकोल वापरुन बघ ना चित्राला आणखीन डेफ्थ येते.
पण मस्त चालू आहे आणखीन चित्रे येऊदेत.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 8:28 am | विसोबा खेचर

सुरेख चित्र!

तात्या.

प्राजु's picture

14 May 2008 - 8:42 am | प्राजु

बारकावे अतिशय सुंदर चितारले आहेस.
अभिनंदन.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आंबोळी's picture

15 May 2008 - 2:36 pm | आंबोळी

बारकावे अतिशय सुंदर चितारले आहेस.
असेच म्हणतो.

बाकी इनोबा प्रामाणिकपणे सांगा G.T. मारली आहे की नाही... इतके सुंदर, बारकाव्यांसकट चितारले आहे तुम्ही हे चित्र की आमच्या मेंदूत लगेच तुम्ही फोटोवरून G.T. मारली असावी अशी शंका आली.

(G.T. शिवाय एकही शीट पूर्ण न केलेला) आंबोळी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायकराव,
चित्रं लै भारी काढलं राव !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पल्लवी's picture

14 May 2008 - 9:01 am | पल्लवी

इनु दादा.. सुरेख स्केच आलंय..
अगदि तिच्या कुड्या, काकणं,कडं सुदधा सुन्दरच आलं आहे.

आणि बॅग्राउंडच्या पेन्सिल शेड्-"अप्रतिम"... त्यामुळे मस्तं उठाव आलाय स्केचला...

ओठांच शेडींग गन्डलय का रे थोडसं ? (प्लीज.. रागावू नकोस हं, वाटलं ते सांगितलं.)
तुझ्या चित्राला, ९५% मार्क्स... टू गुड... :)

ऋचा's picture

14 May 2008 - 9:29 am | ऋचा

कीती सुरेख आहे रे!!!!!!!!

मस्तच आलयं...

नीलकांत's picture

14 May 2008 - 9:34 am | नीलकांत

एकदम झकास झालंय चित्र. बाकीची सुध्दा येऊ देत की.

नीलकांत

मनस्वी's picture

14 May 2008 - 10:09 am | मनस्वी

मस्तच रे इनोबा!

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 10:28 am | आनंदयात्री

वर मन्या ने म्हटल्याप्रमाणे इनोबा चित्रात सात्विकतेची छटा आहे, पातळ ओठही छान आलेत फक्त ते मिटलेले असते तर अजुन सुंदर दिसले असते असे वाटुन गेले. पुढची चित्र पटापट स्कॅन कर अन ठकाठक टाक इकडे, वी आर वेटिंग !

-आंद्या पेंटर

(व्यंगचित्र की काय असे आपण काहितरी बोल्लो होतो का ?)

आजानुकर्ण's picture

14 May 2008 - 11:02 am | आजानुकर्ण

इनोबा चित्र मस्त!

(प्रेक्षक) आजानुकर्ण

मदनबाण's picture

14 May 2008 - 11:28 am | मदनबाण

अरे इन्या लई छान रेखाटन केलय तु.....
त्या स्त्रीची हाताची मुद्रा,,,,आणि त्या वेळी झालेल्या तिच्या नयनांचा गोडवा तु अचुक टिपला आहेस.....
भुवया सुद्दा अगदी उत्तम कोरल्या आहेस.....

(कला प्रेमी)
मदनबाण.....

यशोधरा's picture

14 May 2008 - 11:30 am | यशोधरा

सुरेख रेखाटन!!

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 12:11 pm | इनोबा म्हणे

सर्व प्रतिसाद आणि सुचनांबद्दल धन्यवाद!
आणखी काही रेखाटने लवकरच देण्याचा प्रयत्न करतो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 12:23 pm | स्वाती दिनेश

इनोबा पण चित्रकार आहे हे माहितच नव्हते..छान..आणखी चित्रेही पहायला आवडतील,
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 1:24 pm | प्रभाकर पेठकर

इनोबाजी, चित्र अतिशय सुरेख आहे.
चित्रकला ह्या विषयाला छळण्याचे मी शाळे नंतर सोडूनच दिले (आणि वाचली ती कला.).
नाहीतर 'चित्रांचेही विडंबन करता येते का?' असा प्रश्न केशवसुमारांना पडला नसता. अर्थात त्यांची विडंबनेही मुळ निर्मिती इतकीच लाजवाब असतात. त्यामुळे अशी तुलनाही चुकीचीच ठरावी.

धमाल मुलगा's picture

14 May 2008 - 3:50 pm | धमाल मुलगा

:)

सुंदर..सोज्वळ...सात्विक...गोड !!!
काय मस्त भाव जमलेत इनोबा !!

आणखी येऊ दे :)

आणि ते रे...तात्यांचं स्केच? ;) तेपण टाक की चढवून पटकन !!!!!

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 6:57 pm | इनोबा म्हणे

आणि ते रे...तात्यांचं स्केच? तेपण टाक की चढवून पटकन !!!!!
अरे! ते टाकणार आहेच.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

14 May 2008 - 3:57 pm | मन

ह्ये चित्र ज्या सौंदर्य वतीचे आहे, तिचे नाव काय रे?(ह्या "विनायकाची" ती मनात दडलेली "सरस्वती" आहे काय?)
म्हंजे तु येवढं मनावर घेउन चित्र काढलास, म्हुन म्हनायलो.
;-) ;-))

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 7:05 pm | इनोबा म्हणे

तसं जरा खास कारण आहेच म्हणा!
पण जाऊ दे! फार मोठी इष्टोरी हाये ती.पुन्हा कधीतरी सांगेन. :<

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चित्रा's picture

14 May 2008 - 5:16 pm | चित्रा

चित्र सुरेख आहे. चित्रातील युवती जूही चावला आहे का?

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 5:28 pm | विसोबा खेचर

चित्रातील युवती जूही चावला आहे का?

मला तरी असं वाटत नाही...

आपला,
तात्या चावला.

राजे's picture

14 May 2008 - 5:34 pm | राजे (not verified)

तात्या चावला.

हा हा हा ! =))

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

गणपा's picture

14 May 2008 - 6:48 pm | गणपा

मलाही ती थोडी जुही सारखीच भासलली होती.
चला म्हणजे मी एकटाच न्हवतो तर :)

वरदा's picture

14 May 2008 - 5:22 pm | वरदा

चित्रकला ह्या विषयाला छळण्याचे मी शाळे नंतर सोडूनच दिले (आणि वाचली ती कला.).
हेच म्हणते.....:))

शितल's picture

14 May 2008 - 5:42 pm | शितल

वॉ, इनोबा,
मस्त, इतक्या बारकाव्यानिशी काढलेले हे चित्र मनाला भुरळ घालते.
तुझ्यातील कलाकाराला सलाम.

राजे's picture

15 May 2008 - 2:42 pm | राजे (not verified)

मस्त, इतक्या बारकाव्यानिशी काढलेले हे चित्र मनाला भुरळ घालते.
तुझ्यातील कलाकाराला सलाम.

सहमत.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

देवदत्त's picture

14 May 2008 - 5:46 pm | देवदत्त

छान आहे रेखाटन.
आणखी येऊ द्यात...

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 6:53 pm | स्वाती राजेश

छान रेखटले आहे.:)
ही पण तुमच्याकडे कला आहे हे माहीत नव्हते.
आणखी अशीच रेखाचित्रे येऊ देत....

पिवळा डांबिस's picture

15 May 2008 - 7:36 am | पिवळा डांबिस

ईनोबा, ईन्या, शिंच्या!!!!
अरे देवाने ही किती छान कला ठेवलीय रे तुझ्या बोटांत!!!
बोटं बघ कशी अगदी खर्‍यासारखी आलीत!!!!
आणि त्या तरूणीच्या चेहर्‍यावरील भावही सौंदर्यप्रसाधनात मग्न असल्यासारखे दिसणारे!!!!
मग ही कला वापरून सुंदर-सुंदर चित्रे काढायचे सोडून कशाला रे उगाच उंडगेपणा करत हिंडतो मिपावर!!!
व्यथित,
डांबिसकाका

ईश्वरी's picture

15 May 2008 - 11:54 am | ईश्वरी

छान रेखाटले आहे. येऊ द्यात अजून. आवडेल बघायला.

ईश्वरी

छोटा डॉन's picture

15 May 2008 - 11:17 pm | छोटा डॉन

:O :O :O :O

आयला ह्या इनोबाच काहीच समजत नाही ...
कधी "राज ठाकरे आणि मराठी माणुस" च्या नावाने पेटतो तर कधी गोकुळवाडीचा गंपु होउन मस्त जीवनाचा आनंद घेतो त्यात आणखी भर म्हणून चारोळ्यावर चारोळ्या लिहतो तर कधी "मराठमोळे वॉलपेपर" बनवतो ....
आता हे कमी म्हणून चित्रकला सुरु केली ...

चांगले आहे, चालू द्यात [ आम्ही नेहमीप्रमाणे उशीरा प्रतिक्रीया देतोच ... :/ ]

बाकी डांबिसकाकांचे बोलणे "मग ही कला वापरून सुंदर-सुंदर चित्रे काढायचे सोडून कशाला रे उगाच उंडगेपणा करत हिंडतो मिपावर!!!" जास्त मनावर घेऊ नकोस. असाच येत राहा आणि मजा करत जा [ लैच वडीलधार्‍यासारखं व्ह्यायला लागलं वाटतं ]
हलकेच घे ...

स्वगत : तो हलके घेईलच, पण आता आपली "घ्यायची" वेळ झाली . चला ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुवर्णमयी's picture

15 May 2008 - 11:47 pm | सुवर्णमयी

रेखाटन आवडले. इतर बारकावे समजत नाही, मी कॉलेजात गेले आणि चित्रकला वाचली :)